सिंधुदुर्ग
-
संपादकीय- सामान्यांना संकटात टाकणारा रिक्षा बंद यापुढे होता कामा नये!
काल रात्री उशिराने सोशल मीडियावरून बातमी आली की, उद्या म्हणजे २१ नोव्हेंबरला संपकरी एसटी कामगारांना पाठींबा देण्यासाठी रिक्षा, सहा सीटर, मॅझिक आणि खाजगी प्रवासी वाहतूक कणकवली तालुक्यात बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याबाबत दुसरी बाजू जाणून घेणे अत्यंत महत्वाचे असून प्रत्येकवेळी `बंद’ ठेऊन गोरगरीब कष्टकरी सर्वसामान्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालक मालकांना आणि जिल्ह्यातील
-
स्व. सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त तळेरे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
तळेरे- स्व. सुनिल तळेकर चॅरीटेबल ट्रस्ट तळेरे व स्व.सुनिल तळेकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्व.सुनिल तळेकर यांच्या २४ व्या स्मृती दिनानिमित्त विविध भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. २६ नोव्हेंबर २०२१ स.९.३० वा विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय तळेरे येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. स.१०.०० वा. १० वी.१२.वी विद्यार्थी बक्षिस वितरण समारंभ तसेच
-
तळेरेत हायवेचे सर्व प्रश्न सोडविण्याचे उपविभागीय अभियंत्यांचे आश्वासन
तळेरेत हायवेच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महत्वपूर्ण बैठक व प्रत्यक्ष पाहणी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी मांडला २१ मुद्द्यांचा ऍक्शन प्लान उपविभागीय अभियंत्यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याची दिली ग्वाही तळेरे (संतोष नाईक)- येथील हायवेच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भात महत्वपूर्ण बैठक आज ग्रा.प. तळेरे येथे संपन्न झाली व हायवे संबंधित प्रत्यक्ष प्रलंबित समस्याची संयुक्त पहाणी करण्यात आली. सामाजिक
-
सिंधुदुर्गात ३० नोव्हेंबरपर्यंत मनाई आदेश
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): त्रिपुरा घटनेच्या अनुषंगाने सुरु असलेली आंदोलने, एस.टी. संपाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आंदोलने /निदर्शने होऊन तसेच इंधन दरवाढ व इतर कारणास्तव विविध संघटनांकडून होणारी आंदोलने- निदर्शने झाल्यास जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगाने जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी जिल्हादंडाधिकारी
-
जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत अभिजित राणे प्रथम
अक्षरोत्सव परिवार आणि मेधांश व श्रावणी कंप्युटर आयोजित जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत अभिजित राणे प्रथम तळेरे:- येथील अक्षरोत्सव परिवार, श्रावणी कंप्युटर एज्युकेशन व कासार्डे येथील मेधांश कंप्युटर इन्स्टिट्यूट आयोजित जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आला. स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त आयोजित केलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातून
-
डॉ. अनिल नेरूरकर प्रेरित तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरे आयोजित जिल्हास्तरीय किल्ले स्पर्धा संपन्न
आधुनिक जीवनाशी किल्ल्यांची सांगड घालून जीवन समृद्ध बनवा! -गटविकास अधिकारी जयप्रकाश परब तळेरे (प्रतिनिधी)- “फटाके वाजवून प्रदुषण करण्यापेक्षा बाजारात रस्त्याच्या बाजूला दुकान मांडून बसलेल्या आपल्या माणसांकडून पणती विकत घ्या. त्यामुळे त्यांचीही दिवाळी गोड होऊ द्या, पणती बनवणार्यांच्याही घरात पणती लागू द्या.” असे सांगतानाच इतिहास हा गड किल्ल्यांवरुन समजतो, त्यामुळे आधुनिक जीवनाशी किल्ल्यांची सांगड घालून जीवन
-
अप्पासाहेब पटवर्धन यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त गोपुरी आश्रमात कार्यक्रम संपन्न
नागरिकांना सुदृढ जीवन जगण्याचा विचार गोपुरी आश्रमाने द्यायला हवा! -विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री कणकवली (प्रतिनिधी):- “नागरिकांना स्वयंपूर्ण आणि सुदृढ जगण्याचा विचार देण्यासाठी कोकणचे गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांनी ७३ वर्षापूर्वी गोपुरी आश्रम उभारला. हाच विचार आपण सर्व समाजाने मिळून आबादीत ठेवायला हवा. गोपुरी आश्रम सक्षम झाला तर कोकणचा सांस्कृतिक ठेवा अबाधित राहण्यासाठी चांगली मदत होऊ शकेल!”
-
२५ वर्षांपूर्वी लिहिलेला लेख… सावधान! कोकणवासीयच कोकण विकतोय!
भविष्यात कोकणचा विकास होणार आहे. पण आज कोकणवासीय कोकणातल्या जमिनी पैशाच्या आशेसाठी विकत आहेत. ही अतिशय गंभीर बाब असून त्यासाठी योग्य प्रचार होणे आवश्यक आहे. कोकणवासियांनी यासाठी आजच विचार करून भविष्य उज्वल करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कोकणच्या विकासावर अनेक प्रकारे चर्चा करण्यात येत असते; पण आवश्यक असणाऱ्या गोष्टी करण्यात मात्र वेळ जातो. निवडणुकांपुरते कोकणच्या विकासाचे
-
मिठबावकर कुटुंबियांकडून गोपुरी आश्रमास थंड पाण्याचा कुलर प्रदान
कणकवली (प्रतिनिधी)- गोपुरी आश्रमात काही काळ वास्तव्यास असलेले चंद्रकांत रावजी मिठबावकर (मुळगाव मिठबांव, तालुका- देवगड, सध्या राहणार आर्यादुर्गा नगर वागदे, तालुका- कणकवली) यांचे, २३,सप्टेंबर २०१९ रोजी दुःखद निधन झाले होते. गोपुरीआश्रमाशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या स्मृती गोपुरी आश्रमात जागृत राहाव्यात याकरिता त्यांच्या पत्नी शुभदा मिठबावकर, मुलगे कमलेश व मयुरेश यांनी गोपुरी आश्रमामाला थंड
-
महामार्गासंबधीत समस्या तातडीने मार्गी लावण्याची लेखी हमी
सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांचे उपोषण मागे तळेरे (वार्ताहर):- येथील महामार्गालगतच्या शैक्षणिक संकुलांकडे महामार्ग ओलांडून तसेच महामार्गालगत चालत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात याव्या; ह्या आग्रही मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी वामनराव महाडिक विद्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी त्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणाकडून शासनस्तरावर दाखल झाल्याची

