सावंतवाडी:- सावंतवाडी संस्थानच्या राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी काल निधन झाले. राज्याभिषेक झालेले शेवटचे राजे शिवरामराजे भोसले यांच्या त्या पत्नी होत्या. यांच्या जाण्याने जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
राजमाता म्हणून त्यांनी आदराचे स्थान निर्माण केले होते. गंजिफा ही हस्तकला संपूर्ण जगभरात पोहचविली. सुमारे पंचावन्न वर्षे त्यांनी सावंतवाडीतील लाकडी खेळणी बनविण्याची कला स्वत: अवगत करुन त्या कलेला राजमान्यता दिली. बडोद्याच्या राजघराण्यातील सत्वशीलादेवी यांचा विवाह सावंतवाडी संस्थानचे शिवरामराजे भोसले यांच्याशी झाला होता. आपल्या संस्थानातील जनतेला त्यांनी आपलंसं केलं होतं; त्यामुळे त्या खऱ्या अर्थाने `राजमाता’ झाल्या होत्या.

Leave a Reply