कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपाच्या येडियुरप्पांकडून शपथ!

बहुमत सिद्ध करावे लागणार! बेंगळुरू:- भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळू नये म्हणून दाखल झालेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली; परंतु शपथविधी रोखण्यास नकार दिला. त्यामुळे भाजप नेते येडियुरप्पा यांनी…

बहुमत सिद्ध करावे लागणार!

बेंगळुरू:- भाजपला सत्ता स्थापनेची संधी मिळू नये म्हणून दाखल झालेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतली; परंतु शपथविधी रोखण्यास नकार दिला. त्यामुळे भाजप नेते येडियुरप्पा यांनी आज सकाळी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात फक्त येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांना येत्या २४ तासांत ११२ आमदारांच्या पाठिंब्याची यादी सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे वृत्त आहे. ही यादी सादर करताना `अनेक’ कसरती येडियुरप्पांना कराव्या लागणार आहेत.

त्यानंतर सभागृहात बहुमत सिद्ध झाल्यानंतरच इतर मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. काँग्रेस-जेडीएस या पक्षांच्या काही आमदारांना आपल्या बाजूने वळविण्याची खेळी भाजपला यशस्वी करावी लागेल; अन्यथा बहुमत सिद्ध करण्यात अडचणी येतील.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page