संपादकीय
-
‘दिविजा वृद्धाश्रम’ आणि सन्मा. अविनाश फाटक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आभाळाएवढ्या शुभेच्छा!
असलदे गावात २५ फेब्रुवारी २०१७ रोजी स्वस्तिक फाऊंडेशन संस्थेचा ‘दिविजा वृद्धाश्रम’ सुरु झाला आणि गेल्या पाच वर्षात प्रामाणिक, कार्यक्षम व निःस्वार्थी वृत्तीने केलेल्या समाजसेवेचा खराखुरा आदर्श रचला गेला. स्वस्तिक फाऊंडेशन संस्थेचे विश्वस्त म्हणून सन्मा. अविनाश फाटक साहेब यांची समाजसेवेला वाहून घेण्याच्या वृत्तीने वृद्धांच्या सेवेचा वटवृक्ष उभा राहिला. त्यांचाही आज वाढदिवस! म्हणूनच ‘दिविजा वृद्धाश्रम’ आणि सन्मा.
-
लोकशाही तत्वाला चिरडून मारणारी विकृती ठेचायलाच हवी…!
परवा सकाळी राजापूर येथील पत्रकार शशिकांत शंकर वारीशे (वय ४५ वर्षे, रा. कशेळी) बातमी प्रसिद्ध करतात. ज्या राजापूर रिफायनरी समर्थकाविरोधात ही बातमी असते, त्याच्याच गाडीखाली त्याच दुपारी तो पत्रकार चिरडला जातो. दुचाकीवर असणाऱ्या पत्रकाराला चार चाकी वाहनाने धडक देऊन दोनशे अडीशे फूट फरफटत नेले जाते व ती व्यक्ती पसार होते. दुचाकीवर असणारा पत्रकार रक्ताच्या थारोळ्यात
-
संपादकीय- शुभेच्छांची जबाबदारी!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ आज माझा वाढदिवस असल्याने अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोनवरून, समाजमाध्यमातून खूप खूप शुभेच्छा दिल्या! माझ्यावर दाखविलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद! आपले प्रेम असेच चिरंतर राहू दे; ही सदिच्छा! आजच्या शुभदिवशी आपल्याशी सुसंवाद साधावा म्हणून हा लेखन प्रपंच! दरवर्षी वाढदिवस येतो आणि नातेवाईक, मित्रपरिवार, हितचिंतक शुभेच्छा देतात. खरंच खूप आनंद होतो. समाजमाध्यमांमुळे आता
-
परोपकारी आदर्श गुरू प्रमोद लोके सरांना मानाचा मुजरा!
श्री. प्रमोद लोके सरांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा! आज कोळशी-हडपीड माध्यमिक हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मा. श्री. प्रमोद नामदेव लोके सेवानिवृत्त होत आहेत; त्या निमित्ताने आमच्या खूप खूप शुभेच्छा! श्री. प्रमोद लोके सर हे सायन्समधील पदवीधर. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. मात्र त्यांनी अगदी ध्येयसमोर ठेऊन शिक्षकीपेशा स्वीकारला आणि सेवानिवृत्त होईपर्यंत हजारो विद्यार्थी घडविले. सायन्स विषयाचा शिक्षक हा प्रॅक्टिकल
-
आनंदाच्या भेटी आणि भेटीचा आनंद…
वर्तमानकाळातील प्रत्येक `क्षण’ क्षणाक्षणाला भूतकाळात जात असतो. हा भूतकाळ पुन्हा आणता येत नाही; हे खरं असलं तरी त्या भूतकाळातील आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा व्यक्त करता येतात, अनुभवता येतात आणि त्याची अनुभूती काही औरच असते. भूतकाळातील आनंदाचे क्षण पुन्हा अनुभवण्याची अनुभूती जीवनात चिरंतर टिकून राहते. हे आम्ही सर्वांनी अनुभवलं… कामगार राज्य विमा योजना, मुंबई येथील कार्यालयातून
-
कबड्डीच्या जगन्नाथाला ८० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगन्नाथ अर्थात जगाचा स्वामी! कब्बड्डी खेळावर जीवापाड प्रेम करणाऱ्या नव्हेतर कबड्डी खेळ हेच जीवन बनविणारे सन्मानिय श्री. जगन्नाथ भोसले खऱ्या अर्थाने कबड्डीचे जगन्नाथ आहेत. उभं आयुष्य कब्बड्डी खेळावर प्रेम करून अनेकांना त्या खेळाचा कसा आनंद लुटायचा? हे त्यांनी सहजरित्या दाखवून दिले. एका बाजूला कबड्डीचा खेळ तर दुसऱ्या बाजूला सामाजिक, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रातही त्यांनी आपले
-
आभाळाएवढी माया देणारी ‘माई’!
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ आभाळाएवढी माया देणारी ‘माई’! शेवटचा दिवस गोड करून श्रीराम चरणी विलीन झाली! संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे, याचसाठी केला होता अट्टाहास| शेवटचा दिस गोड व्हावा|| हे शेवटचे दिवस, अंतिम दिवस, अंतिम क्षण गोड होण्यासाठीच संपूर्ण जीवनात सत्याचा, प्रेमाचा, आनंदाचा मार्ग स्वीकारावा लागतो. तेव्हा आणि तेव्हाच ‘शेवटचा दिस गोड’ होतो! असाच शेवटचा
-
अन्नपूर्णेचा कष्टमय तरीही यशस्वी आदर्श प्रवास! (भाग- १)
सौ. मुग्धा मोहन सावंत अर्थात मुग्धा काकूंचा आज एकसष्टवा वाढदिवस! त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हा लेखन प्रपंच! मुग्धा सावंत यांचा तीस-पस्तीस वर्षाचा प्रवास कष्टाचा, मेहनतीचा, त्यागाचा आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाकरिता सर्वकाही करीत असताना आपल्या भावंडांना-नातेवाईकांना जीवनात-संसारात उभं राहण्यासाठी जे बळ दिलं; ते आदर्शवत असंच आहे; शिवाय नेहमी प्रेरणादायी असं आहे. म्हणून त्यांच्या जीवन प्रवासाचा आलेख शब्दांकित
-
संपादकीय…. ‘लोकशाही’च्या ज्ञानोत्सवाची दीपावली आवश्यक!
सर्व वाचकांना मित्रांना, हितचिंतकांना, तसेच काबाडकष्ट करून जीवन जगणाऱ्या मजुरांना- नोकर वर्गाला आणि अन्न देणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच समस्त भारतीयांना दिपावलीच्या लाख लाख शुभेच्छा! आम्ही व्यक्तिशः लाखो करोडो पणत्या नाही लावू शकत. तेवढे सामर्थ्य आमच्याकडे नसते. मात्र `मी’ एक जरी पणती लावून अंध:कारावर माझ्यापुरता का होईना; मात करू शकतो. ज्या समाजात- ज्या देशात मी राहतो; त्या
-
जीवलग मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्रात सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात उतुंग कामगिरी करणाऱ्या शिवनेरी सेवा मंडळाचे खजिनदार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे, उपाध्यक्ष श्री. सचिन शिंदे यांना वाढदिवसाच्या हार्दिक अनिरुद्ध शुभेच्छा! समाजकार्यासाठी स्वतःला समर्पित करणारे, गरजवंताला नेहमीच मदत करणारे, मनमिळावू स्वभावाचे, खूप मोठा मित्रपरिवार असणारे श्री. सचिन शिंदे शिवनेरी सेवा मंडळाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सामाजिक, शैक्षणिक आणि क्रिडा कार्यात नेहमीच पुढाकार




