विशेष लेख
-
संपादकीय- आदरार्थी सामर्थ्यशील व्यक्तिमत्व!
सन्मानिय श्री. शशिकांत मोरे साहेबांच्या कार्याला सलाम आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा! सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे आणि कार्यक्षमतेने कार्य करताना नैतिकता जोपासणारी माणसं विरळ असतात म्हणूनच असं व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या संपर्कात येतं तेव्हा ते नेहमीच स्मरणात राहतं. कुठल्याही सामाजिक प्रश्नांना त्यांच्याकडे नुसतं उत्तरच नसतं तर ते आक्रमकपणे तो प्रश्न पूर्णपणे सोडवितात. त्यामुळे अशा व्यक्तींना नेहमीच समाजकारणात आदराने
-
संपादकीय- सामान्यांना संकटात टाकणारा रिक्षा बंद यापुढे होता कामा नये!
काल रात्री उशिराने सोशल मीडियावरून बातमी आली की, उद्या म्हणजे २१ नोव्हेंबरला संपकरी एसटी कामगारांना पाठींबा देण्यासाठी रिक्षा, सहा सीटर, मॅझिक आणि खाजगी प्रवासी वाहतूक कणकवली तालुक्यात बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याबाबत दुसरी बाजू जाणून घेणे अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकवेळी `बंद’ ठेऊन गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालक मालकांना आणि जिल्ह्यातील
-
मैत्र….
वाढदिवसादिवशी मित्रांकडून मिळाली चिरंतर स्मरणात राहणारी अनोखी भेट! इ. एस. आय. एस. मध्ये मी ३५ वर्षे नोकरी केली. अनेक चांगले सहकारी लाभले. ते माझे जीवाभावाचे मैत्र बनले. त्यांच्या मैत्रीच्या सुखावणाऱ्या ‘नॉस्टॅल्जिक’ करणाऱ्या खूप आठवणी आहेत. एक आठवण २१ सप्टेंबर २०११ ची आहे. दहा वर्षे झाली त्या गोष्टीला. त्यादिवशी माझा वाढदिवस होता. “अंधेरीतील Karl Residency हॉटेलमध्ये
-
कोकणातील नेत्यांची बदनामी थांबवा!
सूर्यावर थुंकण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत राहिल्याने थोबाडावर स्वतःच्याच थुंकीचे थरावर थर लागले तरी स्वतःची थुंकलेली थुंकी चाटण्यात धन्यता मानणारे कित्येक नेते पक्षाच्या प्रमुखांनी पोसलेले असतात. कारण त्यांचा वापर कधीही कसाही करून घेता येतो. त्यांना माहीमच्या खाडीत फेका किंवा कमळात बसवा; त्यांना कशाचीही पडलेली नसते. फक्त समोरच्यावर खोटेनाटे आरोप करीत राहायचे आणि समोरच्याला संपविण्यासाठीच काम
-
कोकणच्या महामार्गाची ५ सप्टेंबरला भव्य जनआंदोलन… आता तरी शासन लक्ष देणार का?
सिंधुदुर्ग (संतोष नाईक):- कोकणात जाणारा महामार्ग नेहमीच दुर्लक्षित होतो आणि तो महामार्ग मृत्यूचा महामार्ग बनलाय. महामार्ग अपूर्णावस्थेत असून पर्यायी व्यवस्था नसल्याने जीवघेणा प्रवास करताना आजपर्यंत अनेकांचे जीव गेले आहेत. तरीही प्रशासनाला-सरकारला जाग येत नाही. त्यासाठी कोकण हायवे समन्वय समितीतर्फे रविवार दिनांक ५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत मानवी साखळी जन आंदोलन आणि
-
शिक्षणासह जीवन संपन्न करण्याचे तंत्र शिकविणारे पालव सर अनंतात विलीन झाले!
अतिशय दुःखदायक बातमी आली. अक्षरशः धक्काच बसला. असं कधी वाटलं नव्हतं… कारण त्यांचं जाण्याचं वय नव्हतं. अचानक आलेल्या बातमीने सरांबद्दलच्या स्मृती जागृत झाल्या आणि अश्रूंना बांध घालावा लागला! आमचे लाडके पालव सर दोन दिवसापूर्वी अनंतात विलीन झाले. कणकवलीच्या एस. एम. हायस्कूलमध्ये इयत्ता आठवी ते बारावी दरम्यान इलेक्ट्रिकल आणि इंजीनियरिंग ड्रॉईंग हा विषय शिकविणारे अनिल पालव
-
युवकांच्या रोजगाराचा जीवघेणा प्रवास थांबायला हवा!
अष्टपैलू खेळाडू गीतेश गोपाळ गावडे अवघ्या २८ वर्षाचा तरुण. वेंगुर्ले तालुक्यातील मठ गावचा हा तरुण वास्को (गोवा) येथे शिपिंग कंपनीत कामाला जायचा. संचारबंदीच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरु असल्याने आड मार्गाने नोकरीवर (वास्को-गोवा) जाण्याशिवाय दुसरा पर्याय गीतेश गोपाळ गावडे या युवकाकडे नव्हता. हा आड मार्गच त्याच्या जीवावर बेतला. २३ जुलै रोजी सकाळी पोलीसांची नाकाबंदी चुकवून बांदा
-
सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेचा सावळा गोंधळ!
फक्त कणकवली रेल्वे स्टेशनवरच ठराविक वेळेत उतरणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट का? कणकवली (प्रतिनिधी):- फक्त कणकवली रेल्वे स्टेशनवर सकाळी साडेसहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत उतरणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येते आणि रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, ओरोस, कुडाळ, सावंतवाडी ह्या रेल्वे स्टेशनवर मात्र कुठलीही टेस्ट केली जात नाही. आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट सुद्धा चार पाच दिवसांनी येतो.
-
लोकांनी मान्य केलेले नेतृत्व : लोकमान्य टिळक
लेखक:- श्री. माधव विश्वनाथ अंकलगे सर, मु. पो. – वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३. संपर्क – ९७६४८८६३३०, ९०२१७८५८७४ सध्या सर्वत्र कोविड – १९ या आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक नियमावली निर्गमित करण्यात आली आहे. त्यातच दरवर्षीप्रमाणे लोकांची पीकविमा भरण्यासाठीची लगबग सुरू आहे. त्यासोबतच निसर्गाच्या आपत्तीमुळे आलेल्या महापुरात उध्वस्त झालेले सर्वसामान्य लोक मदतीच्या प्रतीक्षेत
-
चिपळूणला श्रमदानासाठी तयार असणाऱ्या हातांची गरज आहे!
हा लेख चिपळूण जवळील घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यंत्र अभियांत्रिकी विभागामध्ये साहाय्यक प्राध्यापक श्री. अमेय विनोद फणसे B.E.(Mechanical engineering), M.E.(Design engineering) यांनी लिहिला आहे. उच्चशिक्षित समाजभान असलेली व्यक्ती जेव्हा काही मुद्दे ठेवते त्यावर चिंतन करणे गरजेचं ठरतं; कारण त्यातूनच वास्तव सहजपणे समजून येतं!

