संपादकीय
-
प्रजासत्ताक भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
प्रजासत्ताक भारताच्या ७४ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा! ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी त्याग करून बलिदान दिले, ज्यांनी आपल्या देशाचे संरक्षण करताना हौतात्म्य पत्करले, ज्यांनी देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी आयुष्य समर्पित केले, ज्यांनी कोरोना महामारीत योद्ध्यासाराखे कार्य केले आणि प्रत्येक भारतीय आपल्या देशावर प्रेम करतो त्या सगळ्यांना सलाम! संपादक- नरेंद्र हडकर https://starvrutta.in/
-
माझा सिंधुदुर्ग- सन्मा. जिल्हाधिकारी; श्रीगणेश मूर्तीच्या उंचीबाबत अट रद्द करा!
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव कसा साजरा करावा? यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढले आहे. त्या सोळा कलमी परिपत्रकांमध्ये अटी, शर्ती नमूद केलेल्या आहेत. शासनाच्या नियमानुसार केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोरोना महामारी रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपायोजना करायलाच हव्यात; मात्र हे करत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी काही गोष्टींबाबत वास्तवता समजून घेणे गरजेचे आहे;
-
सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना विनंती!
कोकणवासियांवर अजून किती अन्याय करणार? विशेष ट्रेन सिंधुदुर्गातील सर्व रेल्वे स्थानकांवर थांबल्याच पाहिजेत! रेल्वे बोर्डाला, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना विनंती! कोकणातील जनतेवर अजून किती अन्याय करणार? हा कोकणवासीयांच्या सवाल असून गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी एसटीची सोय करण्यात आली ती सुद्धा उशिरा! आता विशेष रेल्वेही सुटणार आहेत. तोपर्यंत कर्जबाजारी होऊन चाकरमान्यांनी खाजगी वाहनांनी गावी जाण्याचा
-
कोरोना महामारी अस्तित्वात नाही!… कोरोना महामारी आंतरराष्ट्रीय षडयंत्र?
संपादकीय लेखाचे शिर्षक वाचून शिर (मस्तक) गरगर फिरायला लागेल. कोरोना महामारी अस्तित्वात नाही म्हटले तर जगात एवढे मृत्यू का झाले? हा मोठा प्रश्न समोर येतो. जगातील-भारतातील माध्यमं काय म्हणताहेत? शासनाची आकडेवारी काय सांगते? आज संपूर्ण जगामध्ये कोरोनाच्या तथाकथित महामारीने थैमान घातले आहे. भारतामध्ये सुद्धा आजमितीपर्यंत २० लाख २७ हजार रुग्ण सापडले. त्यापैकी १३ लाख ७८
-
मुख्यमंत्री महाशय, कोकणवासियांची छळवणूक-पिळवणूक थांबवा!
दरवर्षी शासकीय आकडेवारीनुसार १२ ते १५ लाख चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी जातात. त्यासाठी विशेष ट्रेन, विशेष एसटी बसची सोय करण्यात येते. हजारो वर्षाची परंपरा मोडण्याचे धाडस आज कोकणवासीय करू शकत नाही. कारण कोकणातील गणेशोत्सव हा काही सार्वजनिक गणेशोत्सव नाही. प्रत्येकाच्या घरात हा गणपती परंपरेने श्रद्धेने पूजला जातो. ही संस्कृती टिकविण्यासाठी कोकणवासीय कर्जबाजारी होईल; पण तो आपली
-
सिंधुदुर्गातील मुंबई गोवा महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम!
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब लक्ष देतील काय? `राज्यकर्त्यांचा दुर्लक्ष, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि ठेकेदार कंपनीचा उन्मत्तपणा‘ याचे जीवंत उदाहरण म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेले महामार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम! १९३० साली मुंबई-गोवा महामार्ग सुरु झाला; परंतु तो नेहमीच दुर्लक्षित राहिला. ह्या महामार्गावर वाहने चालविणे म्हणजे कधीही अपघाताला सामोरे जाणे. तरीही कोकणवासियांना दुसरा
-
गावातील-वाडीतील तथाकथित पुढाऱ्यांच्या तोंडी नियमांना लगाम लावण्याची गरज!
मार्च ते जुलै २०२० हा कालावधी शासनकर्त्यांसाठी अग्निदिव्याचा असा आहे. कारण आजपर्यंत सुस्तावलेल्या व आपल्या चौकटीत काम करणाऱ्या प्रशासनाला निर्णय घेता आले नाहीत आणि सगळा गोंधळ निर्माण झाला अनेक निर्णय घेताना, निर्णयाची अंमलबजावणी करताना, अनेक निर्णय बदलताना आणि स्थगित करताना! त्यामुळे केंद्रापासून अगदी ग्रामपंचायतीच्या पातळीपर्यंत कोणतेही आदेश काढावेत आणि त्याची विचित्र पद्धतीने अंमलबजावणी करावी; अशी
-
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वे-एसटी आवश्यक!
कोरोना आजाराबाबत आता चांगल्याप्रकारे जनजागृती झाली आहे. मागील पाच महिने कोरोनाविषयी खरी-खोटी माहिती आमच्यापर्यंत समाजमाध्यमांद्वारे येऊन पोहचली. त्यामुळे कोरोना रोगाबाबत आपल्या मनाची तयारी झाली आहे; असे म्हणावयास हरकत नाही. २२ ऑगस्ट २०२० रोजी श्रीगणेशोत्सव प्रारंभ आहे. कोकणात जाणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते. शेकडो वर्षांची परंपरा आणि श्रद्धेचा विषय असल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना सुखाने सहजपणे जात
-
`दुचाकीवर डबलसीट नको’ हा चुकीचा नियम त्वरित बदला!
कोरोना काळात प्रशासनाने काढलेल्या काही सूचना कधीकधी कोरोनापेक्षा त्रासदायक, घातक आणि जीवघेण्या ठरतात. त्यातील एक निर्णय म्हणजे दुचाकीने डबलसीट प्रवास केल्यास नियमांचा भंग होणे. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात अशाप्रकारे अनुचित निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करणे अन्यायकारक आहेत. दुचाकीवरून दोन व्यक्तींच्या प्रवासाने कोरोनाचा प्रसार होतो? हा जावई शोध लावणाऱ्याचा जाहीर सत्काराचा करायला हवा. केवढा मोठा त्याने
-
संपादकीय… आदर्शाला सलाम!
सन्मानिय चंद्रकांत तावडे साहेब यांना श्रद्धांजली अर्पण करणारा विशेष अंक वाचण्यासाठी / डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा! संपादकीय… आदर्शाला सलाम! माननीय श्री. चंद्रकांत तावडे याचं दुःखद निधन झाल्याचं कळलं आणि अतीव दुःख झाले. खूपशा आठवणी जाग्या झाल्या. आदर्शवत माणसाचा देह जातो, पण त्याच्या स्मृती सदैव हृदयी तेवत राहतात. मा. श्री. चंद्रकांत तावडे यांच्या सोबतच्या अनेक








