वृत्तवेध
-
टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा! -राज ठाकरे
अन्यथा आम्ही महाराष्ट्रातले टोलनाके जाळून टाकू! राज ठाकरे यांचा गर्भित इशारा ट्विटर आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मनसेची भूमिका… २ ऑक्टोबर २०२३ ठाणे-मुंबईच्या हद्दीवरच्या टोल पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ‘टोलमुक्त’ राज्य हे आश्वासन होतं, त्याचं काय झालं असं निवडणुका झाल्यावर विचारायचं नसतं असा सरकारचा एकूण आविर्भाव आहे. आणि ह्या टोलवाढीच्या विरोधात तुम्ही
-
घरबसल्या माहितीचा अधिकार वापरा! महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम!
सिंधुदुर्ग (हेमलता हडकर):- महाराष्ट्र शासनाने ई-गव्हर्नंन्सला नेहमीच महत्व दिले आहे. इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे माहिती मिळविण्याची इच्छा असलेल्या व्यक्ती व नागरिकांकडून आलेले अर्ज स्वीकारण्यासाठी व संबंधित माहिती देण्यासाठी शासनाने www.rtionline.maharashtra.gov.in या नावाचे पोर्टल चार वर्षांपूर्वी सुरु केले आहे. त्यामुळे घरबसल्या माहितीचा अधिकार वापरता येतो. महाराष्ट्र शासनाचा स्तुत्य उपक्रम सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना उपयुक्त ठरला आहे. माहितीचा
-
संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रय येथे जेष्ठ नागरिक दिन साजरा
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.):- वृध्दत्व ही समस्या नाही तर एक अवस्था आहे. वृध्दत्वामध्ये आपल्या एकटे वाटू शकते. वृद्धत्वाच्या अवस्थेत ज्येष्ठांनी छंद जोपासून जीवनाचा मनमुराद आनंद लुटावा, असे प्रतिपादन कणकवली येथील सेवानिवृत्त शिक्षिका श्रद्धा कदम यांनी केले. सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अणाव येथील संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रय येथे जेष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत जेष्ठ नागरिकाची आरोग्य
-
दर बुधवारी मुंबई शहराचे पालकमंत्री केसरकर साधणार सुसंवाद!
मुंबई (संतोष नाईक):- मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर दर बुधवारी नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत. यासाठी ते मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ ते १२.४५ या वेळेत, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात दुपारी १ ते ४ या वेळेत उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने मुंबई शहरातील सर्व नागरिकांनी शासकीय योजना, विकासकामे याबाबतच्या सूचना तसेच इतर समस्या असल्यास उद्या
-
विविध देशांचा ‘वर्ल्ड ट्रेड एक्स्पो’ मध्ये सहभाग!
राज्यपालांच्या हस्ते मुंबईत जागतिक व्यापार प्रदर्शनाचे उदघाटन मुंबई (अॅड.सुमित शिंगाणे):- भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी – २० शिखर परिषदेच्या यशानंतर भारताचे जागतिक पटलावर महत्व अधोरेखित झाले आहे. विविध देश आज व्यापार विस्तारासाठी चीनला समर्थ पर्याय म्हणून भारताकडे पाहत आहेत. युवा लोकसंख्येच्या रुपाने भारताला आणखी एक लाभांश मिळाला आहे. या महत्वाच्या वेळी आयोजित करण्यात आलेले जागतिक व्यापार
-
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे सहा निर्णय
दिवाळीनिमित्त शंभर रुपयांत आनंदाचा शिधा, मैदा, पोह्याचा देखील समावेश दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या शिध्यात आता मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चना डाळ, साखर आणि खाद्य तेल असे ४ जिन्नस
-
द्विविजा वृध्दाश्रमात सिंधुरत्न फाऊंडेशनने केले अन्नदान, पितृपक्षानिमित्त दात्यांना आवाहन!
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्रच्या अध्यक्षा व प्रसिध्द अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांनी आपल्या सहकारी महिलांसह कणकवली तालुक्यातील असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित दीविजा वृध्दाश्रमामध्ये जाऊन पितृपक्षा निमित्त अन्नदान आणि आर्थिक मदत केली. अशाप्रकारची आर्थिक मदत दरवर्षी करण्यात येते. यावेळी फाऊंडेशनच्या श्रद्धा पाटील, शांता पाटील, मीलन पाटील, मयुरा भंडारे, मनीषा मिठबावकर, नंदिता ढेकणे ,
-
आशियाई स्पर्धेत भारताचा नेमबाजीमध्ये सुवर्ण वेध
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्ण वेध घेणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलसह तिघांची नेमबाजीत कामगिरी मुंबई:- आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांश सिंह पनवर, ऐश्वर्य सिंह
-
‘फिट इंडिया मूव्हमेंट’ अंतर्गत सामान्य ज्ञान चाचणीचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी (जिमाका):- केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा विषयक सामान्य ज्ञान चाचणी Quiz 3 चे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी 5 सप्टेंबर 2023 पासून सुरु झाली असून 5 ऑक्टोंबर 2023 ही नोंदणी करण्यासाठीची शेवटची तारीख आहे. सर्व शाळा व विद्यार्थी https://fitindia.nta.ac.in या कार्यालयीन वेबसाईटवर नोंदणी करु शकतात. बक्षीसाची रक्कम मागील वर्षासारखीच
-
सूक्ष्म व लघू उद्योजकांनी जिल्हा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी (जिमाका) जिल्ह्यातील सूक्ष्म व लघू उद्योजकांनी जिल्हा पुरस्कार योजनेसाठी दि. 31 ऑक्टोंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याचे, आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस.एस. दामले यांनी केले आहे. जिल्ह्यातील यशस्वी उद्योजकांच्या मेहनतीचे, चिकाटीचे व जिद्दीचे कौतुक करण्याच्या हेतून जिल्हा स्तरावर उत्कृष्ट सूक्ष्म व लघु उद्योजकांसाठी जिल्हा पुरस्कार योजना 1985 पासून कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गंत










