सिंधुदुर्ग
-
जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची माणुसकी! 62 वर्षीय कोरोनामुक्त रुग्णाच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया
सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) – ऑक्सिजनची पातळी 65 पर्यंत कमी झालेली. धाप लागलेली अशा परिस्थितीत आम्ही आमच्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. उपचारादरम्यान तेथील डॉक्टर्समधील व्यवसायापलीकडील माणुसकीचे दर्शन झाल्याची भावना व्यक्त केली आहे, सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील कोरोनामुक्त रुग्णाच्या नातेवाईकांनी. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत होती. त्यावेळीच सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील 62 वर्षीय
-
शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी आवाहन
सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय स्तरावरील फिल्मों का अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील लघू फिल्म मेकर यांनी पाणी व स्वच्छता विषयावर लघुचित्रपट तयार करुन 30 जून 2021 पर्यंत केंद्र सरकारच्या पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालय, यांच्या वेबसाईटवर सादर कराव्यात, अशी माहिती जिल्हा परिषदचे पाणी व स्वच्छाता विभागाचे उप मुख्य
-
शिवडाव आणि तिलारी धरणाच्या क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) उपविभागांतर्गत असणाऱ्या लघु पाटबंधारे योजना शिवडाव या धरणाची पाणी पातळी आज दिनांक 21 जून 2021 रोजी तलांक 118.50 मी झाली असून पुढील 2 ते 4 दिवसात सांडव्यावरुन विसर्ग सुरु होणार आहे. त्यामुळे नदी, नालाप्रात्रातील पाण्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. नदी, नाल्याकाठच्या लोकांना इशारा देण्यास येतो की नदीपात्रात,नाल्यास उतरु नये व सावधानता
-
शिकाऊ लायसन्स ऑनलाईन पध्दतीचा गैरवापर केल्यास कायम स्वरुपी लायसन्ससाठी अपात्र ठरणार
सिंधुदुर्गनगरी दि.21(जि.मा.का): नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञती चाचणी व शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पध्दतीने जारी करण्याची प्रणाली दिनांक 14 जून 2021 पासून सुरु करण्यात आली आहे. वास्तविक केंद्रीय मोटार वाहन नियम 11 अन्वये शिकाऊ अनुज्ञप्तीनी अर्ज करताना उमेदवारास केंद्र शासनाने विहित केलेली परिक्षा देणे अनिवार्य आहे. या मागचा उद्देश हा
-
`समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेचे आदर्शवत मदतकार्य!
देवगड (प्रतिनिधी):- कोरोना महामारीच्या काळात विजयदुर्ग पंचक्रोशीत `समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेने मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक मदत केली असून त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या आणि निराधार लोकांना दिलासा मिळाला आहे. समर्थ चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे अध्यक्ष व रामेश्वर गावचे सुपुत्र श्री. योगेश शशिकांत नाटेकर यांच्यावतीने ग्रामपंचायत रामेश्वर व रामेश्वर कोविड समिती यांच्या माध्यमातून रामेश्वर गावातील गरजू
-
पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्राचा निधी
मुंबई, दि.२० :राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला असून, राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व संस्था यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी केले आहे. उद्योगांसाठी ९० टक्के कर्ज आणि ३ टक्के
-
आजअखेर 30 हजार 528 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 980
सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 30 हजार 528 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5 हजार 980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 333 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. (कृपया खालील चार्ट वाचण्यासाठी मोबाईल आडवा (Horizontal) पकडावा.) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 20/6/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 330 ( 3 जिल्हाबाहेरील लॅब तपासणी )एकूण 333 2 सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण
-
सिंधदुर्गतील पाऊस व पाणीसाठा- सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 100 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि. 20 (जि.मा.का.) – जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक 100 मि.मी. पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी 66 पूर्णांक 4 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 908.13 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.
-
सिंधुदुर्गात 30 हजार 165 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 6 हजार 23
सिंधुदुर्गनगरी, दि. 19 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 30 हजार 165 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6 हजार 23 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 490 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि.
-
‘कोरोना मुक्त सिंधुदुर्ग’ वास्तव साकारण्यासाठी…
‘कोरोना मुक्त सिंधुदुर्ग’ करण्यासाठी आपले सहकार्य अपेक्षित! “ सिंधुदुर्गात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी सर्वच पातळीवर उपाययोजना सुरू आहेत; परंतु अमुक अमुक उपाययोजना केल्यावर कोरोनाचा प्रसार कमी होऊन सिंधुदुर्ग कोरोना मुक्त होऊ शकतो; असं आपल्याला वाटतं. तुमच्या मनात नेमक्या काय उपाययोजना आहेत? त्या आम्हाला सांगा. सर्वांनी सुचविलेल्या उपाययोजनांचा एकत्रितरित्या विचार करून सिंधुदुर्ग कोरोना मुक्त करण्यासाठी








