पाक्षिक `स्टार वृत्त’च्या सहसंपादकांच्या तक्रारीची दखल

सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना-कर्मचाऱ्यांना बँकेच्या बेजबाबदार कारभाराचा फटका नेहमीच बसत असतो. कारण त्यांचे सेवानिवृत्ती वेतन देण्यास विनाकारण विलंब केला जातो. महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ. श्रीनिवास गोविंद पाटील यांचे मार्च आणि…

सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना-कर्मचाऱ्यांना बँकेच्या बेजबाबदार कारभाराचा फटका नेहमीच बसत असतो. कारण त्यांचे सेवानिवृत्ती वेतन देण्यास विनाकारण विलंब केला जातो. महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी डॉ. श्रीनिवास गोविंद पाटील यांचे मार्च आणि एप्रिल २०२१ चे निवृत्त वेतन मिळाले नव्हते.

त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा दिली. आजही ते स्वतः आजारी असून कर्करोगावरील शस्त्रक्रिया पश्चात यांच्यावर कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तरीही ते वेळात वेळ काढून कोरोना महामारीच्या काळात जनसामान्यांना वैद्यकीय सेवा देत आहेत. अशा ७५ वर्षीय सेवानिवृत्त अधिकाऱ्याला वेळेवर सेवानिवृत्ती वेतन देण्यास बँक विलंब करते तेव्हा त्यांना खूपच मोठा त्रास सहन करावा लागतो. दरवर्षी सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना-कर्मचाऱ्यांना बँकेकडे हयातीचा दाखल द्यावा लागतो. हयातीचा दाखला मिळविण्यासाठीही मोठी कसरत करावी लागते. वृद्धापकाळात आजारी असूनही ही प्रक्रिया करावी लागते. अशाप्रकारे डॉ. श्रीनिवास गोविंद पाटील यांनीही हयातीचा दाखला बँकेकडे सादर केला होता. तरीही बँकेने तो प्रस्ताव लेखा अधिदान कार्यालय देण्यास विलंब केला. पंजाब नॅशनल बँकेच्या बोरीवली (पश्चिम) शाखेने वेळेवर संबंधित कार्यालयात प्रस्ताव दाखल न केल्याने डॉ. श्रीनिवास गोविंद पाटील यांना सेवानिवृत्त वेतन मिळत नव्हते.

यासंदर्भात पाक्षिक `स्टार वृत्त’चे सहसंपादक मा.श्री.मोहनसिंह सावंत यांनी लेखा अधिदान कार्यालय, बांन्द्रा येथे प्रत्यक्ष संबंधित पेन्शन अधिकारी यांची भेट घेऊन डॉ. पाटील यांची तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची दाखल घेत २ मे २०२१ रोजी सेवानिवृत्त वेतन त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले.  डॉ. श्री. पाटील यांनी `स्टार वृत्त’चे सहसंपादक श्री​.मोहनसिंह सावंत यांचे आभार मानले आहेत.

पा. `स्टार वृत्त’चे सहसंपादक, सामाजिक कार्यकर्ते श्री​. मोहनसिंह सावंत नेहमी अशाप्रकारे समाजपयोगी कार्य करीत असतात. त्यांचे पा. `स्टार वृत्त’ परिवारामार्फत अभिनंदन! त्यांच्या कार्यास शुभेच्छा!

-संतोष नाईक

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page