सिंधुदुर्ग
-
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का): महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रवी पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी रविंद्र मठपती, उप जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, उपजिल्हाधिकारी शारदा पोवार, आरती देसाई, तहसिलदार प्रज्ञा काकडे, जिल्हा नियोजन अधिकारी श्री बुधावले, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, माविमचे
-
असलदे गावात कोकण विकासाचा सम्राट सन्मा. नारायणराव राणे यांचे स्वागत!
श्री देव रामेश्वराच्या पवित्र भूमीत असलदे गावात आज केंद्रीय मंत्री सन्मा. नारायणराव राणे यांचे आम्ही आमच्या कुटुंबियांतर्फे, मित्रमंडळींतर्फे आणि पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवारातर्फे सहर्ष स्वागत करीत आहोत! येथे क्लिक करून हेही वाचा! -संघर्षमय राजकीय जीवनाचा विजय! लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने का होईना… कोकण विकासाचा सम्राट सन्मा. नारायणराव राणे असलदे गावात येत असताना त्यांचे स्वागतास मला स्वतःला
-
रक्तदान शिबीर संपन्न करून साजरा केला वाढदिवस!
श्री. संतोष वाळके यांना ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा! आमचे मित्र श्री. संतोष वाळके यांचा वाढदिवस काल अनोख्या पद्धतीने पावाचीवाडी- नांदगाव (ता. देवगड, जिल्हा- सिंधुदुर्ग) येथे साजरा करण्यात आला. वाढदिवस म्हटला की मित्रमंडळींना पार्टी देणं, मौजमस्ती करणं आलंच! ह्यात काही वाईट नाही; पण तोच वाढदिवस जेव्हा सामाजिक बांधिलकी स्वीकारून केला जातो तेव्हा त्याचे मोल अनमोल
-
संपादकीय- समर्थ नेत्यालाच उमेदवारी!
येत्या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून विनायक राऊत यांची उमेदवारी निश्चितच झाली होती; कारण ते मागील १० वर्षांपासून खासदार आहेत तसेच महाविकास विकास आघाडीतील काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष आपली ताकद पाहून ह्या जागेवर आपला हक्क दाखवू शकले नाहीत. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी मिळणे सहज
-
पोलीस दलाकडून जेष्ठ नागरिकांकरिता जनजागृती अभियानाचे आयोजन
सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये अनेक गावांमध्ये ज्येष्ठ नागरिक एकटेच राहतात, तसेच, काही ज्येष्ठ नागरिक दांपत्यांची मुले बाहेरगावी नोकरीनिमित्त राहत असल्याने एकटेच राहत असतात. अशा परिस्थितीत त्यांची सायबर व आर्थिक फसवणूक होताना दिसून येत आहे. काही ज्येष्ठ नागरीकांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करण्याची माहिती नसल्याने ते कोणत्यातरी अनधिकृत मल्टि लेव्हल चैन मार्केटींगच्या कंपनीमध्ये किंवा
-
जिल्ह्यात ‘नवतेजस्विनी’ प्रदर्शनाचे आयोजन
सिंधुदुर्गनगर:- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) (महाराष्ट्र शासन अंगीकृत) जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यातील बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे “नवतेजस्विनी” तालुका स्तरीय भव्य प्रदर्शन दि. २४ ते २७ फेब्रुवारी रोजी सावंतवाडी गार्डन बाहेरील पटांगण, मोती तलाव जवळ आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा समनवय अधिकारी नितीन काळे यांनी दिली. जिल्ह्यातील गरीब, गरजू, मागासवर्गीय, विधवा, परीतक्ता,
-
१६-१८ फेब्रुवारीला सिंधुदुर्गात सत्यवान रेडकर सरांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
सिंधुदुर्ग:- कोकणातील विद्यार्थ्यांचे प्रशासकीय स्वराज्य असावे ही अभिनव संकल्पना “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक चळवळीद्वारे राबविणारे कोकणपुत्र, श्री. सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार) हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना खालील वेळापत्रकाप्रमाणे स्पर्धा परीक्षांसंदर्भात निःशुल्क मार्गदर्शन प्रदान करणार आहेत. जवळपास २४० व्याख्यानांद्वारे त्यांच्या अमोघ वाणी व मार्गदर्शनाने प्रेरित होऊन असंख्य विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळू
-
सिंधुदुर्ग जिल्हा वार्तापत्र…
नमो महारोजगार मेळाव्यासाठी उद्योजक व उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन! सिंधुदुर्गनगरी, दि.8 (जि.मा.का): कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ठाणे जिल्ह्यामध्ये आयलँड ग्राउंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे, (पश्चिम) येथे दि. 24 व 25 फेब्रुवारी रोजी नमो महारोजगार कोंकण विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारानी कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर
-
लोक न्यायालय व जनजागृती शिबिरासाठी मोबाईल व्हॅनचे उद्घाटन
सिंधुदुर्गनगरी (हेमलता हडकर):- उच्च न्यायालय यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्यातर्फे लोक न्यायालय व जनजागृती शिबीर घेण्यासाठी मोबाईल व्हॅनचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. बी गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व सत्र न्यायाधीश एस एस जोशी, जिल्हा न्ययाधीश व सत्र न्यायाधीश-2
-
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निष्कलंक, सेवाभावी, चिकित्सक आणि ध्येयवादी व्यक्तिमत्व असणाऱ्या अॅड. निर्मलाताई सामंत – प्रभावळकर यांची निवड!
मुंबई (मोहन सावंत):- मुंबईच्या माजी महापौर आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा. अॅड. निर्मलाताई सामंत – प्रभावळकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्तीचे पत्र अॅड. निर्मलाताई सामंत – प्रभावळकर यांच्याकडे सुपूर्द केले आहे. यावेळी, सरचिटणीस, रायगड जिल्हा प्रभारी,










