वृत्तवेध

  • महाराष्ट्रातील ३४० गावांमध्ये होणार स्वच्छता सर्वेक्षण

    नवी दिल्ली:- केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने “स्वच्छ सर्वेक्षण-ग्रामीण २०१८” ची घोषणा करण्यात आली. हे सर्वेक्षण १ ते ३१ ऑगस्ट २०१८ पर्यंत होणार आहे. या सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट ठरणाऱ्या राज्यांना तसेच जिल्ह्यांना २ ऑक्टोबर या गांधी जयंतीदिनी सन्मानित करण्यात येणार आहे. येथील प्रवासी भारतीय केंद्रात, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत “स्वच्छ

    read more

  • फूडमॉल, मल्टिप्लेक्समध्ये खाद्य पदार्थ नेण्यास परवानगी

    फूडमॉल, मल्टिप्लेक्समध्ये खाद्य पदार्थांची विक्री अधिक दराने झाल्यास करवाई नागपूर:- राज्यातील फूडमॉल व मल्टिप्लेक्समध्ये खाद्य पदार्थांची विक्री छापील किंमतीपेक्षा अधिक दराने होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ज्यादा दराने विक्री केल्यास त्यांच्यावर वैधमापन शास्त्र अधिनियम, २००९ व वैधमापन शास्त्र (आवेष्टित वस्तू) नियम २०११ नुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यमंत्री

    read more

  • २०२० पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक

    २०२० पर्यंत इंदू मिलच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक नागपूर:- चैत्यभूमी दादर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकाबाबत शासन गंभीर आहे. स्मारकासाठी इंदू मिलच्या साडेबारा एकर जमिनीचे हस्तांतरण १०० टक्के झाले आहे. स्मारकाचे काम वेगाने सुरू असून हे स्मारक २०२०  पर्यंत पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले. डॉ.

    read more

  • कोल्हापूर जिल्हयात जलयुक्त शिवारने १७९ गावे बहरली

    कोल्हापूर:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जलयुक्त शिवार अभियान गतीमान करुन टंचाईमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न सत्यात उतविण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. याच अभियानाव्दारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सक्रीय योगदानामुळे कोल्हापूर जिल्हयात गेल्या चार वर्षात १७९ गावांमध्ये जलसंधारणाची १ हजार ८३५ कामे पूर्ण करुन जवळपास ७ हजार १८ टी.सी.एम. पाणीसाठा निर्माण केल्याने टंचाईग्रस्त भागातील शेतीला शाश्वत पाणी मिळाल्याने

    read more

  • नाणार प्रकल्पाबाबत स्थानिकांशी चर्चा करुन निर्णय घेणार! -मुख्यमंत्री

    विधानपरिषदेत लक्षवेधीवर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण नागपूर:- नाणार जि. रत्नागिरी येथील मेगा रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक शेतकरी, नागरिकांना विश्वासात घेऊन व चर्चा करुनच याबाबत निर्णय घेतला जाईल. स्थानिकांच्या संमतीशिवाय हा प्रकल्प लादणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानपरिषदेत सांगितले. सदस्य संजय दत्त यांनी नाणार प्रकल्पाबाबत लक्षवेधी मांडली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने सागरी

    read more

  • महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण पाहा

    नागपूर:- महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे सुरु असून त्याचं थेट प्रक्षेपण आपण पाहू शकतो. आपण निवडून दिलेले आमदार विधानसभेत जनतेचे प्रश्न कसे मानतात, विधानपरिषदेचे कामकाज कसे चालते? ते आपण पाहू शकतो. त्यासाठी पुढील लिंकला क्लिक करावी! विधानसभेसाठी  http://mls.org.in/live-streaming.aspx विधानपरिषदेसाठी http://mls.org.in/live-streaming-council.aspx

    read more

  • हरित सेनेतील सदस्य नोंदणी-गती देण्यासाठी विविध समित्या

    मुंबई:- राज्यात वनेत्तर क्षेत्रात वृक्षारोपण वाढावे, सध्याचे २० टक्क्यांचे वृक्षाच्छादनाचे प्रमाण वाढून ते राष्ट्रीय वननीतीप्रमाणे ३३ टक्क्यांपर्यंत जावे यासाठी वन विभागाने महत्त्वाकांक्षी पाऊले टाकली असून त्यापैकीच एक हरित सेनेची स्थापना आहे. हरित सेनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आता राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्या माध्यमातून हरित सेनामध्ये सदस्य नोंदणीच्या कामाला गती देण्यात येईल.

    read more

  • देशातील ६ प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये मुंबई आयआयटीचा समावेश

    नवी दिल्ली:- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने सार्वजनिक क्षेत्रातील ३ व खाजगी क्षेत्रातील ३ अशा भारतातील एकूण ६ शैक्षणिक प्रतिष्ठित संस्थांची नावे जाहीर केली असून यात आयआयटी मुंबईचा समावेश आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज ट्विट करून देशातील ६ प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांच्या नावांची घोषणा केली. मंत्रालयाच्या वतीने नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीने देशातील

    read more

  • भटक्या समाजाच्या पुनर्वसनासाठी राज्य शासन योजना तयार करणार

    विधानसभा कामकाज संक्षिप्त वृत्त नागपूर:- धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे झालेली घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील. भटकंतीने व्यवसाय करणाऱ्या समाजाच्या पुनर्वसनासाठी राज्य शासन योजना तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज

    read more

  • ‘महाराष्ट्र माझा २०१८’ छायाचित्र स्पर्धा छायाचित्र पाठवा

    माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम; छायाचित्रांचे भरणार राज्यभर प्रदर्शन मुंबई:- महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्त्वाच्या योजनांवर आधारित ‘महाराष्ट्र माझा 2018’ छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी ही स्पर्धा आज जाहीर केली आहे.

    read more

You cannot copy content of this page