संपादकीय
-
प्रशासनावर वचक ठेवणारा आणि पराभवाने न खचणारा समर्थ नेता नारायण राणे!
सतराव्या लोकसभेचे निकाल जाहीर झाले. रत्नागिरी लोकसभा मतदार संघात शिवसेना-भाजपा युतीचे विनायक राऊत पावणेदोन लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून आले. स्वाभिमान पक्षाचे डॉ. निलेश राणे यांचा मतपेटीतून पराभव झाला. याचा अर्थ नारायण राणे यांची ताकद कमी झाली असं मानायचं कारण नाही. मतदारांचा कौल नेहमी मतपेटीतून व्यक्त होतो. या देशामध्ये यापूर्वी अनेक दिग्गजांचा पराभव झाला; परंतु विकासासाठी
-
समर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदन!
सतराव्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाला भारतीय मतदारांनी भरघोस दान दिले. सलग दुसऱ्यांना बहुमताने नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असून भारतीयांना अभिमान वाटेल असं त्यांच्याकडून कार्य होईल; अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मनःपूर्वक अभिनंदन! लोकसभेचे निकाल पाहता मतदारांना आपली बाजू समर्थपणे समजावून सांगण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे पुढील पाच
-
आगळ्यावेगळ्या लोकसभा निवडणुकीत `राज’ सवालांना जबाब देण्याची धमक दाखवाला हवी!
लोकसभेच्या निवडणुकीचे वारे देशात जोरदार सुरू आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान आता सुरु आहे. आरोप प्रत्यारोपांंच्या फैरी झाडल्या जात आहेत. विरोधक सत्ताधाऱ्यांच्या सत्ता कालावधीतील चुका दाखवित आहेत; तर सत्ताधारी आपणच राज्यकारभार सांभाळण्यास कसे लायक आहोत? हे सांगत आहेत. राजकीय नेते किती खरं बोलतात? हा संशोधनाचा विषय आहे. मतदारांना भुलविण्यासाठी मतदारांच्या नेमक्या भावना
-
बेरोजगारीचा महाराक्षस!
लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. राजकीय पक्षांकडून निवडणुका जिंकण्यासाठी सर्व उचित आणि अनुचित मार्ग वापरले जातील. सत्ता कोणाचीही येवो; पण प्रश्न मात्र संपत नाहीत. उलट ते प्रश्न अधिकाधिक गंभीर रूप धारण करतात. राजकीय पक्षांकडून दिलेली आश्वासनं पोकळ ठरतात आणि सर्वसामान्य जनतेचा अपेक्षाभंग होतो. आज जनतेचे काही मुख्य प्रश्न आहेत; ते कालही होते आणि आजही आहेत.
-
लोकसभा निवडणुकीतून लोकशाही सर्वांगिण विकासासाठी अधिक सदृढ व्हायला हवी!
सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान सात टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असून ५४३ खासदारांची निवड मतदार करणार आहेत. संपूर्ण लोकसभा म्हणजे देश घडविणारा मुख्य खांब. कारण संपूर्ण देशांमधून ५४३ खासदार एकाच वेळी निवडून येतात आणि देशाच्या सर्वांगिण विकासासाठी लोकसभा अतिशय महत्त्वाची भूमिका साकारत असते. १७ व्या लोकसभेत कोण
-
साधा-सोपा राजकारणी! मनोहर पर्रिकरांच्या आदर्शांना मनापासून सलाम!
कालच सायंकाळी गोव्याचे मुख्यमंत्री आणि भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे कर्करोगाच्या आजाराने निधन झाले. देशांमध्ये शोककळा पसरली. त्यांच्या दुःखद निधनाने देश हळहळला. देश साध्या सोप्या राजकारणी नेतृत्वाला मुकला. त्यांच्या जीवन चरित्राचा सलाम ठोकावा लागेल, अशी त्यांची जीवनशैली! कालपासून मनोहर पर्रीकर यांच्या सरळ साध्या आणि सोप्या जीवनातील घटना सोशल मीडियावरून आपण वाचल्या असतील. त्यांच्या साधेपणाच्या
-
विशेष संपादकीय- भारतीय वायूसेनेचे आणि पंतप्रधानांचे अभिनंदन!
भारतभूमी ही शूरवीरांची आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी ही भारतभूमी समर्थ आहे, सक्षम आहे; हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. क्रूरपणे, भ्याडपणे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांच्या पाकव्याप्त तळांवर भारतीय वायुसेनेने सर्जिकल स्ट्राइक करून जगाला दाखवून दिले आहे की भारत हा दहशतवाद्यांच्या विरोधात सक्षमपणे लढा देऊ शकतो. मनःपूर्वक अभिनंदन आहे भारतीय सैन्याचे! आम्हाला आमच्या सैन्यावर पूर्ण
-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा जाणता छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!
आजच्या दिवशी जिजाऊ मातेच्या उदरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने रयतेला जाणता राजा मिळाला. रयतेला फुलासारखा जपणारे, परकीय आक्रमणापासून रयतेचे रक्षण करणारे, स्वतः पालकत्वाची जबाबदारी स्वीकारून रयतेसाठी तलवार हाती घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या इतिहासात सर्वोच्च स्थानावर आहेत. आजही छत्रपती शिवाजी महाराज आमच्या मनात-आमच्या हृदयात आहेत, आमच्या
-
अतिरेकी कारवायांच्या मुळाशी जाऊन उपाययोजना आणि अतिरेक्यांना नामशेष करण्यासाठी थेट लष्करी कारवाई आवश्यक!
संपूर्ण देशामध्ये आज संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वाहनातून श्रीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना आत्मघातकी अतिरेक्यांनी लक्ष्य केले. गेल्या दशकातील हा सर्वात मोठा भीषण अतिरेकी हल्ला होता. यामध्ये आपले ४० जवान शहीद झाले. याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. पाकिस्तान पुरस्कृत जहाल अतिरेकी भारताला जसे लक्ष्य करतात. त्याचप्रमाणे आज संपूर्ण जगही दहशतवाद्यांच्या कारवायांनी
-
स्वर्गीय प्राचार्य मुकुंदराव कदम- सत्याकडे नेणाऱ्या जाणत्या विचारांचा सह्याद्री!
।। हरि ॐ।। महाराष्ट्रातील जेष्ठ निर्भिड पत्रकार, दैनिक ‘सिंधुदुर्ग समाचार’ चे संस्थापक संपादक, शिक्षणतज्ञ, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी लढणाऱ्या स्वर्गीय प्राचार्य मुकुंदराव कदम आमच्यातून निघून गेल्यावर एक वर्ष झालं. कालच देवगड तालुक्यातील गढिताम्हणे ह्या त्यांच्या मुळ गावी ‘वर्षश्राद्ध’ विधी त्याच्या कुटुंबियांनी केला. स्वर्गीय प्राचार्य मुकुंदराव कदम म्हणजेच आमचे ‘सर’ यांना विनम्र अभिवादन! ‘भावपूर्ण

