संपादकीय
-
सिंधुदुर्गात `१०८ रुग्णवाहिका’ पायलट कोरोना महामारीमध्ये करताहेत आदर्श सेवा!
त्यांच्या मूलभूत मागण्या शासनाने त्वरित मंजूर कराव्यात! कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह १०८ च्या रुग्णवाहिकेवरील २८ (चालक) पायलट यांनी सेवाभावी भूमिका घेऊन सिंधुदुर्गात आणीबाणीच्या काळात रुग्णसेवा करीत आहेत. त्यासाठी आम्हा सर्वांना त्यांचे आभार मानता आले पाहिजेत आणि शासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. तरच त्यांच्याशी शासन कृतज्ञतेने वागले असे म्हणता
-
गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
।। हरि ॐ ।। ।।श्रीराम।। ।।अंबज्ञ।। देवशयनी एकादशी आणि गुरुपौर्णिमा. परमात्म्यावर श्रद्धा, निष्ठा, प्रेम असणाऱ्या भक्तांसाठी मोठा आनंदाचा दिवस. या दिवशी सद्गुरु चरणांचे दर्शन भक्तांसाठी पर्वणीच. कारण साक्षात परमशिवाने आदिमाता पार्वतीला सांगितलेल्या गुरुगीतेमध्ये म्हटलेलं आहे, शोषणं पापपङ्कस्य दीपनं ज्ञानतेजसाम्। गुरुपादोदकं सम्यक संसारार्णवतारकम्।। सद्गुरुचरणांचे जल हे पापरूपी चिखल सुकविणारे आहे, ज्ञानाचे तेज वाढविणारे आहे व संसाररूपी
-
काय चाललंय माध्यमात..?
( कोरोना विषाणूने संपूर्ण जगातील वैद्यकीय व्यवस्थेची पोलखोल केली. वैद्यकीय क्षेत्रात अतिप्रगत तंत्रज्ञान आणि आधुनिक औषधोपचार करण्यात आघाडीवर असलेले देश कोरोना विषाणूमुळे हतबल झाले. सर्वच क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झाल्या किंवा निर्माण केल्या गेल्या. त्याचप्रमाणे प्रसिद्धी माध्यमांमधील कार्यरत असणाऱ्या संपादक- पत्रकार यांच्यावरही कोरोनाच्या महामारीचे निमित्त करून भांडवलशाही वर्तमानपत्राच्या मालकांनी अन्याय केला. यासंदर्भात पत्रकारांचे तडफदार अभ्यासू
-
संपादकीय… अवश्य वाचा.. घाबरू नका; वास्तव समजून घ्या! कोविड १९ महामारीला रोखणार कसे?
जगात बलाढ्य असणारे देश कोविड १९ विषाणूमुळे हतबल झालेले दिसताहेत. ह्या महामारीला रोखायचे कसे? जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार हा आजार दीर्घ काळ राहणार आहे. ह्याचा अर्थ दीर्घ काळ लॉकडाऊन हा पर्याय असूच शकत नाही. १०० रुग्णांपासून ते १ लाख रुग्ण संख्या होण्यासाठी कोणत्या देशाला किती दिवस लागले ते पाहूया! भारत- ६५ दिवस अमेरिका- २५ दिवस
-
माझा सिंधुदुर्ग- महामारीसमोर हतबलतेने नाही तर समर्थपणे लढले पाहिजे!
आणीबाणीच्या परिस्थितीत आपल्या मुळगावी येण्याची ओढ प्रत्येकालाच असणार आहे. त्यांना रोखण्यापेक्षा कोणत्या उपाययोजना करता येतील; त्याची चिकित्सा करता आली पाहिजे. सिंधुदुर्गात बाहेरील जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने माणसे येताच जिल्हा प्रशासनाने हतबलता व्यक्त केली. प्रशासन आपल्यापरिने काम करीत आहे. लॉकडाऊनच्या मोठ्या कालावधीत ज्यापद्धतीने प्रशासनाकडून यंत्रणा सक्षम व्हायला हवी होती ती झाली नाही; म्हणूनच आजची परिस्थिती निर्माण झाली
-
माझा सिंधुदुर्ग- प्रशासनाची कार्यक्षमता आणि राज्यकर्त्यांची पालकत्वाची भावना महत्वाची!
