वृत्तवेध
-
येवा कोकण आपलाच आसा! तेही मुंबईत!!
मुंबई:- असलदे मधलीवाडीतील यशस्वी उद्योजक सन्मा. श्री. दयानंद लोके मुंबई शहरात आजपासून ‘लोके फूड प्रोडक्ट’ नावाच्या शॉपचा शुभारंभ करीत आहेत. येथे कोकणातील सर्व वस्तू व उत्पादने, मालवणी मसाला, लोणचे, कोकम, आगुळ, सरबत, काजू, फणस-आंबा पोळी, नारळ, सर्व प्रकारचे लाडू, मालवणी खाजा अशाप्रकारचे सर्व मालवणी व कोकणी वस्तू चाकरमान्यांना दर्जेदार व किफायतशीर दरात उपलब्ध होणार आहेत.
-
बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान योजना
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वपूर्ण निर्णय मुंबई:- राज्यातील बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान देणाऱ्या योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या संस्थांना दहा लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल. यासाठी वीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. एकावन्न टक्क्यांपेक्षा जास्त बौद्ध विश्वस्त व सदस्य असलेल्या संस्थांना पायाभूत
-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा साहित्यिकांशी संवाद
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय मराठीजनांना सुखावणारा मुंबई:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय समस्त मराठीजनांना सुखावणारा असून खऱ्या अर्थानं अभिजात साहित्याचा ठेवा ज्यांनी तयार केला, अशा सगळ्यांचं हे श्रेय आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल
-
मराठी भाषेला अभिजात दर्जा! ३ ऑक्टोबर मराठी भाषा गौरव दिन!!
माय मराठीसाठी सोन्याचा दिवस! आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई:- आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद
-
खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे भाडेदर निश्चित
सिंधुदुर्गनगरी:- राज्यातील प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात खाजगी कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. अशा प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून खाजगी कंत्राटी वाहतुकीची ने-आण करणाऱ्या वाहतुकदारांकाडून गर्दीच्या हंगामामध्ये अवाजवी भाडेवाढ करण्यात येते. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गृह विभागाच्या शासन निर्णयान्वये राज्यातील खाजगी कंत्राटी प्रवाशी वाहनांचे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. निश्चित केलेले भाडेदर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भाडेदरापेक्षा
-
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव
मुंबई:- कृषी विभागातर्फे बुधवार दिनांक २१ ऑगस्ट ते २५ ऑगस्टपर्यंत बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात भव्य राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन त्याचबरोबर राज्यभरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शेतकरी बांधवांनी परळी वैजनाथ राज्यस्तरीय कृषी महोत्सवास भेट द्यावी, असे
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ
सिंधुदुर्गनगरी:- शासन सर्वसामान्य गरीब जनता नजरेसमोर ठेवून त्यांच्या गरजेच्या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करत आहे. राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य गरीब स्वावलंबी आणि समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हिच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेव्दारे माझ्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. प्रत्येक
-
स्वातंत्र्याचा `अर्थ’ महत्वाचा!
१५ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट २०२४ ह्या ७७ वर्षाचा स्वातंत्र्याचा प्रवास भारताने केला. ह्या प्रवासात अनेक अडथळे आले; तर काही ठिकाणी देशाने स्वयं सामर्थ्याने आपली क्षमता सिद्ध केली. ह्या ७७ वर्षाच्या काळात म्हणजेच भूतकाळात काय घडले? ह्याचे सिंहावलोकन करीत असताना भविष्यातील भारतासमोरील आव्हानांचा विवेकबुद्धीने विचार करायला हवा आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्रात सत्ताधारी असणाऱ्या
-
दिव्यागांसाठी ५० हजारांवरून अडीच लाखापर्यंत कर्ज मर्यादा वाढवली.
दिव्यांगांसाठी सर्व महापालिकांमध्ये पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. मुंबई:- राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार, स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण, समुपदेशन, वैद्यकीय सहायता या सर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकांनी सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आज येथे दिले. दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी
-
विकसित भारत @ 2047 संकल्पनेच्या स्वप्नपूर्तीसाठी महाराष्ट्र वचनबद्ध! -मुख्यमंत्री
नवी दिल्ली:- विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध असून राज्य शासनाने गरीब, शेतकरी, महिला सक्षमीकरण, युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी धोरणे बनवलीआहेत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. राष्ट्रपती भवन येथे अशोक मंडपात नीति आयोगाच्या नवव्या नियामक परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली. या परिषदेत विविध










