संपादकीय

  • दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेची मुल्य जोपासली पाहिजेत!

    पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने उमटलेली `अक्षरं’ समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी प्राधान्य देणारी ठरतात; जेव्हा ती अक्षरं व अक्षरातून तयार झालेले `शब्द’ समाजाशी बांधिलकी असणाऱ्या विद्वान अभ्यासू चिकित्सक वृत्तीच्या पंडित बाळशास्त्री जांभेकर यांच्या लेखणीतून प्रकटतात तेव्हा! आज महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा होत आहे. ६ जानेवारी १८३२ रोजी युगप्रवर्तक बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील दर्पण नावाचे पहिले वृत्तपत्र

    read more

  • स्वयंभगवान त्रिविक्रमाच्या मंत्रगजराने आणि वचनांनी येणाऱ्या काळात समर्थपणे जगता येईल!

    ।। हरि ॐ ।।।। श्रीराम ।।।। अंबज्ञ ।।।। नाथसंविध् ।।।। जय जगदंब जय दुर्गे।। नववर्षाच्या सर्व श्रद्धावानांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा! नववर्षाच्या शुभेच्छा ह्या फक्त नववर्षाच्या प्रथम दिवसासाठीच नाहीत! तर नववर्ष २०१९ सालातील प्रत्येक महिना, प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट, प्रत्येक सेकंदासाठी ह्या शुभेच्छा आहेत. आपण शुभेच्छा देताना `काळाची’ निवड करतो. ह्या काळाला आदि नाही

    read more

  • गावाशी ‘नाळ’ जोडली; रायगडच्या भूमिपुत्रांचे यशस्वी ‘पुनरागमन’

    ६३ कुटूंबांचे यशस्वी पुनर्स्थलांतर, ११२ कुटूंब गावच्या वाटेवर मुंबईसारख्या महानगरात केवळ रोजगारासाठी स्थलांतरीत झालेल्या रायगडच्या भुमिपुत्रांनी पुन्हा आपल्या गावाशी ‘नाळ’ जोडून घेत आपल्याच गावी यशस्वी ‘पुनरागमन’ केलंय. आपल्या गावी परतू इच्छिणाऱ्या या भूमिपुत्रांना पाठबळ देण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र कक्ष स्थापन केलाय. या कामी जिल्हा प्रशासनाला स्वदेस फाऊंडेशन सक्रिय सहभाग देत मदत करीत आहे. मार्च

    read more

  • सिंधुदुर्ग माझा- सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षकांनी सावध राहीले पाहिजे!

    भ्रष्ट युतीतून निर्माण झालेली राक्षसी यंत्रणा घातक;सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षकांनी सावध राहीले पाहिजे! लाच घेताना दोडामार्गमधील वाहतूक पोलीस राजेंद्र उर्फ राजा राणे पकडला गेल्यानंतर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी २६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. तसेच अवैध धंद्याशी संबधित असणाऱ्या सर्व पोलिसांना गृहराज्यमंत्री व सिंधुदुर्गाचे पालकमंत्री यांनी कारवाईचा इशारा दिला. किमान ह्या दोन बातम्यांचा वेध घेताना अनेक गैरगोष्टी समोर

    read more

  • अग्रलेख-उद्योगांना काही मिनिटात कर्ज… चांगला निर्णय- मेक इन इंडिया प्रत्येक जिल्ह्यात हवे! 

