वृत्तवेध

  • राजधानीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दालन ठरतेय आकर्षण

    नवी दिल्ली:- सामाजिक वनीकरण, प्लास्टिक बंदी, इज ऑफ डुईंग बिजनेस, व्याघ्र प्रकल्प, इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा आदि विषयांचे प्रभावी सादरीकरण असणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दालन येथील केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या वतीने आयोजित प्रदर्शनात विशेष आकर्षण ठरत आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रिय पर्यावरण मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनाच्या परिसरात चार दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

    read more

  • मच्छिमार सुरक्षा संदेश- भारतीय तटरक्षक दलाची मोटारसायकल रॅली!

    मुंबई:- मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात घ्यावयाच्या सुरक्षेचा संदेश देण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने आयोजित केलेल्या मुंबई-गोवा-मुंबई मोटारसायकल रॅलीचा शुभारंभ पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. समुद्रतटीय जिल्ह्यांमधील युवक-युवतींनी तटरक्षक दलाच्या भरती प्रक्रियेची माहिती देण्यासह प्रोत्साहित करण्याचे कामही या रॅलीदरम्यान होणार आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या (कोस्ट गार्डस्) वरळी येथील मुख्यालयातून २५ मोटारसायकल

    read more

  • वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध होत नसल्याने ७० टक्के अंधांना दृष्टी नाही!

    वंचित घटकांच्या नेत्रोपचारासाठी स्वस्त, अत्याधुनिक तंत्रज्ञान शोधण्याचे राज्यपालांचे आवाहन मुंबई:- समाजातील आर्थिक, सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांच्या नेत्रोपचारासाठी नेत्रतज्ज्ञांनी सर्वोत्तम, स्वस्त आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान शोधून काढावे. देशातील अंधत्व दूर करण्याचे आव्हान नेत्र तज्ज्ञांनी स्वीकारावे, असे आवाहन राज्यपाल विद्यासागर राव यांनी केले. बाराव्या आंतरराष्ट्रीय ‘अॅडव्हान्सेस इन ऑप्थॅल्मोलॉजी’ काँग्रेसच्या आणि इंटरनॅशनल अॅकॅडमी फॉर अॅडव्हान्सेस इन ऑप्थॅल्मोलॉजीच्या २४ व्या वर्धापन

    read more

  • मुख्यमंत्री फडणवीसांनी केले इलेक्ट्रिक कारचे लोकार्पण

    मुंबई:- पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दराला टक्कर देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक व झूम कार अर्थात चार्जिंग बॅटरीवरील कार गाड्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. गेट वे ऑफ इंडिया येथे झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यावरण व वनमंत्री डॉ.हर्षवर्धन, युनायटेड नेशनमधील पर्यावरणचे कार्यकारी संचालक एरिक सोलहेम, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार

    read more

  • जागतिक बुद्धिस्ट परिषदेचे औरंगाबादेत आयोजन

    नवी दिल्ली:- जगप्रसिद्ध अजिंठा व वेरुळ येथे दिनांक २२ ते २५ ऑगस्ट २०१८ दरम्यान जागतिक बुद्धिस्ट परिषद होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री पर्यटन जयकुमार रावल यांनी आज दिली. परिवहन भवनात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) ए.के. अल्फाँस यांची आज श्री.रावल यांनी भेट घेतली. बैठकीनंतर श्री.रावल यांनी महाराष्ट्रात प्रथमच जागतिक बुद्धिस्ट परिषद होणार असल्याचे सांगितले.

    read more

  • महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचं निधन

    शेतकऱ्यांचा नेता काळाच्या पडद्याआड  मुंबई:- महाराष्ट्राचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर याचं हृदयविकाराच्या झटक्याने आज पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण आज पहाटे हृदयविकाराचा झटका आल्याने फुंडकर यांचं निधन झालं आहे. फुंडकर

    read more

  • राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे छात्रसैनिक हे देशातील तरुणांचे आदर्श – राष्ट्रपती

    राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १३४ व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन दिमाखात पुणे : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे ‘सेवा परमो धर्म’ हे ब्रीद वाक्य आहे. छात्रसैनिकांनी या मंत्राचा कधीही विसर पडू न देता मानवतेच्या रक्षणासाठी सदैव सज्ज राहण्याचे आवाहन करून देशातील तरुणांचे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे छात्रसैनिक हेच आदर्श असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज काढले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या

    read more

  • पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र आणि गुजरातचे संयुक्तरित्या कार्यक्रम होणार

    गुजरातच्या पर्यटन सचिवांनी घेतली पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट दोन्ही राज्यातील पर्यटन विकासाबाबत चर्चा मुंबई : गुजरातच्या पर्यटन विभागाचे प्रधान सचिव एस. जे. हैदर यांनी आज मंत्रालयात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट घेऊन दोन्ही राज्यातील पर्यटन विकासासंदर्भात चर्चा केली. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत यावेळी चर्चा झाली. यावेळी प्रधान सचिव श्री.

    read more

  • राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा ऑनलाईन निकाल उद्या जाहीर होणार

    राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी  बारावीचे परीक्षार्थी! पुणे: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल बुधवारी दुपारी १ वाजता जाहीर होणार असल्याचे मंडळाने कळविले आहे. एसएमएसद्वारे निकाल पाहण्याची सोय करण्यात आली आहे. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी ३१ मे ते ९ जून या कालावधीत अर्ज करता येणार आहे. पुनर्मूल्यांकनासाठी आधी

    read more

  • मौलाना आझाद शिष्यवृत्तीत देशात महाराष्ट्र तिसरा

    नवी दिल्ली:- अल्पसंख्याक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना केंद्र शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या ‘मौलाना आझाद शिष्यवृत्ती’ अंतर्गत गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातील २४९ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळविली असून देशात राज्याचा तिसरा क्रमांक आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने देशातील अल्पसंख्याक समाजाच्या गुणवंत मुला-मुलींसाठी ‘एमफील व पीएचडी’ या संशोधनात्मक अभ्यासक्रमासाठी वर्ष २०१४-१५ ते २०१७-१८ या चार वर्षात ३ हजार २४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान

    read more

You cannot copy content of this page