विशेष लेख
-
अन्नपूर्णेचा कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास! (भाग- १)
सौ. मुग्धा मोहन सावंत अर्थात मुग्धा काकूंचा आज एकसष्टवा वाढदिवस! त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! मुग्धा सावंत यांचा तीस-पस्तीस वर्षाचा प्रवास कष्टाचा, मेहनतीचा, त्यागाचा आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाकरिता सर्वकाही करीत असताना आपल्या भावंडांना-नातेवाईकांना जीवनात-संसारात उभं राहण्यासाठी जे बळ दिलं; ते आदर्शवत असंच आहे; शिवाय नेहमी प्रेरणादायी असं आहे. म्हणून त्यांच्या जीवन प्रवासाचा आलेख शब्दांकित
-
संपादकीय…. ‘लोकशाही’च्या ज्ञानोत्सवाची दीपावली आवश्यक!
सर्व वाचकांना मित्रांना, हितचिंतकांना, तसेच काबाडकष्ट करून जीवन जगणाऱ्या मजुरांना- नोकर वर्गाला आणि अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच समस्त भारतीयांना दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा! आम्ही व्यक्तिशः लाखो करोडो पणत्या नाही लावू शकत. तेवढे सामर्थ्य आमच्याकडे नसते. मात्र `मी’ एक जरी पणती लावून अंध:कारावर माझ्यापुरता का होईना; मात करू शकतो. ज्या समाजात- ज्या देशात मी राहतो; त्या
-
मैत्रीचा समर्थ आधार असलेल्या `मायकल’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
सदैव स्मरणात असणाऱ्या आमच्या एका मित्राचं नाव आहे; मायकल परेरा! पराकोटीच्या जिवाभावाची मैत्री जपणारा, मैत्री फुलविणारा आमच्या ह्या लाडक्या दोस्ताचा आज वाढदिवस! त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! त्याला त्याच्या निरंतर जीवनात सुख, समाधान, आनंद, यश, सुकीर्ती, धन, ऐश्वर्य आणि सदृढ आरोग्यासह दिर्घायुष्य लाभो; ही ईश्वर चरणी प्रार्थना! मायकलने इएसआयएसमध्ये ३५ वर्षे नोकरी केली. त्या काळात
-
संपादकीय… अमृतमहोत्सवी स्वातंत्र्याची नवी विधायक व्यवस्था निर्मितीची आवश्यकता!
प्रथम स्वातंत्र्यसैनिकांना व शूर सैनिकांना साष्टांग दंडवत! स्वातंत्र्यसैनिकांच्या आणि नंतर ७५ वषेॅ शूर जवानांच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या स्वतंत्र देशाच्या यज्ञाचा लाभ आम्ही घेत आहोत. त्यांच्याबद्दल मन:पुर्वक कृतज्ञता व्यक्त व्हायला पाहिजे. येणारा प्रत्येक क्षण त्यांच्यामुळे असतो, ही भावना सदैव ठेवली पाहिजे. त्यांचा आदर्श आमच्यासमोर नियमित असल्यावर आमच्याकडून भारत देशाच्या जबाबदार नागरिकाची कर्तव्य संपन्न होतील. देशाच्या स्वातंत्र्यासाठी
-
सह्याद्रीचे प्रभू-त्व- सन्मा. सुरेश प्रभु
(श्री. विजय केनवडेकर हे भाजप सिंधुदुर्गचे जिल्हा चिटणीस आणि सिंधुदुर्ग जनशिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी २०१६ साली सन्मा. सुरेश प्रभु यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारा लेख लिहिला होता. तो पुन्हा सन्मा. सुरेश प्रभु यांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रसिद्ध करीत आहोत! ह्या लेखातून मालवणचे सुपुत्र आणि भारताचे शेरपा सन्मा. सुरेश प्रभु यांच्या कार्याची थोडक्यात ओळख होते आणि त्यांच्याबद्दल अभिमान
-
लेखांक चौथा- नरकयातना विरोधात आक्रोश! जबाबदारी कोणाची?
कालच जोगेश्वरी (पश्चिम) येथील साईपवन एसआरए प्रकल्पामधील सभासदांचा आक्रोश आणि उद्रेक बघितला. कायद्याला हातात न घेता लोकशाही मार्गाने जेव्हा अन्यायग्रस्तांचा उद्रेक होतो तेव्हा अन्यायग्रस्तांचा मोठेपणा तसेच लोकशाही तत्त्वांना मानण्याची वृत्ती समोर येते; म्हणूनच त्यांच्या मागण्या दुर्लक्षित करून चालणार नाहीत; हे जबाबदार असलेल्या सर्वांनी ध्यानी घ्यावे! `लोकशाहीला अभिप्रेत असलेल्या मार्गावरून होणाऱ्या आंदोलनाला किंमतच द्यायची नाही!’ ही
-
मित्रत्व आणि सामाजिकत्व जपणारा निष्ठावंत!
मान. श्री. शिवाजी राणे यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा! मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिक लोकाधिकार समितीचे जेष्ठ नेते व माजी उपाध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी माननिय श्री. शिवाजी राणे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! वाढदिवसादिवशी वाढदिवस असणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीचे गुणगान गावेत, त्याच्या सदगुणांविषयी भरभरून बोलावे जेणेकरून ते सदगुण थोड्याशा प्रमाणात का असेना आपल्याकडे येतात; असा प्रघात असल्याने आमचे
-
`ती’ फाउंडेशनच्या सॅनिटरी पॅड बँकचा पाचवा वर्धापन दिन आणि कार्य हिमालयाएवढे…
आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांच्या संकल्पनेतून सुरु झालेला कौतुकास्पद उपक्रम! आदर्श लोकप्रतिनिधी आपल्या संकल्पनेतून समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टी सहजपणे पुरवू शकतो. सामाजिक स्वास्थ्य बिघडविणाऱ्या जुनाट विचारांवर – रुढींवर नव्या आधुनिक विचारांनी मात करून सामाजिक क्रांती यशस्वी करू शकतो. त्यासाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव आणि प्रामाणिकपणा असावा लागतो आणि अशाप्रकारचे कौतुकास्पद कार्य `ती’ फाऊंडेशनच्या माध्यमातून आमदार भारतीताई
-
लेखांक तिसरा- रखडलेल्या एसआरए योजनांची ईडी, सीबीआय, आयटी आणि पोलिसांकडून न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी आवश्यक!
मागील दोन लेखांमध्ये एसआरए अर्थात मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा प्रारंभ कसा होतो? झोपडी मालकांची फसवणूक कशी केली जाते? बिल्डर अर्थात विकासक गब्बर कसे होतात आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे राजकीय नेते कष्टकरी झोपडी मालकांच्या फसवणुकीला कसे पाठबळ देतात? याबाबत उदापोह केला होता. दोन्ही लेख वाचल्यानंतर अनेकांनी संपर्क साधून एका महत्त्वाच्या विषयावर लिखाण सुरु केल्याबद्दल कौतुक केले. आज
-
आदर्श पितृभक्त : छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासोबत मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. आपलेच हितशत्रू, परकीय शत्रू वा परंपरागत शत्रू या सर्वांवर आपले निष्ठावान सहकारी, राजमाता जिजाऊ – छत्रपती शहाजी महाराज यांची शिकवण आणि अलौकिक बौद्धिक सामर्थ्य यांच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची पताका सर्वदूर पसरवली. याकामी त्यांच्यावर अनेक प्रसंग आले. ज्यातून ते सहीसलामत बाहेर


