संपादकीय

  • संपादकीय- आधुनिक बदल स्वीकारून नेहमीप्रमाणे सहकार्य करा!

    सद्गुरूंचा शब्दच श्रद्धावानासाठी कल्याणाचा मार्ग! ॥हरि ॐ॥ ॥श्रीराम॥ ॥अंबज्ञ॥ नाथसंविध् सर्वांसाठी प्रेमपुर्वक हरि ॐ ! सद्गरु कृपेने पाक्षिक ‘स्टार वृत्त’ गेली सोळा वर्षे आपल्या भेटीस येत आहे. सद्गुरूंचा प्रत्येक शब्द हा श्रद्धावानांसाठी अनमोल असतो. श्रद्धावानांच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असणारे गुणकारी औषध असते. जीवनात कुठल्याही पातळीवर रोग-आजार येऊच नये म्हणून केलेले लसीकरण असते. एवढेच नाही तर

    read more

  • संपादकीय- भारताच्या सर्वांगिण प्रगतीसाठी मतदानाचा हक्क बजावणे महत्वाचे!

    नाथसंविध् ।। हरि ॐ ।। ।। श्रीराम ।। ।। अंबज्ञ ।। सर्वांगिण प्रगतीचे द्वार उघडण्यासाठी देशातील प्रत्येक संस्थेला पुढाकार घेऊन उचित नियोजनानुसार कार्य करायला पाहिजे. देशातील व्यक्ती असो वा संस्था प्रत्येकाने सर्वांगिण प्रगतीसाठी आपआपली कर्तव्य निष्ठेने पार पाडली पाहिजेत. मतदारांनी मतदानादिवशी सुट्टी साजरी न करता मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. लोकशाही व्यवस्थेमध्ये मतदारांची ही भूमिका अतिशय

    read more

  • सर्वांगिण विकासासाठी आदर्श व्यक्तिमत्वे हवीत!

    भारताचा सर्वांगिण विकास होण्यासाठी अजिबातच प्रयत्न झाले नाहीत, असं म्हणता येणार नाही. भारताने वैज्ञानिक प्रगती करताना औद्योगिक विकासही केला. भारतीय उद्योगपतींनी विदेशातील अनेक कारखाने-कंपन्या विकत घेतल्या. वीस लाखांपेक्षा जास्त भारतीय आज अमेरिकेमध्ये नोकरी-व्यवसाय करताहेत. आधुनिक शिक्षणाने-उच्च शिक्षणाने भारतीयांनी जगभरामध्ये महत्वाची स्थानं पटकावली आहेत. तर त्याच भारतामध्ये हजारो टन अन्नाची नासाडी केली जाते व दुसरीकडे कष्टकरी शेतकरी-भूमिहीनांना  एक वेळच्या अन्नासाठी

    read more

  • श्री. राम गावडे-`अर्थ’ पुरुषार्थाचा मार्गदर्शक -क्षा. म. समाजातील आदर्श

    समाज माझा, मी समाजाचा! ।। हरि ॐ ।। ‘समाज माझा, मी समाजाचा’ ही लेखमाला क्रमश: लिहित असताना अनेक गोष्टी स्पष्टपणे मांडल्या. नवव्या लेखामध्ये पुढे काय लिखाण करायचे आहे, त्याची रूपरेषा ठरविली. दहाव्या लेखामधून आदर्श व्यक्तीमत्वांबद्दल लिहायचे होते; परंतु `शिरोडकर बिझनेस ग्रुप’चा जो कार्यक्रम होणार होता त्याला शुभेच्छा देण्यासाठी लेख लिहिला. खूप वेळानंतर पुन्हा एकदा मी

    read more

  • छत्रपती शाहू महाराज, आधुनिक भारताचा लोकराजा!

