सिंधुदुर्ग
-
शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत सकारात्मक मध्यमार्ग काढू! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का):- `शिक्षकांच्या जुन्या पेन्शन बाबत कायदेशीर, आर्थिक आणि तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू!’ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन वेंगुर्ला येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाची सुरुवात झाली. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री
-
वेंगुर्ला शहर नळ पाणी पुरवठा योजना आणि झुलता पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का):- वेंगुर्ला शहर नळ पाणी पुरवठा योजना टप्पा क्रमांक २, निशाण धरणाची उंची २.५ मीटरने वाढविणे आणि वेंगुर्ला नवाबाग बीच येथील जलबांदेश्वर मंदिर जवळ बांधण्यात आलेल्या झुलता पुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर,
-
`गेटवे ऑफ इंडिया’तून मिळतोय एक्सेसेबल इंडियाचा संदेश
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- बहुचार्चित काळाघोडा फेस्टिवलला सुरुवात झाली आहे. येथे मुख्य प्रवेश द्वारावर असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या प्रतिकृतीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या प्रवेशद्वारातून एक्सेसेबल इंडियाचा सामाजिक संदेश देण्यात आला आहे. कला दिग्दर्शक सुमित पाटील यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती साकारली आहे. अडथळाविरहित वातावरण निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे. देशाच्या एकुण
-
सहकार महर्षी स्व. सहदेव फाटक यांच्या ९९ व्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन!
मुंबई:- माजी अपना परिवार प्रमुख, सहकार महर्षी स्व. सहदेव फाटक यांच्या ९९ व्या जयंती निमित्त अपना परिवार व सोशल सर्व्हिस लीग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन २८ जानेवारी, २०२३ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल हॉल, दामोदर हाॅल, डॉ आंबेडकर रोड, परेल, मुंबई-१२ येथे करण्यात आले आहे.
-
आचार्य रविंद्रसिंह मांजरेकर यांना `महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार प्रदान!
मुंबई (मोहनसिंह सावंत):- वेंगुर्ल्याचे सुपुत्र आचार्य रविंद्रसिंह आप्पा मांजरेकर यांना नुकताच `महाराष्ट्र रत्न’ हा मानाच्या पुरस्कार प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात देण्यात आला. त्यावेळी आचार्य मांजरेकर यांना गुरुप्रसाद दिगंबर गुरुजी यांच्या शुभहस्ते सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल आचार्य मांजरेकर यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. अपराध निवारण भ्रष्टाचार विरोधी समिती आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार
-
अन्नपूर्णेचा कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास! (भाग- १)
सौ. मुग्धा मोहन सावंत अर्थात मुग्धा काकूंचा आज एकसष्टवा वाढदिवस! त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! मुग्धा सावंत यांचा तीस-पस्तीस वर्षाचा प्रवास कष्टाचा, मेहनतीचा, त्यागाचा आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाकरिता सर्वकाही करीत असताना आपल्या भावंडांना-नातेवाईकांना जीवनात-संसारात उभं राहण्यासाठी जे बळ दिलं; ते आदर्शवत असंच आहे; शिवाय नेहमी प्रेरणादायी असं आहे. म्हणून त्यांच्या जीवन प्रवासाचा आलेख शब्दांकित
-
असलदे गावातील विकासाच्या वटवृक्षाला सलाम!
गावाचे प्रथम सरपंच अंकुश डामरे यांना नव्वदाव्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! असलदे गावचे प्रथम सरपंच आणि नांदगांव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक सदस्य आणि उपाध्यक्ष श्री. अंकुश डामरे यांचा आज नव्वदावा वाढदिवस! त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लेख लिहिण्यास सुरुवात कुठून करावी? हा प्रश्न उभा राहिला! कारण त्यांच्याकडील असलेला दीर्घ अनुभव आम्ही नेहमी लक्षपूर्वक ऐकत असतो. संधी मिळताच आम्ही
-
मित्रत्व आणि सामाजिकत्व जपणारा निष्ठावंत!
मान. श्री. शिवाजी राणे यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा! मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानिक लोकाधिकार समितीचे जेष्ठ नेते व माजी उपाध्यक्ष व विशेष कार्यकारी अधिकारी माननिय श्री. शिवाजी राणे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! वाढदिवसादिवशी वाढदिवस असणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीचे गुणगान गावेत, त्याच्या सदगुणांविषयी भरभरून बोलावे जेणेकरून ते सदगुण थोड्याशा प्रमाणात का असेना आपल्याकडे येतात; असा प्रघात असल्याने आमचे
-
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सत्यवान रेडकर यांचा समाज गौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई:- ‘तिमिरातूनी तेजाकडे’ ही शैक्षणिक चळवळ संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात राबविणारे शिक्षण प्रसारक, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र सत्यवान रेडकर यांना सुनिर्मल फाउंडेशन, मुंबईकडून सुनिर्मल समाज गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मुंबई सीमाशुल्क विभागांत कनिष्ठ अनुवाद अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्री. रेडकर यांचे स्पर्धा परीक्षेसाठी सुरू असलेल्या कार्याची दखल घेऊन
-
`तिमिरातूनी तेजाकडे’ ह्या संकल्पनेतून श्री. सत्यवान रेडकर यांचे महाडमध्ये ९३ वे मोफत मार्गदर्शन शिबिर संपन्न
महाड:- युथ क्लब महाड आणि सुनील गांधी क्लासेस आयोजित मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक मध्ये नुकतेच संपन्न झाले. `तिमिरातूनी तेजाकडे’ ह्या संकल्पनेतून मार्गदर्शक श्री. सत्यवान यशवंत रेडकर ह्यांनी महाड मध्ये ९३ वी मोफत मार्गदर्शन शिबिर घेतली. ह्या शिबिर मध्ये महाड मधील विविध वयोगटातील मुले मुली आणि पालक असे २०० हून



