संपादकीय
-
असलदेवासियांनो सावधान! स्टोन क्रेशरचा राक्षस येतोय!
आमचा असलदे गाव हा निसर्गाने संपन्न! असलदे गावामध्ये रोजगाराच्या संधी कधी निर्माण झाल्या नाहीत. सुमारे २५ वर्षापूर्वी कोकण विकास महामंडळामार्फत ताडतेल प्रकल्प राबविण्यात आला. गुंठ्याला ९ रुपये वार्षिक भाडे घेऊन जमिनी दिल्या गेल्या. तेव्हा साधा हिशोब मांडला गेला नाही. मी स्वत: जोरदार विरोध केला. माझ्या वडिलांचे नाव सातबारा उताऱ्यावर नसल्याने कायदेशीर लढाई करता आली नाही.
