संपादकीय
-
अनुभव संपन्नता आणि निर्मळ प्रेमाच्या प्रवाहाला शुभेच्छा!
अनुभव संपन्नता येण्यासाठी निःस्वार्थी वृत्तीने सतत दुसऱ्याचे भलं करण्याच्या कार्यात वर्षानुवर्षे मग्न राहावं लागतं. बालपणापासून निवृत्तीचे जीवन जगताना प्रत्येक क्षणी स्वतःच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, मित्रांना, सहकाऱ्यांना कसं सहकार्य करता येईल? ह्याचा नुसता विचार करीत न बसता तातडीने आवश्यक मदत मिळवून देण्याची सवय अंगी असावी लागते आणि हे वर्षानुवर्षे जेव्हा घडतं तेव्हा जीवनात अनुभव संपन्नता येते. ह्या
-
स्वातंत्र्याचा `अर्थ’ महत्वाचा!
१५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०२४ ह्या ७७ वर्षाचा स्वातंत्र्याचा प्रवास भारताने केला. ह्या प्रवासात अनेक अडथळे आले; तर काही ठिकाणी देशाने स्वयं सामर्थ्याने आपली क्षमता सिद्ध केली. ह्या ७७ वर्षाच्या काळात म्हणजेच भूतकाळात काय घडले? ह्याचे सिंहावलोकन करीत असताना भविष्यातील भारतासमोरील आव्हानांचा विवेकबुद्धीने विचार करायला हवा आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या
-
संपादकीय… पंतप्रधान नरेंद्र मोदींचे तिसऱ्यांदा अभिनंदन!
भारताच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेऊन नरेंद्र मोदी हॅट्रिक करतील. गेली दहा वर्षे नरेंद्र मोदी यांनी सत्ता बहुमताच्या जोरावर प्रभावी केली. तो प्रभाव जेवढा सकारात्मक होता त्याहीपेक्षा कमी प्रमाणात नकारात्मक होता. म्हणूनच तिसऱ्या टर्ममध्ये नरेंद्र मोदींना इतर पक्षांच्या साहाय्याने सत्तेत यशस्वी व्हावे लागले. गेल्या दहा वर्षात लोकसभेत विरोधी पक्ष होण्याएवढे बळ काँग्रेसला देण्याचे मतदारांनी नाकारले
-
संपादकीय… आता राणेंनी विकासाचे कमळ फुलवावे!
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विद्यमान खासदार विनायक राऊत यांची हॅट्रिक रोखली आणि कोकणात कमळ फुलविले. राणे यांच्या विजयाचे व राऊत यांच्या पराभवाचे फॅक्टर तपासण्यापूर्वी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाच्या विकासासाठी राणे यांना पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन कार्य करावे लागेल. प्रशासनावर वचक असणारा आक्रमक नेता म्हणून राणे यांची ओळख आहे. तो सकारात्मक वचक ठेवून मूलभूत
-
संपादकीय… रत्नागिरी-सिंधुदुर्ग-लोकसभेच्या निकालाचे कवित्व!
उद्या केंद्रीय मंत्री नारायणराव राणे आणि विद्यमान खासदार विनायक राऊत यापैकी एकजण निवडून येईल! जिंकणाऱ्या आणि पराभूत होणाऱ्या दोघाही सन्मानिय नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शांतता ठेवणे गरजेचे आहे. कारण ही निवडणूक पाच वर्षांसाठी असेल; एवढेच नाहीतर पुढील सहा महिन्यात महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कोणीही कायमचा विजयी नसतो; म्हणून जिंकून येणाऱ्याने पुढील पाच वर्षासाठी आपल्या
-
संपादकीय… सामंजस्यता महत्वाची!
युद्ध, दंगल, हाणामारी यामधून दोन्ही बाजूंची हानी होते. दोन देशांमधील युद्धाने दोन्ही देशांची जी अपरिमित हानी होते त्यामध्ये सर्वात प्रथम आणि सर्वाधिक भरडला जातो तो सर्वसामान्य गरीब, कष्टकरी माणूस आणि त्याचे कुटुंबिय! दोन धर्मांमधील वाद – दंगल सुद्धा असेच दुष्परिणाम प्रकट करते. दोन व्यक्तींमधील भांडण दोघांच्याही विकासाला मारक ठरते. म्हणून दोन धर्मांमधील, जातीमधील, समुहामधील संवाद
-
सामाजिक कार्यकर्तृत्वाचा आधारवड कोसळला!
स्वर्गीय अंकुश डामरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असलदे-कोळोशी ग्रुप ग्रामपंचायतीचे (सन १९६३ ते १९७२) माजी सरपंच, नांदगाव पंचक्रोशी माध्यमिक शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकुश डामरे यांना काल देवाज्ञा झाली. असलदे गावासाठीच नाही तर पंचक्रोशीसाठी तसेच क्षा. म. समाजासाठी ही अतिशय दुःखद घटना! त्यांच्या जाण्याने आम्हा सर्वांच्या सामाजिक जीवनातील नुकसान न भरून येणारे आहे. प्रतिकूल
-
असलदे गावात कोकण विकासाचा सम्राट सन्मा. नारायणराव राणे यांचे स्वागत!
श्री देव रामेश्वराच्या पवित्र भूमीत असलदे गावात आज केंद्रीय मंत्री सन्मा. नारायणराव राणे यांचे आम्ही आमच्या कुटुंबियांतर्फे, मित्रमंडळींतर्फे आणि पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवारातर्फे सहर्ष स्वागत करीत आहोत! येथे क्लिक करून हेही वाचा! -संघर्षमय राजकीय जीवनाचा विजय! लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने का होईना… कोकण विकासाचा सम्राट सन्मा. नारायणराव राणे असलदे गावात येत असताना त्यांचे स्वागतास मला स्वतःला
-
रक्तदान शिबीर संपन्न करून साजरा केला वाढदिवस!
श्री. संतोष वाळके यांना ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा! आमचे मित्र श्री. संतोष वाळके यांचा वाढदिवस काल अनोख्या पद्धतीने पावाचीवाडी- नांदगाव (ता. देवगड, जिल्हा- सिंधुदुर्ग) येथे साजरा करण्यात आला. वाढदिवस म्हटला की मित्रमंडळींना पार्टी देणं, मौजमस्ती करणं आलंच! ह्यात काही वाईट नाही; पण तोच वाढदिवस जेव्हा सामाजिक बांधिलकी स्वीकारून केला जातो तेव्हा त्याचे मोल अनमोल
-
संपादकीय- समर्थ नेत्यालाच उमेदवारी!
येत्या निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून विनायक राऊत यांची उमेदवारी निश्चितच झाली होती; कारण ते मागील १० वर्षांपासून खासदार आहेत तसेच महाविकास विकास आघाडीतील काँग्रेस पक्ष आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष आपली ताकद पाहून ह्या जागेवर आपला हक्क दाखवू शकले नाहीत. त्यामुळे खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी मिळणे सहज










