विशेष लेख
-
सिंधुदुर्गातील नागरी समस्यांनी वेढलेले मसुरे खोत जुवा बेट
ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग कार्यकारिणीची खोत जुवा बेटावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी सिंधुदुर्ग (संतोष नाईक):- मालवण तालुक्यातील मसुरे गावातील एक वाडी म्हणजे खोत जुवा बेट. या बेटावर अंदाजे पंचवीस घरे आहेत. लोकवस्ती एकशे वीसच्या आसपास. तेथील मूलभूत नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग कार्यकारिणीने तिथे नुकतीच प्रत्यक्ष भेट दिली. आजच्या
-
क्षा. म. समाजाच्या अभ्यासू नेतृत्वाचा अस्त!
मोहन लोकेगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आजचा दिवस अतिशय दुःखद बातमी घेऊन आला. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजबांधव, समाजाचे नेते, राजकीय नेते मोहन लोकेगावकर यांचे आज निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो; ही परमात्म्या चरणी प्रार्थना! लोकेगावकर कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मोहन लोकेगावकर यांचे राजकीय कणखर आणि समर्थ नेतृत्व शिवसेना पक्षात बहरले. जनतेच्या प्रश्नांना
-
आज माझ्या आक्काचा `अमृत’ वाढदिवस…
|| हरि ॐ || || श्रीराम|| ||अंबज्ञ|| चिरकाल टिकणारी सुसंस्काराची अमूल्य श्रीमंती तिने आम्हाला मुक्तहस्ताने भरभरून दिली. तिच्या प्रेममय जिव्हाळ्याच्या शुभ स्पंदनातून आम्हा भावंडांची प्रगती झाली. कारण तिचा अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ सदैव तिच्या संगतीलाच नव्हे तर आमच्याही निरंतर पाठीशी उभा राहिला- प्रसंगी आम्हाला आलेल्या संकटाच्या समोर उभा राहिला. सच्ची स्वामी भक्त असणाऱ्या आमच्या आक्काने
-
जेष्ठ अभिनेत्री श्रद्धावान आशालताविरा वाबगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
शंभरहून अधिक चित्रपटात काम करून आपला ठसा उमटविणाऱ्या, मराठी चित्रपट सृष्टीत ‘आशालता’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुणी ज्येष्ठ अभिनेत्री आशालताविरा वाबगावकर यांचे निधन झाले आणि त्यांच्या चाहत्यांना, नातेवाईकांना, मित्रपरिवाराला खूप मोठ्या दुःखाला सामोरं जावं लागलं. अतिशय दुःखद घटना! श्रद्धावान आशालताविरा वाबगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांचे सातारा येथील खासगी रुग्णालयात वयाच्या ७९ व्या वर्षी निधन झाले.
-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे २१ व्या शतकातील भारताला नवी दिशा मिळणार!
पंतप्रधानांचे एनईपी २०२० अंतर्गत “२१ व्या शतकातील शालेय शिक्षण” या विषयावरील परिषदेत संबोधन नवी दिल्ली:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनईपी २०२० अंतर्गत “२१ व्या शतकातील शालेय शिक्षण” या विषयावरील परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संबोधित केले. त्यातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. १) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे २१ व्या शतकातील भारताला नवी दिशा मिळणार आहे आणि देशाच्या
-
संपादकीय- `आनंद’ सच्चिदानंदामध्ये एकरूप झाला!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ डॉ. आनंद कोरे यांनी आपला देह सद्गुरु चरणी समर्पित करून भर्गलोकाच्या प्रवासाकडे प्रयाण केले. पण एक सामान्य श्रद्धावान म्हणून त्यांच्या जाण्याने एक सच्चा मित्र, आमचा खराखुरा मार्गदर्शक देवमाणूस, परमस्नेही आपल्यातून निघून गेल्याची खूप मोठी वेदना हृदयात जाऊन बसली. बातमी ऐकून धक्काच बसला. चटकन डोळ्यातून पाणी आले. खूप दुःख झाले. बापूराया, अजूनही
-
पंतप्रधानांची `मन की बात’ प्रत्यक्षात आल्यास देश प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर!
(पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून देशाच्या नागरिकांना “मन कि बात’द्वारे संबोधित केले! त्याचे सविस्तर शब्दांकन देत आहोत! यावेळी पंतप्रधानांनी अनेक महत्वाचे मुद्दे देशवासियांसमोर मांडले. त्यांनी मांडलेला प्रत्येक मुद्दा देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अनुकूल ठरणारे होते; म्हणूनच सविस्तर शब्दांकन दिले आहे. पंतप्रधानांची `मन की बात’ प्रत्यक्षात आल्यास देशाला प्रगतीचे सर्वोच्च शिखर गाठण्यास वेळ लागणार नाही! -संपादक)
-
कोरोना महामारीत डॉ.चंद्रकांत पुरळकर रुग्णांसाठी झाले देवदूत!
कोरोना महामारीच्या संकटात अनेक डॉक्टरांनी आपआपले दवाखाने बंद ठेवले. त्यामुळे शहरी असो वा ग्रामीण भागात छोट्या-मोठ्या आजारांसाठी उपचार कुठे करायचे? हा मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेसमोर पडला होता. शासनाला अशा डॉक्टरांना वेळोवेळी आवाहन करून दवाखाने सुरु करण्याची विनंती करावी लागत होती; परंतु ह्या महासंकटात डॉ. चंद्रकांत पुरळकर रुग्णांसाठी-ग्रामीण भागातील गरीब कष्टकरी जनतेसाठी अक्षरशः देवदूत ठरले. त्यांनी
-
दूरदर्शी आमदार म्हणून डॉ. भारती लव्हेकर यांची अभिनंदनीय निवड!
एशिया पोस्ट नियतकालिकाने भारतात केलेल्या `५० आदर्श आमदार २०२०’ विशेष सर्व्हेत आमदार डॉ. भारती लव्हेकर यांची निवड एशिया पोस्ट नियतकालिकाने भारतात केलेल्या `५० आदर्श आमदार २०२०’ विशेष सर्व्हेत आमदार म्हणून डॉ. भारती लव्हेकर यांच्यासह महाराष्ट्रातील आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार आणि आमदार देवयानी फरांदे यांची नुकतीच निवड झाली आहे. दूरदर्शी आमदार म्हणून डॉ. भारती
-
माझा सिंधुदुर्ग- सन्मा. जिल्हाधिकारी; श्रीगणेश मूर्तीच्या उंचीबाबत अट रद्द करा!
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव कसा साजरा करावा? यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढले आहे. त्या सोळा कलमी परिपत्रकांमध्ये अटी, शर्ती नमूद केलेल्या आहेत. शासनाच्या नियमानुसार केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोरोना महामारी रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपायोजना करायलाच हव्यात; मात्र हे करत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी काही गोष्टींबाबत वास्तवता समजून घेणे गरजेचे आहे;







