संपादकीय
-
साठीपार केलेल्या संजय पाटकरची सर्वोत्कृष्ट फलंदाजी!
आमचे बालपणीचे आणि तरुणपणीचे मित्र, क्रिकेट खेळतानाचे सहकारी सन्मानिय संजय पाटकर आजही दर्जेदार व उत्तम क्रिकेट खेळतो. वयाची साठ वर्षे पूर्ण होऊनही आपली क्रिकेट खेळायची हौस आवड त्याने योग्यरितीने जपली. निवृत्तीचे जीवन जगताना नेमकं काय करू असा प्रश्न अनेकांना साठीनंतरचे जीवन जगताना पडतो. मात्र संजय पाटकर ह्या आमचा मित्र आजही मैदानात मोठ्या ताकदीने उत्साहाने खळतो
-
संपादकीय- राजकारणात नैतिक मूल्यांचा ऱ्हास???
भारतातील लोकशाहीबद्दल जगभरात कौतुक होत असतं; कारण जागतिक लोकसंख्येमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या आपल्या देशात गेली ७५ वर्षे लोकशाही नांदत आहे. (सन १९७५ मध्ये २१ महिन्यांचा आणीबाणीचा कालावधी वगळता) लोकशाहीमध्ये मतदार, राजकीय पक्ष आणि राजकारण या तीन घटकांचा साधासुधा अभ्यास केल्यास देशातील गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणाविषयी होत असलेल्या घडामोडींबद्दल मतदार म्हणून आपणास आश्चर्य वाटत नाही. म्हणून राजकारणाबद्दल
-
विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!
अपावित्र्याचा नाश, असत्याचा शेवट, अशुभाचा पराभव होत असताना पवित्रता, सत्य आणि शुभ `विजयी’ होण्याचा दिवस म्हणजे विजयादशमी! अशा शुभ, पवित्र दिवशी पाक्षिक `स्टार वृत्त’च्या सर्व वाचकांना, हितचिंतकांना, श्रद्धावानांना मनःपूर्वक शुभेच्छा!
-
संपादकीय- व्रतस्थ पत्रकारितेची फलश्रुती!
आजच्या विजयादशमी दिवशी पाक्षिक `स्टार वृत्त’चे २३ व्या वर्षात पदार्पण! हरि ॐ श्रीराम अंबज्ञ आज विजयादशमी! अपावित्र्याचा नाश, असत्याचा शेवट, अशुभाचा पराभव होत असताना पवित्रता, सत्य आणि शुभ `विजयी’ होण्याचा दिवस म्हणजे विजयादशमी! अशा शुभ, पवित्र दिवशी पाक्षिक `स्टार वृत्त’च्या सर्व वाचकांना, हितचिंतकांना, श्रद्धावानांना मनःपूर्वक शुभेच्छा! पाक्षिक `स्टार वृत्त’ आजच्या दिवशी २३ व्या वर्षात पदार्पण
-
मनोज जरांगे-पाटील यांच्या मागे मराठा समाजाची ताकद! नेत्यांचा पोटात गोळा!
सर्वसामान्य मराठा समाजातील तरुण मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे मराठा समाजाचे नेतृत्व एवढ्या सहजपणे जाईल; असे वर्षानुवर्षे कसलेल्या आणि राजकारणात प्रस्थापित मराठा नेत्यांनाही स्वप्नातही वाटले नव्हते. आजही मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे मराठा समाजाचे नेतृत्व गेले आहे; हे सुद्धा त्यांचे मन मानायला तयार होत नाही. कारण त्यांच्या अजूनही लक्षात येत नाही की, मनोज जरांगे-पाटील मराठा समाजाचे नेते झालेच कसे?
-
पोलीस आणि राजकीय वरदहस्तामुळेच नांदगावातील अनधिकृत दारूधंदा बंद होत नाही!
अनधिकृत दारू धंदा असो की गुटखा विक्री, मटका, जुगार असो; पोलिसांनी जर ठरविले तर ह्या सामाजिक संतुलन बिघडविणाऱ्या गैरव्यवसायांवर अंकुश ठेऊ शकतात. अन्यथा चिरीमिरीच्या `अर्थ’पूर्ण तडजोडीतून असे गैरधंदे होतच राहणार. एवढेच नाहीतर ह्या गैरधंद्यातून निर्माण होणाऱ्या काळ्यापैशातून राजकीय वरदहस्त संपादन करणे सहजशक्य होते. ह्या अभद्र युतीतूनच गावागावातील सामाजिक आरोग्य व्हेंटिलेटरवर नव्हेतर मृत्युशय्येवर आहे. ह्याचे दुःख
-
संपादकीय- कष्टकरी जनतेला शहाणपणाचे डोस पाजणाऱ्या मुर्खांसाठी…
आर्थिक उत्पन्न कमी असणाऱ्या कष्टकरी जनतेला पेट्रोल- डिझेल व घरगुती गॅस स्वस्त पाहिजे. शिक्षण आणि वैद्यकीय सेवा मोफत किंवा अत्यल्प दरात पाहिजे. मोफत किंवा अत्यल्प दरात रेशन पाहिजे. हा त्यांचा अधिकार आहे. कारण कष्टकरी श्रमदान करणारा भारतीय आजही आर्थिक दुर्बलतेने जर्जर झालेला आहे. त्याला जगण्यासाठी मोफत किंवा अत्यल्प दराने अन्नधान्य दिले नाहीतर तो उपाशी राहू
-
संपादकीय- गांधी विचारांचे `अमरत्व’!
भेकड हल्ल्याने गांधी विचार कधीच संपणार नाही! उलट गांधी विचारांचे `अमरत्व’ अधिकाधिक समर्थ होईल! महात्मा गांधींचा विचार गांधींची हत्या करूनही संपुष्टात आणता आले नाहीत. एवढेच नाही तर गेली ७०-८० वर्षे गांधींच्या प्रतिमेवर हल्ल्या करण्यात येतो; गांधी विचारांची पुन्हा पुन्हा हत्या केली जाते; पण गांधी विचारांचा प्रभाव आणि गांधी विचारांचा प्रसार कधी थांबला नाही आणि पुढे
-
संपादकीय- प्रामाणिक-कार्यक्षम नेतृत्वाची गरुड झेप!
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या लीगल सेलच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. विजय एस. ठाकूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या रिपब्लिकन लीगल आघाडीच्या (लीगल सेल) महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. विजय एस. ठाकूर यांची कालच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नियुक्ती केली. अॅड. विजय एस.
-
शिंदेवाडी ते थायलंड! व्हाया??? हा `व्हाया’ खूप मोठा आहे….
पा. `स्टार वृत्त’चे सहसंपादक मोहन सावंत यांच्या थायलंड देशातील आध्यात्मिक, सामाजिक आणि आर्थिक अभ्यास दौऱ्यास पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा! श्री. मोहन सावंत अर्थात सर्वांचे लाडके `बापू’ यांचे बालपण दादरच्या शिंदेवाडीत गेले. त्यांना मालवणी-मराठी माणसांच्या सहवासात खूप काही शिकता आले. आता शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर सामाजिक बांधिलकी जोपासत नव्या जोमाने विविध सामाजिक










