संपादकीय
-
`विकास’ आणि `विश्वास’ हरवलाय….? `हीच ती वेळ’ शोधण्याची…!
`विकास’ सापडतच नाही. कुठे म्हणून शोधायचा? प्रत्येकजण आम्हाला अनेक वेळा आश्वासन देतात की `विकास’ करू; पण आजपर्यंत विकास काही झाला नाही; म्हणजे ते `विकास’ करण्यास लायक नाहीत किंवा त्यांना विकासच नको आहे. कागदावर `विकास’ दिसतो अगदी सदृढ बालकासारखा नव्हे तर सुमो पेहलवानासारखा. पण प्रत्यक्षात तो `विकास’ सापडतच नाही; सापडलाच तर दुष्काळग्रस्त इथोपियामधील कुपोषित बालकासारखा. मग
-
सिंधुदुर्गातील खड्ड्यातील रस्ते म्हणजे भ्रष्ट कारभाराची झलक!
सिंधुदुर्गातील अनेक रस्ते गायब झाले आहेत आणि खड्डेच शिल्लक राहिले आहेत. रस्त्यांवरून वाहनं चालवायची कशी? हा वाहन चालकांना पडलेला प्रश्न. प्रवास करायचा कसा? प्रवाशांचा सवाल. जीवघेणे खड्डे पडूनही शासन काहीच करीत नाही. रस्ते तयार करायला शासन करोडो रुपयांचा निधी खर्च करते. पण ठेकेदार, प्रशासकीय अधिकारी, राजकीय पुढारी यांच्या संगनमताने कमकुवत रस्ते तयार होतात आणि जनतेचे
-
२००५ ते २०१५ दरम्यान पावसामुळे मुंबईत १४ हजार कोटींचे नुकसान, तर ३ हजार लोक मृत्युमुखी
मुंबई:- २००५ ते २०१५ ह्या दहा वर्षाच्या कालावधीत पावसामुळे मुंबई शहराचे तब्ब्ल १४ हजार कोटींचे नुकसान झाले आहे तर ३ हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. मागील दहा वर्षाची ही आकडेवारी मुंबईकरांसाठी धक्कादायक आहे. म्हणून दरवर्षी पावसाळ्यात प्रशासनाने चोख तयारी ठेवली पाहिजे; जेणेकरून जीवित आणि वित्त हानी कमीत कमी होऊ शकेल. यूएसटीडीए आणि केपीएमजी यांनी जाहीर
-
आता समस्यांचा महापूर! पूरग्रस्तांचे जबाबदारीने अश्रू पूसा!
आठ दहा दिवसानंतर पाऊस कमी झाला आणि पाणी ओसरू लागले. पण जिथे पाण्याचा महापूर आला तिथे आता समस्यांचा महापूर सुरू झाला आहे. सांगली जिल्ह्यात अजूनही पन्नास साठ गावात महापूराचे पाणी ओसरलेले नाही. पूर आलेल्या ठिकाणी रस्त्यांवर, घराघरात चिखलाचे साम्राज्य झाले आहे. मोठ्या प्रमाणात गुरे दगावली आहेत. त्याची दुर्गंधी पसरली आहे. कुजलेल्या सर्व वस्तूंमधून आता दुर्गंधी
-
`राष्ट्रीय आपत्ती’ जाहीर करून पूरग्रस्तांना महासंकटात सर्व मदत द्या!
