सिंधुदुर्ग
-
सिंधुदुर्गात १० ते १५ जून दरम्यान अतिवृष्टीचा इशारा; दक्षतेच्या सूचना!
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) – प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार बंगालच्या उपसागरात ११ जून रोजी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे जिल्ह्यात दि. १० व ११ जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व विभागांना निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी पुढीलप्रमाणे सूचना दिल्या आहेत.
-
व्यापाऱ्यांच्या निःस्वार्थ सहकार्याने नांदगाव बाजार बंदला प्रतिसाद!
श्रेय घेणाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारण्याची हिंमत दाखवावी! नांदगाव (प्रतिनिधी) – नांदगाव बाजार बंद ठेवण्यासाठी तेथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आसिफ बटवाले यांनी सर्व व्यापारांना आणि रिक्षा संघटनेला विश्वासात घेतले आणि त्यांना सर्वांनी साथ दिली म्हणूनच नांदगाव बाजार बंदला उत्तम प्रतिसाद लाभला. मात्र एका स्थानिक पुढाऱ्याने त्याचे श्रेय स्वतः घेण्यास धन्यता मानली. श्रेय घेणाऱ्यांने नांदगाव दशक्रोशीत कोरोनाचा प्रसार
-
बाधित रुग्णांना भेटण्यास नातेवाईकांना प्रतिबंध
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):- केंद्र व राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार कोरोना काळजी केंद्रामधील बाधित रुग्णांना भेटण्यास नातेवाईकांना प्रतिबंध करण्यात आले आहे. या निर्णयास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे. डॉ. पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, सद्यस्थितीत सिंधुदुर्ग जिल्हा हा रेड झोनमध्ये असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील सर्वच
-
घोटगे-सोनवडे-शिवडाव घाट रस्त्याच्या कामाचा आढावा
मुंबई:- कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या घोटगे-सोनवडे-शिवडाव घाट रस्त्याच्या कामाचा काल सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आढावा घेऊन काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या. मंत्रालयात झालेल्या बैठकीस उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) उल्हास देबडवार, उपसचिव बस्वराज पांढरे आदी उपस्थित होते. सन २०२०-२१ च्या
-
नांदगाव बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय व्यापारांना आर्थिक अडचणीत आणणारा आणि सामान्यांच्या गैरसोयीचा!
नांदगाव (प्रतिनिधी):- कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील बाजारपेठ १ जून ते ८ जून बंद ठेवण्याचा अयोग्य निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे नांदगाव दशक्रोशितील सामान्यांची गैरसोय होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले जाते; परंतु ह्या तुघलगी निर्णयाने काहीच साध्य होणार नाही; अशी स्थानिक व्यापारांची आणि सर्वसामान्य जनतेची भावना आहे. नांदगाव येथील
-
आरटीओकडून ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मागण्या मंजूर, जिल्हावासीयांना दिलासा!
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी):- ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देऊन मुजोर रुग्णवाहिका चालक विशाल जाधव याच्यावर कठोर कारवाई करणे, रुग्णवाहिकेमध्ये शासनाने ठरवून दिलेले दरपत्रक लावणे बंधनकारक करणे, खाजगी वाहनांचे रूपांतर रुग्णवाहिकेमध्ये करण्यास तात्काळ परवानगी देणे आणि वाहन पासिंग करताना सॅनिटायझरची आकारण्यात येणारे शुल्क रद्द करणे; अशा अत्यंत महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या. यासंदर्भात
-
कोरोनाने मरण सुद्धा महाग झालंय हो!
रेशनवर ५ किलो धान्य मोफत आणि अंत्यविधीसाठी १५ हजार रुपये! कोरोनाची महामारी आल्यानंतर आजपर्यंतची उभी राहिलेली यंत्रणा किती कुचकामी होती, ती आपल्या सर्वांच्या लक्षात आली. एक रुग्णवाहिकेचा मालक कसा रुग्णांना लुबाडतोय? त्याच्या अनेक कथा समोर येऊ लागल्या. सिधुदुर्गात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी कोणीच पुढाकार घेतला नाही. आवश्यक असणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, तज्ञ वैद्यकीय कर्मचारी, साफसफाई
-
मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी
नुकसानग्रस्तांना भरीव मदत केली जाईल – विजय वडेट्टीवार सिंधुदुर्गनगरी, (प्रतिनिधी) – मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज मालवण, देवबाग, किल्ले निवती, मेढा, वेंगुर्ला, पंढरीनाथवाडी आदी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. संपूर्ण नुकसानीचा पंचनामा झाल्यानंतर `नुकसानग्रस्तांना मदत करताना शासन आकडता हात घेणार नाही. सढळ हाताने भरीव मदत केली जाईल’, अशी ग्वाही त्यांनी पाहणी दौऱ्यात दिली.
-
शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी! – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील
कोणाचाही पंचनामा बाकी राहणार नाही याची दक्षता घ्या! – सहकार मंत्री बाळासाहेब पाटील सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी)- जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादाळमुळे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्तीच्या परिस्थितीमध्ये शासन नुकसानग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. या नुकसानीचे पंचनामे करत असताना कोणाचाही पंचनामा बाकी राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी; अशा सूचना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्या. जिल्ह्यात तौक्ते
-
सिंधुदुर्गातील आरोग्य यंत्रणेचे वास्तव भयावह! रुग्णवाहिका सेवेचे दरपत्रक जाहीर करा!
सिंधुदुर्गात आरोग्य यंत्रणा नेहमीच व्हेंटीलेटरवर नव्हे तर लाईफ सपोर्ट सिस्टीमवर होती आणि आता कोरोनाच्या उद्रेकानंतर ती मृत झाली असे खेदाने म्हणावे लागते. विकासाचा कोणताही मुद्दा असो वा जनतेची मूलभूत गरज असो, राजकीय नेत्यांनी नेहमीच आरोप प्रत्यारोपांचे नाटक करायचे आणि जनतेने तो दशावतार पाहून त्यात सुख मानायचे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेबाबत पाक्षिक `स्टार वृत्त’च्या माध्यमातून आम्ही कित्येक