    बहुजनांच्या उद्धाराचे कार्य करणारे छत्रपती शाहू महाराज! छत्रपती शाहू महाराजांच्या शरीराला मॉलिश करणारा त्यांचा बॉडीगार्ड धनगर, मॉलिश करतानाच त्यांच्या पलंगावर गाढ झोपी गेला! आपल्या पलंगावर झोपलेल्या त्या निरागस धनगराला न उठविता आपली रजई त्यांच्या अंगावर घालून शाहू राजे त्या धनगराच्या घोंगडीवर झोपले! धनगराच्या घोंगडीवर आनंदाने झोपणाऱ्या राजाचे मन केवढे आभाळाएवढे होते; हे पाहिले की मन

    read more

  • सद्गुरूंवरील श्रद्धाच सर्वांगीण विकास घडविते! -श्रीस्वामी राम

    ‘श्रीस्वामी राम’ हे आध्यात्मिक सदगुरु आपल्या गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली पंचेचाळीस वर्षे हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात वावरले. आध्यात्मिक अनुभूती अनुभवली. हिमालयातील भौगोलिक रचना आणि निसर्गाची अद्भुतता अभ्यासलीच नव्हे तर त्यांच्याशी मैत्री केली. त्यांच्या `हिमालयातील महात्म्यांच्या सहवासात’ ह्या ग्रंथामध्ये त्यांनी आपले अद्भूत अनुभवांची शिदोरी सर्वांसाठी खुली केली आहे. त्याबद्दल जसे जमेल तसे लिखाण करण्याचा मानस आहे. परंतु त्यांनी आपल्या

    read more

  • क्षा. म. समाजाच्या सर्वांगिण प्रगतीची मुहूर्तमेढ!

    समाज माझा, मी समाजाचा!- लेखांक १० वा  क्षा. म. समाजाच्या सर्वांगिण प्रगतीची मुहूर्तमेढ! ‘शिरोडकर बिझनेस ग्रुप’ला शुभेच्छा! ।। हरि ॐ ।। क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे आद्यदैवत डॉ. रामचंद्र शिरोडकर यांनी सर्वच क्षेत्रात मागासलेल्या क्षा. म. समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून उचित दिशा दिली. क्षा. म. समाज संस्थेचा पाया रचला जो एवढा मजबूत आहे की त्या पायावरच

    read more

  • एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा।।

    एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा।। ।। हरि ॐ ।। तूं मजकडे अनन्य पाहीं। पाहिन तुजकडे तैसाच मीही। माझ्या गुरूनें अन्य कांहीं। शिकविलें नाहींच मजलागीं।।७३।। नलगे साधनसंपन्नता। नलगे षट्शास्त्रचातुर्यता। एक विश्वास असावा पुरता। कर्ता हर्ता गुरु ऐसा।।७४।। म्हणूनि गुरूची थोर महती। गुरुहरिहरब्रह्ममूर्ती। जो कोण जाणे तयाची गति। तो एक त्रिजगतीं धन्य गा’’।।७५।। (श्रीसाईसच्चरित

    read more

  • सद्गुरु श्रीसाईनाथांच्या चरणी समर्पित!

    ।। हरि ॐ।। श्रीसाई कोण होते? परमात्मा होते. परमात्मा श्रीराम म्हणून आले, श्रीकृष्ण म्हणून आले आणि आपले अवतार कार्य पूर्णत्वास नेले. तोच शिरडीमध्ये श्रीसाई म्हणून अवतरला. परमेश्वराची भक्ती कशी करावी, याचा आदर्श मार्ग दाखविला. भारतीय संस्कृतीचा ज्या गोष्टींवर पाया रचला आहे त्या गोष्टींमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खरीखुरी निष्काम भक्ती. परमात्म्याची ही भक्ती सर्वसामान्यांनी करून जीवन

    read more

  • जेष्ठ पत्रकार, संपादक, प्राचार्य मुकुंदराव कदम यांच्या कर्तृत्वाला सलाम!

    कष्टकऱ्यांचा सच्चा मित्र हरपला! जेष्ठ पत्रकार, संपादक, प्राचार्य मुकुंदराव कदम यांच्या कर्तृत्वाला सलाम! माझे गुरुवर्य परमात्म्याच्या कुशीत विसावले! अन्यायाविरुद्ध, भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध लेखणीच्या माध्यमातून लढा उभारणारे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सातत्याने मांडणारे, शिक्षण, शेती, राजकारण, समाजकारण अशा अनेक विषयात प्रज्ञावंत असणारे, कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयास करणारे, पत्रकारितेमध्ये सर्वोच्च आदर्श व्यक्तिमत्व असणारे प्राचार्य मुकुंदराव कदम आम्हाला सोडून गेले. रविवार

    read more

You cannot copy content of this page