वृत्तवेध
-
रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवानीत्यांचा सत्कार
सोनम वांगचुक, डॉ. भरत वाटवानी यांनी महाराष्ट्राचे सदिच्छादूत म्हणून काम करावे – विनोद तावडे मुंबई:- शिक्षण क्षेत्रात काळा-bनुरुप बदल होत आहे. पण येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्राला पुढे नेताना सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवानी यांच्यासारख्यांची महाराष्ट्राला गरज आहे. समाजातील प्रत्येकाचा भावनिक बुद्ध्यांक वाढविण्यासाठी या दोघांनी महाराष्ट्राचे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बॅसेडर) म्हणून काम करावे. जेणेकरुन अनेकांना प्रेरणा
-
अमेरिकेने नवनव्या गोष्टींचा शोध घेऊन जगाला सुखी करावे! -उद्योगमंत्री सुभाष देसाई
अमेरिकेच्या २४२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उद्योगमंत्र्यांकडून शुभेच्छा मुंबई:- भारत आणि अमेरिका लोकशाहीचा पुरस्कार करणारे जगातील मोठे देश आहेत. लोकशाही ही दोन्ही देशातील समान धागा आहे. अमेरिकेच्या २४२ व्या स्वातंत्र्यदिनी “नाविन्यपूर्ण संशोधन” ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवण्यात आली असून ती कौतुकास्पद आहे. अमेरिका जेव्हा नवनवे शोध लावते, तेव्हा त्याचा संपूर्ण जगाला फायदा होतो. यापुढेही अमेरिकेने नवनव्या गोष्टींचा शोध
-
राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना जानेवारी २०१९ पासून वेतनलाभ
सातवा वेतन आयोग लागू होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल महागाई भत्त्याची थकबाकीही मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा मुंबई:- राज्य शासनाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना २०१७ मधील थकीत महागाई भत्त्यासह सातव्या वेतन आयोगाचा वेतनलाभ जानेवारी २०१९ पासून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वर्षा निवासस्थानी विविध अधिकारी-कर्मचारी संघटनांसमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री
-
राजर्षी शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना सर्व लाभार्थ्यांना पोहचविण्याचे शासनाचे निर्देश
राज्यातील पहिले मराठा वसतीगृह कोल्हापुरात सुरू अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत बॅंकांना क्रेडीट गॅरंटी मुंबई:- राज्यातील ज्या महाविद्यालयांनी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना दिला नाही अशा शिक्षणसंस्थांची बैठक येत्या दोन दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी व समस्येचे निराकरण करून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळवून द्यावा. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी बॅंकाची बैठक घेऊन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाने क्रेडीट
-
मुद्रा योजना- महाराष्ट्रात ५७ हजार कोटींचे व देशात ६ लाख कोटींहून अधिक कर्ज वितरण
एक कोटींहून अधिक कर्ज प्रकरणे मंजूर : तरुण कर्ज प्रकारात महाराष्ट्र अव्वल नवी दिल्ली:- प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात जुलै २०१८ अखेर ५७ हजार ४४३ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले असून आतापर्यंत १ कोटीहून अधिक कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत, तर तरुण कर्ज प्रकारात सर्वाधिक १६ हजार ५२९कोटींचे कर्ज वितरित करून महामहाराष्ट्रात १ कोटीहून
-
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र पॅकेजची कालबद्ध रितीने अंमलबजावणीचे निर्देश
मुंबई:- शासनाने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या जलद विकासासाठी २२ हजार १२२ कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली असून, या पॅकेजची अंमलबजावणी कालबद्ध रितीने पूर्ण करावी असे निर्देश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच दिले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या यासंबंधीच्या बैठकीस सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष
-
पर्यावरण रक्षणात महाराष्ट्राचे भरीव योगदान – एडगार्ड डी. कगन
अमेरिकेच्या भारतातील महावाणिज्यदूतांनी घेतली वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट मुंबई:- विक्रमी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य वन, वन्यजीव रक्षण आणि पर्यावरण संरक्षणामध्ये भरीव योगदान देत असल्याचे प्रशंसोद्गार अमेरिकेचे भारतातील महावाणिज्यदूत एडगार्ड डी. कगन यांनी काढले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची त्यांनी नुकतीच त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. आपण विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांना
-
चिपी विमानतळाचे ९५ टक्के काम पूर्ण- उर्वरित कामे पूर्ण करण्याचे उद्योगमंत्री यांचे निर्देश
मुंबई:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. धावपट्टी तयार झाली आहे. वीज, पाणी आणि रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित कामे पूर्ण करण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ कार्यान्वित करण्याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्यासह महाराष्ट्र औद्योगिक
-
महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
मुंबई:- राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या १५ नोव्हेंबर २०१८ पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दि. १ ते ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. ५८ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. १५ नोव्हेंबर २०१८ पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ५८
-
बाईक ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून मुंबईत वर्षभरात ३ हजार ६०० रुग्णांना जीवदान
पालघर, मेळघाट, पंढरपूर व गडचिरोली येथेही सेवा सुरू मुंबई:- मोटार बाईक ॲम्ब्युलन्स सेवा सुरु होऊन आज एक वर्ष पूर्ण झाले असून या कालावधीत सुमारे ३ हजार ६०० रुग्णांना जीवदान मिळाले आहे. वर्षभरात मुंबईत नव्याने १० तर मेळघाट आणि पालघर येथे प्रत्येकी पाच अशा एकूण ३० बाईक ॲम्ब्युलन्स राज्यात रुग्णांना सेवा देत आहेत. आज आरोग्यमंत्री डॉ.
