सिंधुदुर्ग
-
सिंधुदुर्गात आजअखेर 37 हजार 168 रुग्ण कोरोनामुक्त, १ हजार ७६ मृत्यू
सिंधुदुर्गनगरी, दि. 5 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 37 हजार 168 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 272 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि.
-
प्रवास करून परतणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांनीही केली चाचणी!
सिंधुदुर्गनगरी, दि. 05 (जि.मा.का.) – केरळ राज्यातील मूळ गावाहून सिंधुदुर्गनगरीत आज सकाळी परतलेल्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी आणि पती सबरीश पिल्लई यांनी कुडाळ रेल्वेस्थानकात कोरोनाची चाचणी आरोग्य पथकाकडून करून घेतली. जिल्ह्यात परतणाऱ्या सर्वच प्रवाश्यांनी भीती न बाळगता आपली कोरोना चाचणी करुन सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले. जिल्हाधिकारी श्रीमती मंजुलक्ष्मी या केरळ येथील आपल्या मूळगावी
-
सिंधुदुर्गातील पाऊस व पाणीसाठा, सर्वाधिक पाऊस कुडाळ तालुक्यात
सिंधुदुर्गनगरी, दि. 05 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 21.75 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1163.26 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग –
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 04 (जि.मा.का.):- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 351.2130 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.51 टक्के भरले आहे. मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत:- मध्यम पाटबंधारे प्रकल्प:– देवघर – 57.9700, अरुणा – 32.7639, कोर्ले- सातंडी – 25.0930. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे:– शिवडाव – 2.6480, नाधवडे – 2.6482, ओटाव
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 13.55 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 04 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस सरासरी 13.55 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1141.51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत:- दोडामार्ग – 01(1228), सावंतवाडी – 17(1406.10), वेंगुर्ला – 19.40(915), कुडाळ – 02(1009), मालवण
-
वरळी येथील लसीकरण शिबिरांना मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट
मुंबई, दि. 4:- वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण शिबिरास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली. त्याचबरोबर वरळी सी फेस म्युनिसिपल शाळेत पोलीस बांधवांच्या परिवारासाठी आयोजित लसीकरण केंद्रासही भेट देऊन पाहणी केली. कोळी भवन येथे या परिसरातील कोळी बांधवांसाठी शिबिर आयोजित करण्यात आले असून वरळी म्युनिसिपल शाळेत पोलिसांच्या कुटुंबियांना व परिसरातील
-
आजअखेर 36 हजार 990 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 914
आजअखेर 36 हजार 990 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 4 हजार 914 सिंधुदुर्गनगरी, दि. 4 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 36 हजार 990 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 914 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 343 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 04/7/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 343 (15 दुबार लॅब तपासणी ) एकूण
-
गडकिल्ले जतन व संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती
शिवनेरी, राजगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सुधागड आणि तोरणा किल्ल्यांचा समावेश मुंबई:- राज्यातील गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धनाच्या कामाचा तसेच त्या परिसरातील पर्यटनासाठी सुविधा निर्माण करणे, परिसराची जैवविविधता जतन करणे, वनीकरण करणे या कामांचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीचे गठण करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीचे उपाध्यक्ष असून समितीमध्ये एकूण २४
-
जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा- मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 02 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 30 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 16.65 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1118.087 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 352.2350 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.73 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 10.04 घ.मी. सेकंद इतका विसर्ग
-
कोरोनाने होत असलेले मृत्यू आणि कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणेसाठी ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):- सिंधुदुर्गात कोरोना महामारीने होत असलेले मृत्यू आणि कोरोनाचे रुग्ण वाढ थांबविणेसाठी तात्काळ उपाययोजना करण्याबाबत याव्यात; अशी मागणी ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक आणि जिल्हानिरिक्षक मनोज तोरसकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना महामारीने मृत्यू रोखण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेशी, वैद्यकिय






