सिंधुदुर्ग
-
`तिमिरातूनी तेजाकडे’ शैक्षणिक चळवळीला कोकणात उत्स्फूर्त प्रतिसाद!
रत्नागिरी (प्रतिनिधी):- उच्च विद्याविभूषित, शिक्षणतज्ञ, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे श्री. सत्यवान यशवंत रेडकर, निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १८ डिसेंबर २०२१ पासून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला घेत आहेत; त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी आणि
-
संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता मोहीम
महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम देवगड:-तळेबाजार महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार- देवगड व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम विद्युत उपकेंद्र तळेबाजार, वरेरी रोड, तळेबाजार बाजार पेठ ते सिंधुदुर्ग जिल्हा बँक. या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, संस्थाप्रमुख, ग्रामस्थ, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गाडगे महाराज
-
निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला भेट ही पर्वणी! -अभिनेत्री अक्षता कांबळी
सिंधुदुर्ग:- “निकेत पावसकर यांच्या जगावेगळ्या छंदाची नोंद लिम्का बुक किंवा गिनिज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये व्हावी, अशा आमच्या शुभेच्छा आहेत. देशातीलच नव्हे तर जगातीलही विविध व्यक्तिंचे संदेश त्यांनी एकत्र करुन वेगळाच सांस्कृतिक ठेवा जोपासला आहे. या अक्षर घराला भेट म्हणजे पर्वणी आहे!” असे प्रतिपादन अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी केले. तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत
-
नगर वाचनालय कणकवलीच्या अध्यक्षपदी आमदार नितेश राणे यांची फेरनिवड
महम्मद हनीफ पीरखान यांची कार्यवाहपदी निवड कणकवली:- नगर वाचनालय कणकवली या संस्थेच्या कार्यकारणी मंडळाच्या कालावधीची मुदत संपल्यामुळे नवीन कार्यकारीणी मंडळाची निवड करण्यासाठी नुकतेच मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत आमदार नितेश राणे यांची अध्यक्षपदी पुन्हा एकदा एकमताने निवड करण्यात आली. तर महम्मद हनीफ आदम पीरखान यांची कार्यवाह पदी आणि सहकार्यवाह म्हणून डी.पी.तानवडे यांची
-
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिरात साजरा
देवगड:- महात्मा गांधी विद्या मंदिर तळेबाजार व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस हायस्कूलमध्ये उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हा उपाध्यक्ष नंदन अंकुश घोगळे यांनी मानव व मानवाचे अधिकार समजावून सांगितले व मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शिक्षक
-
वृत्तवेध- भारतीय न्यायव्यवस्थेचे वास्तव!
शिवसेनेचे लोकसभेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश (वेतन आणि सेवाशर्ती) संशोधन विधेयक २०२१ ह्या विधेयकावर संसदेत आपली स्पष्टपणे मते नोंदवित असताना भारतीय न्यायव्यवस्थेचे वास्तव मांडले. हे वास्तव लोकशाहीला मारक आहे. ह्याचा विचार देशातील प्रत्येक नागरिकांनी तसेच देशाच्या कायदे मंडळाने केलाच पाहिजे; तरच देशातील गरीब, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला खऱ्याअर्थाने न्याय
-
लोककलाकार पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सत्कार
कुडाळ (प्रतिनिधी):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ जवळ पिंगुळी- गुढीपुर या छोट्याशा गावी गेल्या पाच दशकांहून अधिक आदिवासी लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले आहे. त्या कार्याच्या योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकारने यावर्षीच्या सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मानव अधिकार या दिनाचे औचित्य साधून पद्मश्री
-
माळगाव जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये एटीएम मशीन बसविण्याबाबत ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे निवेदन
मालवण (प्रतिनिधी):- माळगाव जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये एटीएम मशीन बसविण्याबाबत शाखेचे शाखाधिकारी श्री. मांजरेकर आणि कर्मचारी सौ. साळसकर मॅडम यांना ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे मालवण तालुका उपाध्यक्ष श्री. राजेशकुमार लब्दे आणि मालवण तालुका खजिनदार श्री.राजेंद्र सावंत यांनी निवेदन सादर केले. यावेळी बँक इमारत मालक श्री.मंगेश खोत आणि ग्रामस्थ श्री. रोहित हडकर उपस्थित होते. याबाबत शाखाधिकारी
-
`तिमिरातूनी तेजाकडे’ ह्या सामाजिक संस्थेची शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी शैक्षणिक चळवळ!
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी):- उच्च विद्याविभूषित, शिक्षणतज्ञ, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे श्री. सत्यवान यशवंत रेडकर, निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा १८ ते २४ डिसेंबर २०२१ च्या दरम्यान निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला घेणार आहेत. सदर व्याख्यानांसाठी कोणतेही
-
अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा अक्षरोत्सव परिवाराच्यावतीने सत्कार
तळेरे (प्रतिनिधी):- अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा तळेरे येथील अक्षरोत्सव परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. मल्लखांब या क्रिडा प्रकारातील योगदानाबद्दल तिला हा पुरस्कार मिळाला असून तिने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मल्लखांब या क्रीडा प्रकारात गेली १५ वर्षे दिलेल्या योगदानाबद्दल हिमानी परब हिला अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
