लिंक्स ओपन करताना काळजी घ्या! – निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी
लिंक्स ओपन करताना काळजी घ्या! – निवासी उपजिल्हाधिकारी श्री विजय जोशी
सिंधुदुर्गनगरी:- अनेक वेळा आपल्याला लिंक्स पाठविल्या जातात; त्या सुरक्षित आहेत की नाहीत ह्याचे भान ठेवले पाहिजे. आलेल्या सर्वच लिंक ओपन न करता त्यातील फरक ओळखायचा कसा? याबाबत सिंधुदुर्गाचे निवासी उपजिल्हाधिकारी श्री विजय जोशी यांनी अतिशय सोप्या शब्दात महत्वाचे मार्गदर्शन केले आहे. ते जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित `फेक न्यूज आणि समाज माध्यम’ या विषयावर चर्चासत्राच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करीत होते. सदर चर्चासत्र पत्रकार मुख्यालयात संपन्न झाले.
आपल्याला अनेक लिंक्स येत असतात, त्या http ने सुरु झालेल्या असतात, त्या ओपन करू नयेत, त्यावरून ऑनलाइन आर्थिक व्यवहार करू नये व वैयक्तिक माहिती देऊ नये; कारण त्या सुरक्षित नसतात. तर https ने सुरु झालेल्या असतात, त्या लिंक्स सुरक्षित असतात. त्या काळजीपूर्वक पाहाव्यात आणि ओपन कराव्यात; असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
HTTP आणि HTTPS मधील फरक
HTTP ‘हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल‘
HTTPS ‘सुरक्षित हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल’