सिंधुदुर्ग

  • राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान

    मुंबई:- पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २०२० या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी (दि. २१ मार्च) समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. दहा पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आली तर

    read more

  • श्रीमाऊली `देवि’चा दास गेला देवीच्या सेवेशी हजर!

    आज सकाळी देविदास राजाराम परब यांचे ६२ व्या वर्षी दिवंगत झाले. अतिशय दुःखद बातमी! त्यांच्या बाबतीत बोलणे आणि लिहिणे खरोखरच सहजसोपे नाही. आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता; पण अचानक काळाने घाला घातला आणि देविदास परबांचं पार्थिव घरी आणावं लागलं. अशा व्यक्ती जेव्हा अशा अचानक सोडून जातात तेव्हा शब्द निःशब्द होतात आणि नयनातून आपोआप अश्रू

    read more

  • संपादकीय- कोकण सर्वांगिण विकसित करण्यासाठी प्रयास करणारा नेता हरपला!

    प्राध्यापक महेंद्र नाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला वेदनादायी होती; कारण खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान आणि सर्वांगिण विकसित कोकणचे स्वप्न पाहणारा नेता म्हणून त्यांनी त्यासाठी केलेले प्रयास आम्ही अगदी जवळून पाहिले. त्यांच्यासारखा अभ्यासू नेता जेव्हा जातो तेव्हा अतीव दुःख होते. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजात जन्माला आलेले नाटेकर सर यांनी समाजासह बहुजन समाजाच्या आणि कोकणच्या विकासासाठी जीवनभर राखलेला समर्पित

    read more

  • गांधी विचार कृतीत आणणाऱ्या जेष्ठ आदर्शाला सलाम!

    ज्येष्ठ गांधीवादी- सर्वोदयी कार्यकर्ते जयवंत मटकर यांचे पुण्यात निधन! गोपुरी आश्रमाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते, महात्मा गांधी प्रस्थापित वर्धा आश्रमाचे माजी अध्यक्ष, सर्वोदयी परिवाराचा आधारवड जयवंत मटकर यांचे मंगळवार दिनांक- १४, मार्च, २०२२ रोजी सायंकाळी ८.४५ वाजता पुणे येथे वयाच्या ८१ व्या वर्षी दुःखद निधन झाले. जयवंत मटकर यांनी ऐन तारुण्यात गांधी विचारांच्या चळवळीत

    read more

  • फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र लोके यांचा ३० वर्षाच्या सेवेसाठी टाटा मेमोरियल रुग्णालयातर्फे सन्मान!

    मुंबई:- फिनिक्स फाऊंडेशन ह्या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्मानिय जितेंद्र लोके यांनी कर्करोगावर उपचार करणाऱ्या जागतिक किर्तीच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात ३० वर्षे सेवा दिल्याबद्दल त्यांचा टाटा रुग्णालयात ८१ व्या `हॉस्पिटल डे’ कार्यक्रमात स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानिय जितेंद्र लोके यांना मिळालेल्या सन्मानाने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले

    read more

  • महिला दिनानिमित्त नांदोस गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षा सौ. संजना गावडे यांचा सत्कार!

    मालवण- महिला दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने मालवण तालुक्यातील नांदोस गाव येथील गावच्या तंटामुक्ती अध्यक्षा सौ. संजना सचिन गावडे यांचा सत्कार करण्यात आला. सौ. संजना सचिन गावडे नांदोस ग्रामसचिवालयलात सचिव म्हणून काम पाहतात; त्याचप्रमाणे त्या पंचक्रोशीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. त्याचप्रमाणे महिलांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करीत असतात, तसेच ह्युमन राईट असोसिएशन

    read more

  • ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने श्रीमती जयश्री परब सन्मानित

    कणकवली- महिला दिनानिमित्ताने ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने कणकवली – परबवाडी येथील आजीबाईचा बटवा जपण्याचे कार्य निःस्वार्थीपणे अनेक वर्षे करणाऱ्या श्रीमती जयश्री परब यांना सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. श्रीमती जयश्री परब यांनी परंपरागत औषधांच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर उपचार करून लोकोपकारी कार्य केले. अनेक बालकांना, महिलांना अचानक उद्भवणाऱ्या आणि गंभीर आजारातून बरे केले. आजीबाईचा बटवा

    read more

  • बेनी बुद्रुक येथे पेजे महाविद्यालयामार्फत रस्ता दुरुस्ती आणि वनभोजनाचा कार्यक्रम संपन्न

    रत्नागिरी:- लोकनेते शामरावजी पेजे वरिष्ठ महाविद्यालय, शिवार आंबेरे, रत्नागिरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक येथील माळवाडी ते मळेवाडी रस्ता दुरुस्तीचे काम नुकतेच करण्यात आले. सदर कामाचे उदघाटन सकाळी शिवार आंबेरे येथील श्रमिक किसान सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय नंदकुमारजी मोहिते यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ग्रामपंचायत बेनी बुद्रुकचे सरपंच संतोष धामणे, जेष्ठ

    read more

  • सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघ, गोपुरी आश्रमच्या अध्यक्षपदी पुन्हा प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची निवड!

    कणकवली:- कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन प्रस्थापित रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा खादी संघ, गोपुरी आश्रम (वागदे ता. कणकवली) ची सन २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांकरिता झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढील कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली. विद्यमान अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची अध्यक्ष पदावर तर सचिव मंगेश नेवगे यांचीही सचिव पदावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी

    read more

  • सिंधुदुर्गातील ह्युमन राईट असो. फॉर प्रोटेक्शनचे परीक्षा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आणि तयारी!

    सिंधुदुर्ग:- आजपासून बारावीच्या परीक्षा सुरु होत असून त्यानंतर दहावीच्याच्याही परीक्षा सुरु होणार आहेत; परंतु अद्यापही एसटीचा संप सुरु असल्याने परीक्षा केंद्रापर्यंत पोहचायचे कसे? असा मोठा गंभीर प्रश्न ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला असून त्यासाठी सिंधुदुर्गात ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ह्या संघटनेने वाहनधारकांना आवाहन करून विद्यार्थ्यांच्या सहकार्यासाठी तयारी दर्शवली आहे. सिंधुदुर्गात ह्युमन राईट असोसिएशन फॉर

    read more

You cannot copy content of this page