संपादकीय
-
विशेष संपादकीय- `देश माझा मी देशाचा’ ही भावना दृढ व्हायला हवी!
७५ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! `देश माझा मी देशाचा’ ही भावना दृढ व्हायला हवी! आज आपण भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. त्यानिमित्ताने भारताच्या संविधानाचे उद्देश नेमके कोणते? हे संविधानाच्या आणि आता आपण विद्यार्थ्यांच्या क्रमिक पुस्तकाच्या प्रथम पृष्ठावर वाचतो. भारताचे संविधान उद्देशिका आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा
-
भक्तीचा श्रीरामोत्सव निरंतर प्रवाहित राहू दे!
||हरि ॐ|| ||श्रीराम|| ||अंबज्ञ|| आज पौष शुक्ल पक्ष द्वादशी विक्रम संवत २०८० अर्थात सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी नक्षत्र मृगशीर्ष आणि ब्रह्मा योग ह्याचा संयोग असून दुपारी १२:११ ते दुपारी १२:५३ दरम्यान अभिजीत मुहूर्त आहे. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांच्या शुभ पवित्र मुहूर्तावर अयोध्येतील श्री रामजन्मभूमीत नव्याने निर्माण होत असलेल्या भव्य दिव्य मंदिरात `श्रीराम’ प्राणप्रतिष्ठीत
-
बहुजन समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या अनुबंधाला सलाम!
सहकार महर्षी सहदेव फाटक साहेबांना १०० व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! स्वातंत्र्य सैनिक, सहकार महर्षी, कामगार नेते, सामाजिक सभानता जपणारे नेते, सर्वसामान्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जीवन समर्पित करणारे क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचे सुपुत्र स्वर्गीय सहदेव शंकर फाटक साहेबांचा १ जानेवारी २०२४ रोजी १०० वा जन्मदिन अर्थात जयंती होती. त्यानिमित्ताने २० जानेवारी २०२४ रोजी सोशल सर्व्हिस लीग, एन. एम.
-
माझा `राम’… आत्माराम, साईराम अनिरुद्धराम…!
मी अगदी सामान्य माणूस आहे! मला अध्यात्म समजत नाही, मी अज्ञानी आहे! मला मात्र एक गोष्ट पक्की ठाऊक आहे; `राम’ माझ्यातच आहे आणि `रावण’ही माझ्यात आहे! राम म्हणजे पवित्रता, शुभ, सुयश, सत्य, प्रेम, आनंद, ज्ञान, प्रकाश, सुसंस्कार; माझ्या जीवनाच्या सर्वांगिण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या उचित गोष्टी! तर ह्या सर्व उचित, शुभ व पवित्र गोष्टीना विरोध करतो
-
स्वयंभगवान त्रिविक्रम अनिरुद्ध रामाचे ‘रामराज्य’!
I lहरि ॐ।। ।।श्रीराम।। ।।अंबज्ञ।। ‘रामराज्य!’ रामराज्याचं स्वागत मोठ्या श्रद्धेने आनंदाने आणि प्रेमाने गुरुवार दिनांक ६ मे २०१० रोजी श्रीहरिगुरुग्राममध्ये केलं. श्रीरामाचे राज्य, परमात्म्याचे राज्य, परमेश्वर दत्तगुरु आणि आदिमाता महिषासुरमर्दिनी यांच्या पुत्राचे राज्य आणि ह्या रामराज्यामध्ये आपण सर्वजणांनी प्रवेश केलेला आहे. रामराज्याविषयी परमात्म्याने केलेले प्रवचन आम्ही ऐकलं आणि रामराज्याची संकल्पना आमच्या आमच्या कुवतीनुसार आम्हाला समजून
-
९३ वर्षांचा लढवय्या समाजसेवकाला मानाचा मुजरा!
कॉम्रेड दत्ता खानविलकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!! ज्याचं स्मरण होताच आपसुकपणे नमस्कारासाठी हात जोडले जातात, ज्याचं प्रत्यक्ष दर्शन होत तेव्हा आपसुकपणे त्यांच्या चरणांना स्पर्श करून नमस्कार केला जातो, ज्यांच्या सहवासात राहिल्यानंतर आपसुकपणे मनात उत्साह असा निर्माण होतो, जीवनाचे सत्य समजून येते; अशा व्यक्ती आपल्या जीवनात येणे सुद्धा परमभाग्य असावं लागतं! असं परमभाग्य मी उपभोगलं आणि उपभोगतोय!
-
अन्नपूर्णेचा कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास! (भाग- २)
सौ. मुग्धा मोहन सावंत अर्थात मुग्धा काकूंचा आज बासष्टवा वाढदिवस! त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! मुग्धा सावंत यांचा पाच दशकांचा प्रवास कष्टाचा, मेहनतीचा, त्यागाचा! आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाकरिता सर्वकाही करीत असताना आपल्या भावंडांना-नातेवाईकांना जीवनात-संसारात उभं राहण्यासाठी जे बळ दिलं; ते आदर्शवत असंच आहे; शिवाय नेहमी प्रेरणादायी असं आहे. म्हणून त्यांच्या जीवन प्रवासाचा आलेख शब्दांकित
-
राजकीय नेते अर्धसत्य सांगून एकमेकांचा फाडताहेत बुरखा!
राजकारण करताना राजकीय पक्ष नेहमीच जनतेसमोर अर्धसत्य सांगत असतात. पूर्ण सत्य सांगून ते राजकीय पटावर सरस ठरत नाहीत. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी राजकीय नेत्यांना अर्धसत्य सांगण्याचं `तत्व’ जपावच लागतं; हे सत्य जनतेने जाणून घ्यायलाच पाहिजे. आपण लोकशाही स्वीकारली आहे. ह्या लोकशाहीत मतदान करणारा मतदार ह्याबाबतीत नक्कीच चिकित्सक असायला हवा. त्याने राजकीय नेत्यांचा कारभार कोणत्या हेतूपोटी सुरु
-
संपादकीय… बाळांसाठी देवदूताचं कार्य करणाऱ्या डॉ. इरा शाह यांना साष्टांग दंडवत!
आपल्या कार्यामध्ये निःस्वार्थी वृत्तीने आणि समर्पित भावनेने जेव्हा एखादी व्यक्ती कार्य करते तेव्हा त्या कार्यातून त्याचे देवत्व सिद्ध होते. अशी व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात असो; ती सर्वसामान्य जनतेसाठी खराखुरा आधार बनते. त्या व्यक्तीच्या कार्यातून अनेकांना जो लाभ होतो तो शब्दांकित करणं कठीण होऊन जाते. तरीही बालरोग तज्ञ डॉ. इरा शाह यांच्याबद्दल अनेक दिवसांपासून चार शब्द लिहावेत
-
मराठा आंदोलन… राजकीय नेत्यांवरील अविश्वासाचे फलित!
मनोज जरांगे- पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा पाचवा दिवस! त्यामुळे मनोज जरांगे- पाटील यांची प्रकृती नाजूक होत चालली आहे. तर दुसऱ्या बाजूला आरक्षणासाठी मराठा युवक आत्महत्या करीत आहेत. तर गावागावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली आहे. अनेक ठिकाणी आमरण उपोषणं, साखळी उपोषणं, वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनं सुरु