चाकरमान्यांमुळे कोरोनोचा प्रसार…? हा आरोप करण्यापूर्वी नक्की वाचा! कोविड १९ विषाणूमुळे संपूर्ण जग आज संकटात सापडलेले असताना आपण प्रत्येकजण त्यातून अलिप्त कसे राहू शकतो? चीनमधील वुहान शहरातून पसरलेला कोविड १९ विषाणू आमच्या जिल्ह्यातील गावापर्यंत येऊन पोहोचला. ह्या विषाणूचा प्रसार आमच्या जिल्ह्यापर्यंत कसा झाला? ३० जानेवारी २०२० भारतात केरळमध्ये कोरोना विषाणू बाधित पहिला रुग्ण सापडला. बाधित
-
सावधान… अन्यथा इटली-अमेरिका व्हायला वेळ लागणार नाही!
बदली करून प्रश्न सुटणार का? महाराष्ट्र शासनाने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली केली आहे. पण या बदलीने मुंबई शहरासमोरील कोरोना विषाणू महामारीचे संकट दूर होणार आहे का? हा प्रश्न आहे. अशाप्रकारे कितीही बदल्या केल्या तरी जोपर्यंत प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत कुठल्याही खात्यात सकारात्मकता बदल दिसणार नाही, हे स्पष्ट आहे. हेही
-
संपादकीय- जनतेने करायचं काय?
गोंधळ, दिशाहीन आणि स्वैराचार… जनतेने करायचं काय? कोरोना विषाणूच्या महामारीने संपूर्ण जगात थैमान घातले असताना प्रत्येक देशाच्या आरोग्य क्षमतेची कसोटी लागत आहे. वैद्यकीय क्षेत्रात जरी आधुनिक तंत्रज्ञान आले असले तरी कोरोना विषाणूसमोर मात्र बलाढ्य देशांनीही हात टेकले. कारण देशाच्या नेतृत्वांनी आवश्यक असणारे निर्णय उचित वेळी घेतले नाहीत. ज्या देशांनी सावधपणे दूरदृष्टी ठेवून त्वरित निर्णय घेतले
-
संपादकीय- महाराष्ट्राला वाचवा, देश वाचेल!
आज महाराष्ट्र आणि कामगार दिन! सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना मात्र आज महाराष्ट्र आर्थिक बाबतीत अडचणीत सापडला आहे, त्याचे मनाशी दुःख आहे. कोरोना विषाणूची महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. त्यात भारत देशही आहे; पण सर्वाधिक बाधितांची संख्या महाराष्ट्र राज्यात आहे आणि मुंबईत कोरोना विषाणू लागण झालेल्यांची संख्या सर्वोच्च आहे. त्यामुळे मुंबईतील लॉकडाऊनचा कालावधी लवकर
-
कोरोना विषाणू संसर्ग हा तिसऱ्या महायुद्धाचा एक छोटासा भाग…
कोरोना विषाणू संसर्ग `एक मोठं षडयंत्र आहे’… गाफीलपणा नडला, लाखो मृत्यूला आमंत्रण दिले! जग तिसऱ्या महायुद्धाकडे वेगाने जात असून त्याची पूर्वतयारी म्हणून अनेक बलाढ्य देश भविष्यात आपल्या देशाला सामर्थ्य मिळवून देण्यासाठी वर्तमानात डाव-प्रतिडाव मांडत आहेत. त्यामुळे जग अधिकाअधिक महायुद्धाच्या दरीत कोसळत आहे. महायुद्धाचा उद्रेक होण्यापूर्वीची पूर्वतयारी म्हणून मागील काही वर्षात ज्या घटना घडल्या, त्या अतिशय गंभीर










