सिंधुदुर्ग
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजअखेर 32 हजार 595 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 729
आजअखेर 32 हजार 595 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 729 सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 32 हजार 595 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 729 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 399 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. (कृपया खालील चार्ट वाचण्यासाठी मोबाईल आडवा (Horizontal) पकडावा.) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 24/6/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) – तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 9.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 354.2890 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.19 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 19.43 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे. जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
-
सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.):– जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 87 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 25 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 971.51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग –
-
१० वी च्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या रेखाकला परीक्षा सवलतीच्या गुणांसाठी प्रस्ताव सादर करावेत
सिंधुदुर्गनगरी, दि. 24 (जि.मा.का.) – १० वीच्या मुल्यमापन कार्यपद्धतीमध्ये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी शासनाच्या व मंडळाच्या धोरणानुसार व तरतुदीनुसार देय असलेल्या अन्य गुणांचा लाभ प्रचलित पद्धतीनुसार देण्यास मान्यता दिली असल्याचे डॉ. शिवलींग पटवे, विभागीय सचिव, कोकण विभागीय मंडळ, रत्नागिरी यांनी कळवीले आहे. त्यासाठीचे प्रस्ताव ३० जून २०२१ रोजीपर्यंत विद्यार्थ्यांनी शाळेकडे सादर करावेत. प्रसिद्धीसाठी दिलेल्या
-
अतिदुर्मिळ `बॉम्बे ब्लड ग्रुप’ रक्त गटाच्या पंकज गावडे यांनी वाचविले महिलेचे प्राण!
सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- अतिदुर्मिळ रक्तगटाच्या पंकज गावडे यांनी रक्तदान करून मालवण हिवाळे येथील लक्ष्मी नारायण गावडे ह्या महिलेचे प्राण वाचविले. यापुर्वी ऑक्टोबर २०२० मध्ये पंकज गावडे यांचे बॉम्बे रक्तगटाचे रक्त विशाखापट्टणम येथे रवाना करून तेथील रुग्णाचे प्राण वाचविले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बॉम्बे ब्लडग्रुपच्या रूग्णाला देण्यात आलेले हे पाहिलेच रक्तदान असून जे रुग्णाला कुठेही न हलवता
-
संपादकीय- काय म्हणावे सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेला? अन्यथा मृत्यूंची जबाबदारीही स्वीकारावी लागेल!
सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा राज्यकर्त्यांनी गंभीरतेने समजून घेणे गरजेचे आहे. कारण राज्यकर्त्यांनी आजपर्यंत आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी ज्या काही अत्यावश्यक सुधारणा करायच्या होत्या त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात धन्यता मानलेली आहे; असे खेदाने म्हणावे लागते. सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी नेमके काय करायला हवे? हे नव्याने सांगण्याची गरज राज्यकर्त्यांना नक्कीच नाही. गेली पंधरा-वीस वर्षे यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी आणि विरोधी पक्षांनी
-
आजअखेर 31 हजार 470 रुग्ण कोरोनामुक्त सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 471
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 31 हजार 470 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 471 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 534 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. (कृपया खालील चार्ट वाचण्यासाठी मोबाईल आडवा (Horizontal) पकडावा.) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 23/6/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 534 (8 दुबार लॅब तपासणी )एकूण 542 2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण
-
श्रीधर नाईक उद्यानाच्या नुतनीकरण कामाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन
कणकवली (प्रतिनिधी):- जिल्हा नियोजन निधीतून 75 लाख रुपये उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या कणकवली येथील श्रीधर नाईक उद्यानाच्या नुतनीकरण कामाचे आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, ब्रिगेडियर सुधीर सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, संजय पडते, अरुण दुधवडकर, मुख्याधिकारी वैभव साबळे आदी उपस्थित होते.
-
आरटीओ कार्यालय लवकरच सुरु होणार!
सिंधुदुर्गच्या ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पाठपुराव्याला यश! सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):- ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे नियमित पाठपुरावा करून कार्यालय सुरु करण्याबाबत मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेऊन १४ एप्रिल पासून बंद असणारे आरटीओचे कार्यालय आता अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या पन्नास टक्के उपस्थितीत सुरु होणार असून खूप मोठा दिलासा वाहन धारकांना मिळणार
-
सिंधुदुर्गात 7 वा आंतरराष्ट्रीय योग दिन ऑनलाईन पद्धतीने
सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) : 7 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करुन त्याचे उद्घाटन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा आयुष विभाग व नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला, अशी माहिती नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक यांनी दिली. युवक-युवती, युवक महिला









