सिंधुदुर्ग
-
मुख्यमंत्र्यांकडून मालवण येथील चिवला बीच परिसरात झालेल्या नुकसानाची पाहणी
तोक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना मदत देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) – तोक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पंचनामे पूर्ण होताच राज्यस्तरावर याबाबत आढावा घेऊन नुकसानग्रस्तांना मदत जाहीर केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तोक्ते चक्रीवादळामुळे मालवण येथे चिवला बीच
-
पोईप ग्रामपंचायतीत कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राचे उपसरपंच संदिप सावंत यांच्या हस्ते उद्घाटन
मालवण (संतोष हिवाळेकर):- पोईप ग्रामपंचायतीत लसीकरण केंद्राचे उपसरपंच संदिप सावंत यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. यावेळी ग्रामसेवक ए. बी. गर्कळ, माजी सरपंच श्रीधर नाईक, आरोग्यसेवक चेतन कडुलकर, आरोग्य सहाय्यक एस. बी. आयोनडकर, आशासेवीका शुभदा वर्दम, सौ करिश्मा दळवी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. पहिली लस उपसरपंच संदिप सावंत यांनी घेतली आणि शुभारंभ केला. उपसरपंच संदिप
-
कणकवली कॉलेज लसीकरण केंद्रावर नियोजन नसल्याने जनतेला नाहक त्रास
कणकवली (प्रतिनिधी):- कणकवली येथील आरोग्य यंत्रणेने नियोजन न केल्याने लसीकरणाबाबत संभ्रम निर्माण झाला आणि शारीरिक दुरीचा फज्जा उडाला. तसेच दुसरा डोस घेण्यासाठी आणलेल्या लोकांची प्रचंड गैरसोय झाली. ह्या संदर्भात ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने वैद्यकीय अधिक्षक- उपजिल्हा रुग्णालय कणकवली, जिल्हा शल्य चिकित्सक-सिंधुदुर्ग आणि जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. यासंदर्भात
-
सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचे मुख्यमंत्रांच्या हस्ते लोकार्पण
सिंधुदुर्गनगरी:- सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयातील दुसऱ्या ऑक्सिजन प्लांटचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण सोहळा झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सिंधुदुर्ग येथून पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, अपर जिल्हाधिकारी
-
प्रशासनाने आणि जनतेने जबाबदारी ओळखावी आणि कोरोनाचा प्रसार थांबवावा!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे; परंतु कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता जनता कर्फ्यूचा काही उपयोग होताना दिसत नाही. जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला दिसतो. ह्यासंदर्भात प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी करणे तसेच जिल्हावासियांनी नियम पाळणे अत्यावश्यक आहे. १) अनेक ठिकाणी विवाह समारंभ सुरु आहेत. त्यामुळे शारीरिक अंतर राखले जात नाही.
-
पाक्षिक `स्टार वृत्त’च्या बातमीची दखल- लस वाया जाऊ नये म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासनाची दक्षता
सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- लसीकरणाबाबत ठोस भूमिका घेऊन आरोग्य विभागाने लस वाया घालवू नये!’ ह्या मथळ्याखाली पाक्षिक `स्टार वृत्त’ने काल बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत जिल्हा आरोग्य प्रशासनाने योग्य असे आदेश देऊन लस वाया जाणार नाही ह्याची पूर्णतः दक्षता घेतली आहे. त्याबाबत पाक्षिक `स्टार वृत्त’चे आभार जागृत नागरिक आणि आरोग्य केंद्रातील अनेक डॉक्टरांनी मानले
-
लसीकरणाबाबत ठोस भूमिका घेऊन आरोग्य विभागाने लस वाया घालवू नये!
सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- कोरोना महामारीने जिल्ह्यात अक्षरशः थैमान घातले असून एकीकडे अपुऱ्या लसीच्या पुरवठ्यामुळे प्रचंड मनस्ताप जनतेला जनतेला सोसावा लागतोय तर दुसरीकडे लसीकरणासाठी लसीकरणासाठी ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या व्यक्ती येत नसल्याने लस वाया जाते; असे विदारक चित्र निर्माण झाले आहे. त्यासंदर्भात आरोग्य यंत्रणेने ठोस भूमिका घेऊन लस वाया जाऊ नये म्हणून नियोजन करावे अशी मागणी जनता करीत आहे.
-
पत्रकारांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाचे सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन
जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन सावंतवाडी:- पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाने सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीच्या काळात लोकांमध्ये जनजागृती व कोरोना संबधी अधिकृत आकडेवारी देण्यासाठी खेड्यापाड्यातून पत्रकार आपला जीव धोक्यात घालून अगदी तुटपुंजा मानधनावर काम करत आहेत. पत्रकारितेचे
-
जिल्ह्यात आज ५७३ जण कोरोना बाधित तर ८ व्यक्तींचा मृत्यू!
सिंधुदुर्गनगरी (संतोष नाईक):- जिल्ह्यात काल दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण १० हजार ५२३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ३९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ५७३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण ०४/०५/२०२१ (दुपारी १२ वाजेपर्यंत) आजचे नवीन
-
`जनता कर्फ्यू’च्या नावाखाली दडपशाही नको!
उद्यापासून कणकवली तालुक्यात दहा दिवसांचा `जनता कर्फ्यू’ पाळण्याबाबत एकमुखाने निर्णय घेण्यात आला. कोरोना रुग्णांची आणि त्यातून होणाऱ्या मृत्यूंची वाढती संख्या चिंताजनक असल्याने `जनता कर्फ्यू’ आवश्यक ठरतो. त्यासाठी सर्वांनी सहकार्य करायला हवे; पण `जनता कर्फ्यू’च्या नावाखाली प्रशासनाने दडपशाही करू नये; असे आमचे स्पष्ट मत आहे! आज कणकवली शहरात जनतेने दुकानांमध्ये गर्दी केली. पुढील दहा दिवसांना पुरेसा

