काश्मीरमध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांच्यासह तीन जवानांना वीरमरण

नवी दिल्ली:- उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत ठाणे जिल्ह्यातील मिरारोड येथील मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांच्यासह तीन जवानांना वीरमरण आले.

सोमवारी रात्रीपासूनच घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांशी भारतीय जवानांचा लढा सुरू होता. मंगळवारी सकाळी मेजर कौस्तुभ राणेंसह मनदीपसिंग रावत, हमीरसिंग आणि विक्रमजीतसिंग हे तीन जवान शहीद झाल्याचे तर दोन दहशतवादी ठार झाल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले.

भारतीय सीमारेषेवर कार्यरत असताना दाखविलेल्या असामान्य शौर्याबद्दल मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना २६ जानेवारी २०१८ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते `सेना पदक’ बहाल करण्यात आले होते.

शहीद मेजर कौस्तुभ राणे हे ठाणे जिल्ह्यातील मीरारोडचे राहणारे असून त्यांच्या पश्चात आई-वडील, बहीण, पत्नी व अडीच वर्षांचा मुलगा आहे. मेजर राणे मुळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. गेल्या ३० वर्षांपासून मीरारोड परिसरात वास्तव्यास होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page