सिंधुदुर्ग
-
जिल्हा माहिती कार्यालयातून प्राप्त सिंधुदुर्ग वृत्त
अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर खबबदारीचे आवाहन- पर्यटनस्थळी सतर्कतेचा इशारा सिंधुदुर्गनगरी:- प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून हवामान विषयक मिळालेल्या पूर्व सूचनेनुसार जिल्ह्यात 27 जुलै 2023 पर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे जिल्ह्यासाठी ऑरेज अलर्ट देण्यात आलेला आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पावसात अनेकजण वर्षा पर्यटनासाठी धबधब्यात जातात. घारपी,
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
प्रशासनाने सतर्क राहून युध्दपातळीवर उपाय योजना करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.) : गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. आगामी काळात पावसाचा अंदाज पाहता प्रशासनाने सतर्क राहून युध्दपातळीवर उपाय योजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले.
-
दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 77.4 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 77.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 36.5 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1918.0 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत: देवगड- 16.8 (1595.2), मालवण- 18.9 (1880.9), सावंतवाडी- 58.3 (2302.7), वेंगुर्ला- 25.4
-
अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या माध्यमातून जनजागृती करावी – उपजिल्हाधिकारी
सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.) : अंमली पदार्थ विरोधी मोहिम जिल्ह्यात अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने संबंधित विभागाने विविध माध्यमातून या मोहिमची जनजागृती करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी श्री. मठपती यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को कोऑडीनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची एकत्रित बैठक आज झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, अन्न औषध
-
सावंतवाडी- वृत्तपत्रविद्या पदविका प्रवेश प्रक्रिया सुरु
सावंतवाडी:- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्रात वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाची २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. एक वर्ष मुदतीचा हा अभ्यासक्रम आहे. पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच माहिती व जनसंपर्क क्षेत्रासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. नोकरी वा शिक्षण पूर्ण करता करता हा अभ्यासक्रम
-
कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 119.8 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि.24 (जि.मा.का.) : जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 119.8 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 83.2 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1880.8 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.: देवगड- 46.2 (1577.2), मालवण- 106.1 (1862.0), सावंतवाडी- 94.3
-
अठरा वर्षे पूर्ण झालेल्यांना मतदार यादीत नाव नोंदणीचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का.) : जिल्ह्यातील 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या नागरिकांनी व अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसलेल्या सर्व पात्र नागरीकांनी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विहित नमुन्यातील अर्ज भरुन आवश्यक कागदपत्रासह आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2024
-
कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी इच्छूक असल्यास नोंदणीचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी:- (जि.मा.का.) : जिल्ह्यातील महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, माध्यमिक विद्यालय, औद्योगिक आस्थापना, असोसिएशन, सामाजिक संस्थांच्या मार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासाठी इच्छूक असल्यास www.skillndia.gov.in या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ग.प्र.बिटोडे यांनी केले आहे. पोर्टलवर नोंदणी केल्यावर आपणांस TP/TC नंबर दिले जातील. त्यांनतर आपण महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास
-
निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला अनेक मान्यवरांची भेट!
सिंधुदुर्ग:- तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला लेखक, अभिनेते, ज्येष्ठ नाट्य समिक्षक अरुण घाडिगावकर यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर, डॉ. पावसकर, अक्षरप्रेमी उपक्रमशील शिक्षक बी. के. गोंडाळ यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटी दरम्यान संदेश पत्र संग्रहातील विविध मान्यवरांची पत्रे पाहून अरुण घाडिगावकर यांनी विविध मान्यवरांच्या आठवणींना उजाळा दिला. तळेरे येथील निकेत
-
नोकरीची संधी- आरोग्य विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता मुलाखती होणार
आरोग्य विभाग सिंधुदुर्ग अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकूण ५६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २२ फेब्रुवारी २०२३ आहे. अधिकृत वेबसाईट – http://arogya.maharashtra.gov.in/1035/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%83%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%a0 कोंकण कृषी विद्यापीठात नोकरीची उत्तम संधी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ रत्नागिरी अंतर्गत “तांत्रिक सहाय्यक, मशीन









