वृत्तवेध
-
नागपूरची देशाच्या ‘लॉजिस्टिक हब’कडे वाटचाल – मुख्यमंत्री
नागपूर:- मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची सुरुवात बुटीबोरीतून होत आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित कामगार निर्माण करणारी कौशल्ययुक्त यंत्रणा उभी राहत आहे. कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून मोठ्या प्रमाणात घरे बांधली जाणार आहेत. कामगारांच्या प्रशिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी अत्याधुनिक रुग्णालये उभी राहत आहेत. रेल्वेचा कार्गो प्रकल्प देखील या ठिकाणी सुरू होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात नागपूर
-
अरबी समुद्र स्मारक-छ. शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा
अरबी समुद्रातील स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा असेल पुतळ्याची उंची कमी केली नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत स्पष्टीकरण नागपूर:- मुंबई येथील अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वात उंच पुतळा असेल. पुतळ्याची उंची कमी केली नाही. हे स्मारक पूर्ण करण्याकरिता जेवढा निधी लागेल, तेवढा राज्य शासन देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
-
३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा झाली
शेतकऱ्यांचे पीक विमा, पीक रोग नुकसानीचे सर्व पैसे देणार नागपूर:- शासन शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम तसेच बोंडअळी, तुडतुडा रोग नुकसान भरपाई आदीबाबतचे सर्व पैसे देणार आहे. यातील नुकसान भरपाईबाबत ४४ लाख शेतकऱ्यांपैकी ३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा झाली आहे. सरासरी १२ हजार प्रति हेक्टर प्रमाणे ही रक्कम देण्यात आली आहे. उर्वरितांच्याबाबत कार्यवाही सुरु
-
आदिवासी विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात तातडीने बैठक
नागपूर:- आदिवासी विद्यार्थ्यांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होणार नाही याची काळजी शासन घेत आहे. यासंदर्भात विभागाचे मंत्री तसेच संबंधित आमदार, अधिकारी यांच्यासमवेत बैठक घेऊन या विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींबाबत चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मोर्चासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री बोलत होते. आदिवासी वसतिगृहामध्ये अनधिकृत मुले राहत असल्याने अधिकृत
-
स्वावलंबनद्वारे सहा महिन्यात ऑटिझम रुग्णांना अपंग प्रमाणपत्र
नागपूर:- अपंगांना प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी केंद्र सरकारची स्वावलंबन प्रणाली राज्यात सहा महिन्यात सुरु करुन ऑटिझम रुग्णांनाही अपंग प्रमाणपत्र देण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी दिली. सदस्य बाबुराव पाचर्णे यांनी याविषयीची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती त्याला उत्तर देताना ते बोलत होते. डॉ.सावंत म्हणाले, राज्याच्या आरोग्य संचालनालयाने सॉफ्टवेअर फॉर असेसमेंट डिसॲबिलिटी (SADM) प्रणाली बंद
-
शिक्षणाचे बाजारीकरण होऊ देणार नाही – शिक्षणमंत्री विनोद तावडे
नागपूर:- खासगी कोचिंग क्लासेसच्या नावाखाली शिक्षण क्षेत्रात सुरु झालेली इंटीग्रेटेड नावाची व्यवस्था म्हणजे, शिक्षण क्षेत्राला लागलेली कीड आहे. ही कीड रोखण्यासाठी महाराष्ट्रात यापुढे शिक्षणाचे बाजारीकरण व लूट होऊ देणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना केले. सदस्य सर्वश्री पराग अळवणी, नरेंद्र पवार यांनी राज्यात सुमारे ५० हजाराहूंन अधिक
-
पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी २० हजार घरांचा आराखडा तयार
नागपूर:- राज्यातील पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी सध्या २० हजार घरांचा आराखडा तयार करण्यात आला असून ज्या भागात घरे मोडकळीस आली आहे, अशा ठिकाणी तो प्रामुख्याने राबविण्यात येणार आहे. मोडकळीस आलेल्या वसाहतींमध्ये नवीन घरे बांधण्यात येतील. पोलीस कर्मचाऱ्यांना गृहकर्जासाठी २०८ कोटी रुपये देण्यात आले असून त्याचे व्याज राज्य शासन अदा करत आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये पोलिसांचा
-
फिफा विश्वचषक २०१८- फ्रान्स विश्वविजेता
मॉस्को: – फिफा विश्वचषक २०१८ च्या अंतिम सामान्यत फ्रान्सने क्रोएशियाला ४-२ ने हरवून बाजी मारली आहे. आजच्या अंतिम सामन्याकडे जगभरातील फुटबॉल चाहत्यांच्या नजरा लागल्या होत्या. १९९८ मध्ये फ्रान्स विश्वविजेता ठरला होता. वीस वर्षांनी पुन्हा एकदा फ्रान्सने इतिहास घडविला. एकपेक्षा अधिक वेळा वर्ल्डकप जिंकणारा फ्रान्स सहावा देश ठरला आहे.
-
कॅन्सर रुग्णांवरील दर्जेदार उपचारासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट
टाटा ट्रस्ट व एनसीआय यांच्यामध्ये सामंजस्य करार नागपूर:- मुंबईतील प्रख्यात टाटा कॅन्सर हॉस्पिटलवर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण आहे. या परिस्थितीत उपचारासाठी मध्य भारत व विदर्भाच्या दुर्गम भागातील कॅन्सर पीडितांना नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट दर्जेदार रुग्णसेवेसाठी मैलाचा दगड ठरू शकते. टाटा ट्रस्ट व एनसीआय यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराचा आपणास आनंद आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
-
डेहराडून राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेशासाठी पात्रता परीक्षा
मुंबई:- महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तरांचल) येथे आठवीसाठी प्रवेश पात्रता परीक्षा दिनांक १ डिसेंबर आणि २ डिसेंबर २०१८ रोजी पुणे येथे घेण्यात येणार आहे. ही परीक्षा फक्त मुलांसाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांचे वय १ जुलै २०१९ रोजी ११.५ (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी आणि १३ वर्षापेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी सदर परीक्षेस
