विशेष लेख
-
कोरोना विषाणू संसर्ग हा तिसऱ्या महायुद्धाचा एक छोटासा भाग…
कोरोना विषाणू संसर्ग `एक मोठं षडयंत्र आहे’… गाफीलपणा नडला, लाखो मृत्यूला आमंत्रण दिले! जग तिसऱ्या महायुद्धाकडे वेगाने जात असून त्याची पूर्वतयारी म्हणून अनेक बलाढ्य देश भविष्यात आपल्या देशाला सामर्थ्य मिळवून देण्यासाठी वर्तमानात डाव-प्रतिडाव मांडत आहेत. त्यामुळे जग अधिकाअधिक महायुद्धाच्या दरीत कोसळत आहे. महायुद्धाचा उद्रेक होण्यापूर्वीची पूर्वतयारी म्हणून मागील काही वर्षात ज्या घटना घडल्या, त्या अतिशय गंभीर
-
कोरोना विषाणूने केले आरोग्य यंत्रणेचे वास्तव उघड…
युद्धात प्रत्येक देशाच्या मर्यादा उघड… कोरोना विषाणूने जगात थैमान घातले आहे. कालपर्यंत २५ हजार ३५४ लोकांचे जीव गेले. ५ लाख ५९ हजार १६५ लोकांना लागण झालेली आहे. आपल्या भारतातही बाधितांची संख्या वाढत आहे. इटलीसारख्या आधुनिक वैद्यकीय सुविधा असलेल्या देशात मृत्यूचे तांडव सुरू आहे. विकसित अमेरिका हतबल झाली. सुमारे दोनशे देश कोरोना विषाणूविरुद्ध युद्ध करीत आहेत.
-
कोरोना विषाणूविरुद्धचे महायुद्ध जिंकण्यासाठी जबाबदारीने वागू!
जगावर खूप मोठं संकट आलेलं आहे. जगातील आजपर्यंत १६० देशात कोरोना विषाणूने प्रवेश केला असून मानवावरील हे संकट दिवसेंदिवस अधिक गंभीर भयावह अक्राळविक्राळ रूप धारण करीत आहे. जगभरात ३ लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण लागली असून त्यानां कोव्हिड-१९ हा आजार झाला आहे आणि १३ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक देश ह्या महामारीपुढे हताश झाले
-
समाजसेवेचा ध्यास घेऊन प्रत्यक्ष कार्य करणाऱ्या अनिल तांबे यांना सलाम!
आमचे विद्वान आणि कृतिशील परममित्र अनिल तांबे आज `मुंबई पोर्ट ट्रस्ट’मधून पर्यवेक्षक या पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. सलग एकेचाळीस वर्षे आठ महिने सेवा केल्यानंतर नोकरीतून जरी निवृत्त होत असले तरी सामाजिक क्षेत्रात अधिक समर्थपणे कार्य करण्यासाठी ते आजपासून शुभारंभ करणार आहेत; म्हणूनच त्यांना आमच्याकडून मनःपूर्वक लाख लाख शुभेच्छा! स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आपण नोकरी-व्यवसाय
-
जनतेच्या जीवावर उठणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठली भाषा समजणार?
घटना क्र. १ चिपळूणमधील तिवरे धरण फुटले आणि झालेल्या हानीत १८ जण दगावले; तर अद्यापही ५ जण बेपत्ता आहेत. `तिवरे धरणाला गळती लागली असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते; त्यासाठी त्वरीत उपाय योजना करा!’ अशी मागणी सतत दोन वर्षे तेथील ग्रामस्थ करीत होते. तरीही पाटबंधाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. मे २०१९ मध्ये डागडूजी करून तिवरे
-
अजित परब यांचे पर्यावरणपूरक अभूतपूर्व संशोधन!
संपूर्ण देशात संशोधनाचा वापर झाल्यास प्रचंड आर्थिक बचत! प्रदूषण-दुर्गंधीत घट होऊन जमिनीची सुपीकता वाढेल! सगळा सुंदर स्वच्छ परिसर, कुठेही कचरा नाही, दुर्गंधी नाही, हवेच-पाण्याचं प्रदूषण नाही, चिखल नाही, मच्छर नाही. सार्वजनिक शौचालय मुताऱ्या दुर्गंधीमुक्त, डम्पिंग ग्राउंड दुर्गंधीमुक्त. ह्या मधून जे काही तयार होईल; ते पर्यावरण पूरक असेल! असं संशोधन झालं तर??? होय, असं संशोधन सिंधुदुर्ग
-
परंपरेचा गवळदेव…
कोकणात शासनाच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरु आहेत. विस्तीर्ण सागरी किनारा, भव्य अशी वनसंपदा, सह्याद्रीचा कडा, उद्योग यासह असंख्य वैशिष्ट्यांसह कोकण विभागात आजही सांस्कृतिक प्रथा-परंपरा कायम ठेवल्या जात आहेत. यात श्रध्दा किती अंधश्रध्दा किती ? हा वेगळा विषय असू शकतो. मात्र कोणत्याही कारणाने का होईना गावातले सर्व जाती धर्माचे लोक काही विशिष्ट दिवशी एकत्र येतात आणि
-
शून्यातून आपलं अस्तित्व निर्माण करणारे उद्योजक श्री. सुरेश डामरे यांचा आदर्श लाखमोलाचाच!
समाज माझा, मी समाजाचा! क्षा. म. समाजातील आदर्श व्यक्ती-२ हरि ॐ कष्ट करण्याची तयारी, यशस्वी होण्याची जिद्द, प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता हे सर्व गुण एकत्र आल्यावर कुठलीही व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहचते. शिक्षण आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्या यशस्वी व्यक्तीचे अडत नाही. त्यांच्याकडे अनेक वर्षाच्या अनुभवातून शिक्षणातून येणाऱ्या ज्ञानापेक्षा व्यावहारिक जगतातील ज्ञान दृढ होत जाते. यासर्व गोष्टी जेव्हा
-
मातृभाषेतून शिक्षण महत्वाचे! का आणि कसे?
पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून झाल्यास त्या विद्यार्थ्यांची आकलन क्षमता सक्षम होते. त्यांचा शैक्षणिक विकास उचित प्रकारे होतो. असे अनेक आधुनिक संशोधनातून समोर येत आहे. तरीही इंग्रजी माध्यमातून आपल्या पाल्यांना शिकविण्यासाठी पालकांची धडपड अजूनही कमी होत नाही. त्यातील मर्म समजण्यासाठी आपणास खालील व्हिडीओ पाहावे लागतील. `मातृभाषेतून शिक्षण महत्वाचे’ ह्या विषयावर प्राचार्य डॉ. अर्जून कुंभार
-
अधिस्वीकृती समितीच्या माध्यमातून पत्रकार संघटनांचे खच्चीकरण करण्याचा खटाटोप
अधिस्वीकृती समिती सरकारी व्यवस्था आहे की, पत्रकारांची सरकार पुरस्कृत संघटना? सरकारनं घेतलेल्या पत्रकार हिताच्या प्रत्येक निर्णयाचे श्रेय अधिस्वीकृती समितीला देऊन मराठी पत्रकार परिषद,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि पत्रकारांच्या तत्सम संघटनांचे पध्दतशीरपणे खच्चीकरण करून मोठ्या कष्टानं राज्यात उभी राहिलेली पत्रकारांच्या हक्काची चळवळ मोडून काढण्याचं कारस्थान वरिष्ठ पातळीवरून सुरू असल्याची धक्कादायक आणि संतापजनक माहिती हाती आली