    लघू व मध्यम उद्योगांना काही मिनिटात कर्ज… चांगला निर्णय पण मेक इन इंडिया प्रत्येक जिल्ह्यात हवे!  आपल्या देशामध्ये उद्योगधंदे वाढले पाहिजेत, असं कुठल्याही राज्यकर्त्याला वाटणं साहाजिकच आहे. कारण उद्योगधंद्यामुळे खऱ्या अर्थाने देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळत असते. असंख्य नोकऱ्या त्यातून निर्माण होत असतात. शासनाच्या तिजोरीत विविध करांतून `अर्थ’ जमा होतो. हे उद्योगधंदे नव्याने स्थापित झाले पाहिजेत,

    read more

  • अग्रलेख- तरच बळीराजाला सुखाचे दिवस येतील…

    जाहिरातीवर १२ हजार कोटी खर्च करणारे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करणार?  महाराष्ट्रात युती शासनाला ४ वर्षे झाली. त्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी काय काय केले? त्याचा लेखाजोखा मांडला. मुख्यमंत्र्यांनी खालीलप्रमाणे दावे केले आहेत. १) २०१४ ते २०१८ ह्या चार वर्षात २२ हजार ११० कोटी रूपये शेतकऱ्यांसाठी शासनाने खर्च केले म्हणजे ५ हजार ५५५ कोटी

    read more

  • अभ्यासू जेष्ठ पत्रकार किसन वायंगणकर ह्यांची एक्झिट दुःखदायक!

    काल एक दु:खदायक बातमी आली. असलदे गावातील जेष्ठ पत्रकार किसन वायंगणकर यांनी अखेरचा श्वास घेतला आणि अभ्यासू-चिकित्सक पत्रकाराच्या विचाराला आपण मुकलो. पत्रकारिता हा काही व्यवसाय किंवा धंदा होऊ शकत नाही, पत्रकार ही काही नोकरी होऊ शकत नाही. ते एक व्रत आहे; असे आम्ही गेली पंचवीस वर्षे मानतो आणि असे व्रत पाळणारे किसन वायंगणकर ह्यांनी केलेली

    read more

  • संपादकीय- देशाच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करणारा ऋषी हरपला!

    माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी शेवटचा श्वास घेतला आणि भारतातील एक उत्तुंग अष्टपैलू व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. देशाचा सर्वांगिण विकास हेच त्यांचं सर्वोच्च ध्येय होतं. ह्या ध्येयासाठीच त्यांनी आपल्या जीवनातील सर्व पैलू उपयोगात आणले. स्वतःचा सर्वांगिण विकास साधताना त्यांनी कशाचीही अपेक्षा न करता निस्वार्थीपणे देशासाठी केलेले कार्य अजर अमर आहे. त्यांच्या आदर्श जीवनाचे अनेक

    read more

  • संपादकीय- बॉम्ब बनविणारी विकृती घातकच; ती ठेचायलाच पाहिजे!

    आज पहाटे नालासोपाऱ्यात वैभव राऊतला अटक करण्यात आली. अनेक बॉम्ब आणि बॉम्ब बनविण्यासाठीचे लागणारे साहित्यासह तो एटीएसच्या (Anti-Terrorism Squad दहशतवाद विरोधी पथक) जाळ्यात सापडला. त्याचे धागेदोरे खूप दूरपर्यंत पोहचले असल्याचे प्राथमिक तपासावरून समजते. त्यामुळे लवकरच ह्या प्रकरणावर पुरेसा प्रकाश पडेल; परंतु बॉम्ब बनविणारी विकृती देशाच्या अंतर्गत सुरक्षेला छेद देणारी आहेच. ह्या विकृतीचा नाश करण्यासाठी सरकारने

    read more

  • संपादकीय- विध्वंस कोणाचा? विचार करणार का?

    महाराष्ट्रात जातीच्या आधारावर मराठ्यांना आरक्षण पाहिजे; ह्यावर कुणाचेही दुमत नाही. सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटना मराठा आरक्षणासाठी आग्रही दिसत आहेत. न्यायालयाने मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब करावे म्हणून सत्ताधारी आपल्या बाजूने कोणतीही त्रुटी राहणार नाही ह्याची काळजी घेत आहे व त्याबाबत आपली भूमिका मांडत आहे. शांततेने मोर्चा काढण्याचा विक्रम `मराठा’ क्रांतीकडे जातोच. शासनाने शांततेच्या मूक मोर्चाला प्रतिसाद

    read more

You cannot copy content of this page