सांगली, कोल्हापूर, सातारा, धुळे, पुण्यासह कोकणातील जिल्हे अतिवृष्टीमुळे मागील चार दिवस महापुरात वेढले गेले आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे धरणे भरली, त्यातून पाणी सोडले गेले. तर अलपपट्टी धरणातील पाण्याची पातळी वाढत गेली व त्या धरणातून पाण्याचा विसर्ग करायचा म्हटलं तर कर्नाटकमध्येही असलेली पूरपरिस्थिती अधिक गंभीर झाली असती. जोपर्यंत पाऊस थांबत
-
सुषमा स्वराज- मातेची ममता आदिमाते चरणी विलीन
राजकारणात असणारी व्यक्ती फक्त स्वत:च्याच भल्याचा विचार करून त्यानुसार काम करत असते. त्यामुळे निष्ठा, नितीमुल्य, प्रामाणिकपणा हे गुण आजच्या राजकारणात मागे पडताना दिसतात. अभ्यासू वृत्ती, दुरदृष्टीपणा असल्यास ह्या गुणांच्या सहाय्याने आपले राजकीय वजन वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे नेते कमी नाहीत. अशा राजकारणाच्या वातावरणात सुषमा स्वराज यांच्यासारखे व्यक्तीमत्व आदर्शवत ठरते. कालच संध्याकाळी अतिशय दु:खद घटना घडली. माजी
-
जनतेच्या जीवावर उठणाऱ्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना कुठली भाषा समजणार?
घटना क्र. १ चिपळूणमधील तिवरे धरण फुटले आणि झालेल्या हानीत १८ जण दगावले; तर अद्यापही ५ जण बेपत्ता आहेत. `तिवरे धरणाला गळती लागली असून भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते; त्यासाठी त्वरीत उपाय योजना करा!’ अशी मागणी सतत दोन वर्षे तेथील ग्रामस्थ करीत होते. तरीही पाटबंधाऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. मे २०१९ मध्ये डागडूजी करून तिवरे
-
आमदार नितेश राणे अभिनंदन! अधिकाऱ्यावर वचक ठेवायलाच हवा!
एका दाखल्यासाठी तहसीलदार कार्यालयात किती खेपा माराव्या लागतील? हे सांगता येत नाही. किती आर्थिक- मानसिक त्रास सहन करावा लागेल? हे माहीत नाही. आपल्या पाल्याच्या शैक्षणिक भविष्यासाठी पालकांना अधिकाऱ्यांसमोर अक्षरशः नतमस्तक व्हावे लागते आणि दाखले मिळवावे लागतात. अतिशय फालतू कारणं सांगून तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी-अधिकारी वर्ग दाखला घेणाऱ्याला अगदी जेरीस आणतात. सर्वसामान्य जनता या कर्मचाऱ्यांना-अधिकाऱ्यांना वठणीवर आणू
-
अजित परब यांचे पर्यावरणपूरक अभूतपूर्व संशोधन!
संपूर्ण देशात संशोधनाचा वापर झाल्यास प्रचंड आर्थिक बचत! प्रदूषण-दुर्गंधीत घट होऊन जमिनीची सुपीकता वाढेल! सगळा सुंदर स्वच्छ परिसर, कुठेही कचरा नाही, दुर्गंधी नाही, हवेच-पाण्याचं प्रदूषण नाही, चिखल नाही, मच्छर नाही. सार्वजनिक शौचालय मुताऱ्या दुर्गंधीमुक्त, डम्पिंग ग्राउंड दुर्गंधीमुक्त. ह्या मधून जे काही तयार होईल; ते पर्यावरण पूरक असेल! असं संशोधन झालं तर??? होय, असं संशोधन सिंधुदुर्ग
-
स्पष्ट भूमिका मांडणाऱ्यावर अन्याय करणाऱ्या भ्रष्ट `सिस्टीम’ विरोधी मारुती पावसकर यांचा लढा!
रोजगार हमी योजनेतील बोगसपणा आणि वास्तव! सत्ता कोणत्याही पक्षाची असो जोपर्यंत प्रशासनातील अधिकारी आपला कारभार जनतेच्या कल्याणासाठी करत नाहीत तोपर्यंत जनतेच्या मनात राज्यकर्त्यांसह प्रशासनाच्या विरोधात रोष असतो. पंचायत राज व्यवस्थेत ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ह्या ग्रामीण भागात विकासाच्या मूलभूत सुखसोयी निर्माण करणाऱ्या स्वराज्य संस्था. त्यामुळे ग्रामीण भागातील कष्टकरी जनतेला दिलासा देण्याचे कार्य या

