विशेष लेख
-
महाराष्ट्राच्या राजकारणातील (गंमतीदार) वास्तव-१
पाच वर्षे `भाजपा’ `निष्ठावंत’ दुर्लक्षित? राजकारणात काहीही होऊ शकते… ह्याची प्रचिती सर्वांना आहेच! पण राजकारणातील खऱ्या गंमती कधी कधी वेगळ्या दृष्टीने पाहिल्यास राजकारणातील सत्ताकारण, राजकारणातील चक्रव्ह्युव, राजकारणातील राजकारण अशा राजकारणातील अनेक गोष्टी लक्षात येतात. महाराष्ट्राच्या सत्ताकारणात भाजपा शिवसेना युतीला २०१९ साली विधानसभेत स्पष्ट बहुमत होतं; पण बंद दाराआड झालेल्या चर्चेत नेमकं काय घडलं? हे दोन्ही
-
दूरदर्शी नेत्याच्या संकल्पनेतून साकारली बारामती!
बारामती येथील २ मार्च २०२४ च्या नमो रोजगार मेळाव्याची चर्चा व त्याची प्रसिद्धी खूप झाली आणि भविष्यातही होत राहील. ह्याची कारणे आपल्या सर्वांना ठाऊक आहेतच! या मेळाव्याचे आयोजक महाराष्ट्र शासन होते. सर्व सरकारी शिष्टाचार (Protocol) पाळणे हे शासनाला बंधनकारक असते. कोणाची कितीही राजकीय आणि वैचारिक अडचण असली तरी! कायद्याच्या आणि नियमांच्या वर कोणीही नाही (
-
विशेष लेख- महाराष्ट्राला संरक्षण उत्पादनाचे प्रमुख केंद्र बनवणारा ‘डिफेन्स एक्स्पो’
एक वेळ अशी होती की, अमेरिकेच्या दबावापुढे झुकलेल्या रशियाने भारताला क्रायोजेनिक इंजिन प्रणाली देण्यास नकार दिला. प्रक्षेपण यानामध्ये असणारे हे इंजिन म्हणजे अतिवजनाच्या उपग्रहांना अंतरिक्षात पोहचवणारी अश्वशक्ती क्षमता आहे. आपल्या पीएसएलव्ही म्हणजेच भूउपग्रह प्रक्षेपण यानाचे यश याच इंजिनावर अवलंबून आहे. रशियाच्या नकारानंतर आपल्या वैज्ञानिकांनी दूरदृष्टी दाखवत स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून काही वर्षातच क्रायोजेनिक इंजिन तयार
-
देशात आमदारही सुरक्षित नाहीत! इतके भीतीचे वातावरण देशात ह्यापूर्वी कधीच नव्हते!
मित्रहो, निर्भय अन् मुक्त वातावरण देशात आता कुठेच राहिलेले नाही! कुणीच सुरक्षित नाही! कुणीच म्हणजे लोकप्रतिनिधीही सुरक्षित राहिलेले नाहीत! तर सामान्य जनतेचे काय? गेल्या आठ दिवसात बिहार अन् झारखंडमधील सुमारे ३०० आमदार भीतीच्या वातावरणात जगत आहेत. त्यांना आपले कर्तव्य निभावू दिले जात नाही. असे वातावरण पहिल्यांदाच निर्माण झाले आहे, असेही नाही! मोदी सत्तेवर आल्यापासुन देश
-
असलदे ग्रामपंचायतीचा सुवर्णकाळ!
ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शेवटचा आणि महत्त्वाचा घटक; जो गावाला विकासाच्याबाबतीमध्ये समर्थ करीत असतो. अशा असलदे ग्रामपंचायतीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत; त्या निमित्ताने असलदे गावातील सर्व ग्रामस्थांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि आजपर्यंत झालेल्या सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे मनःपूर्वक आभार! मनुष्याला पन्नास वर्षे जेव्हा पूर्ण होतात तेव्हा तो पूर्णपणे अनुभव संपन्न होतो, असे
-
कामगार राज्य विमा योजना, मुंबई येथून निवृत्त झालेल्या सहकाऱ्यांचा स्नेहमेळावा!
भेटीच्या सोहळ्याचा वृत्तांत! आयुष्याची अनेक वर्षे ज्यांच्यासोबत घालवली ती माणसं आजही संपर्कात असताना बऱ्याचवेळा एकमेकांची भेट होत नाही. ह्या आपल्या जिवाभावाच्या माणसांना मनापासून भेटायला हवं; त्यांना डोळे भरून पाहण्यासाठी, काही जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, त्या आठवणीतील आनंद घेण्यासाठी! त्यासाठीच बुधवार २४ जानेवारी २०२४ रोजी एमआयजी क्लब, वांद्रे येथे कामगार राज्य विमा योजना, मुंबई येथून निवृत्त
-
बहुजन समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या अनुबंधाला सलाम!
सहकार महर्षी सहदेव फाटक साहेबांना १०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! स्वातंत्र्य सैनिक, सहकार महर्षी, कामगार नेते, सामाजिक सभानता जपणारे नेते, सर्वसामान्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जीवन समर्पित करणारे क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे सुपुत्र स्वर्गीय सहदेव शंकर फाटक साहेबांचा १ जानेवारी २०२४ रोजी १०० वा जन्मदिन अर्थात जयंती होती. त्यानिमित्ताने २० जानेवारी २०२४ रोजी सोशल सर्व्हिस लीग, एन. एम.
-
माझा `राम’… आत्माराम, साईराम अनिरुद्धराम…!
मी अगदी सामान्य माणूस आहे! मला अध्यात्म समजत नाही, मी अज्ञानी आहे! मला मात्र एक गोष्ट पक्की ठाऊक आहे; `राम’ माझ्यातच आहे आणि `रावण’ही माझ्यात आहे! राम म्हणजे पवित्रता, शुभ, सुयश, सत्य, प्रेम, आनंद, ज्ञान, प्रकाश, सुसंस्कार; माझ्या जीवनाच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या उचित गोष्टी! तर ह्या सर्व उचित, शुभ व पवित्र गोष्टीना विरोध करतो
-
९३ वर्षांचा लढवय्या समाजसेवकाला मानाचा मुजरा!
कॉम्रेड दत्ता खानविलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!! ज्याचं स्मरण होताच आपसुकपणे नमस्कारासाठी हात जोडले जातात, ज्याचं प्रत्यक्ष दर्शन होत तेव्हा आपसुकपणे त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला जातो, ज्यांच्या सहवासात राहिल्यानंतर आपसुकपणे मनात उत्साह असा निर्माण होतो, जीवनाचे सत्य समजून येते; अशा व्यक्ती आपल्या जीवनात येणे सुद्धा परमभाग्य असावं लागतं! असं परमभाग्य मी उपभोगलं आणि उपभोगतोय!
-
कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांची बनवाबनवी आणि भूखंडधारकांची छळवणूक!
भूखंडाचा ताबा नसतानाही इमारत बांधण्याचे करार करून फसवणुकीची शक्यता! मुंबईच्या माजी महापौर जेष्ठ विधिज्ञ निर्मलाताई सामंत- प्रभावळकर भूखंड धारकांना न्याय मिळवून देणार! मुंबई (विशेष प्रतिनिधी):- गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे गरजू व्यक्तींना बाजारभावाप्रमाणे शुल्क आकारून घरकुलासाठी २०११ साली भूखंड वितरित केले. त्यातील अनेकांनी नोंदणीकृत करारनामा करून रीतसर मुद्रांक शुल्क भरले;










