वृत्तवेध
-
हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी अर्धा कोटी हरित सेनेची फौज सज्ज
हरित सैनिकांच्या नोंदणीने पार केला अर्ध्या कोटीचा टप्पा! मुंबई : हरित महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यात ५० लाख १२ हजार ७६६ हरित सेनेची फौज सज्ज झाली असून यामध्ये वैयक्तिक नोंदणीसह संस्थात्मक नोंदणीचाही समावेश आहे. लोकसहभागातून महाराष्ट्राचे वृक्षाच्छादन वाढावे, वृक्ष आणि वन्यजीव संवर्धनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी १ कोटीची हरित सेना निर्माण करण्याचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
-
महाराष्ट्रात संघटित क्षेत्रात सर्वाधिक रोजगारनिर्मिती!
महाराष्ट्रात संघटित क्षेत्रात सर्वाधिक रोजगारनिर्मिती-अवघ्या सात महिन्यात आठ लाखांवर रोजगार मुंबई:- देशात सप्टेंबर २०१७ ते मार्च २०१८ या ७ महिन्यांच्या कालावधीत एकूण ३९.३६ लाख इतकी रोजगारनिर्मिती संघटित क्षेत्रात झाली असून, या क्षेत्रातील रोजगार निर्मितीत महाराष्ट्राने अव्वल स्थान पटकाविले आहे. ही रोजगारनिर्मिती ८ लाख, १७ हजार, ३०२ इतकी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाहनिधी संघटनेने (ईपीएफओ) या कालावधीसाठीची
-
जाती भेदाच्या भिंती पुसट-सर्वाधिक आंतरजातीय विवाह महाराष्ट्रात
महाराष्ट्रात सन २०१२ ते २०१७ पर्यंत २० हजार ४७५ आंतरजातीय विवाह नवी दिल्ली:- जाती भेदाच्या भिंती पुसट करण्यासाठी आंतरजातीय विवाह हे एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. सन २०१२-१३ ते २०१६-१७ या कालावधीत सर्वाधिक २० हजार ४७५ आंतरजातीय विवाह महाराष्ट्रामध्ये झाले आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचे नवीन आयुष्य सुलभ व सुकर होण्यासाठी आर्थिक सहाय्यता
-
‘पीएमएसबीवाय’अंतर्गत २६ लाख ११ हजार ७८७ विमाधारकांची नोंद
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ४५ हजार ११५ विमाधारक नवी दिल्ली:- देशातील गरीब जनतेला अत्यल्प दरात अपघात विमा देणाऱ्या ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत’ (पीएमएसबीवाय) आतापर्यंत देशातील उद्दिष्टित १६ हजार ८५० खेड्यांमध्ये २६ लाख ११ हजार ७८७ विमाधारकांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रातील उद्दिष्टित १९२ खेड्यांमध्ये ४५ हजार ११५ विमा धारकांची नोंद झाली आहे.
-
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेण्याचे मच्छिमारांना आवाहन
मुंबई:- नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे क्रियाशील मच्छिमारांचा अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास मच्छिमारांच्या वारसदारास मदतीसाठी केंद्र शासन सहाय्यीत ‘प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना’ सुरू करण्यात आली असून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी केले आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय कल्याणकारी योजनांतर्गत भूजलाशयीन तसेच सागरी क्षेत्रातील नोंदणीकृत क्रियाशील मच्छिमारांसाठी ही योजना सुरु केली आहे. समुद्र,
-
`आधार’लिंक मुळे नागपूर शहरात १५ हजार मेट्रीक टन धान्याची बचत
रेशन दुकान `आधार’लिंक मुळे फक्त नागपूर शहरात १५ हजार मेट्रीक टन धान्याची बचत जिल्हाधिकारी कार्यालयात ‘बॅंक मित्र’चे उद्घाटन नागपूर : राज्यात ५५ हजार रास्त दुकानदारांमार्फत ७ कोटी ५ लाख लोकांना रास्त धान्याच्या वितरण करण्यात येते. परंतू वितरण व्यवस्थेमध्ये असलेल्या त्रुटीमुळे आजही अनेक कुटुंब रास्त धान्यापासून वंचित होते. राज्य शासनाने आधार सक्षम सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणाली
-
पाकिस्तानातून १९०८ मेट्रिक टन साखरेची आयात-शासनाचा खुलासा!
नवी दिल्ली:- पाकिस्तानातून साखर आयातीबाबत प्रसार माध्यमातून देण्यात आलेली माहिती चुकीची असून चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानातून केवळ १९०८ मेट्रिक टन साखरेची आयात करण्यात आल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून आज सांगण्यात आले आहे. पाकिस्तानातून केल्या जाणाऱ्या साखर आयातीबाबत काही प्रसारमाध्यमांमध्ये चुकीची माहिती प्रसिद्ध झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून काल यासंदर्भात खुलासा करण्यात आला. पाकिस्तानातून १९०८ मेट्रिक टन
-
शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोगातून यश- सुनील तोटे यांचा ‘ब्रिक्स’ कडून सन्मान
शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबविल्याबद्दल महाराष्ट्रातील सुनील तोटे यांचा ‘ब्रिक्स’ कडून सन्मान नवी दिल्ली:- महाराष्ट्रातील सुनील तोटे यांना शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबविल्याबद्दल आज ब्रिक्सच्या ‘ब्रिक्स अलायन्स-बिझनेस फोरम’ तर्फे सन्मानित करण्यात आले. प्रधानमंत्री कार्यालय राज्यमंत्री जितेंद्र सिंग व ‘ब्रिक्स अलायन्स-बिसनेस फोरम’च्या अध्यक्ष लरीसा झेलेंटसोवा यांच्या हस्ते गौरविण्यात आले. येथील ताज डिप्लोमॅटिक एन्क्लेव मध्ये दिनांक २१ ते २३
-
वंचितांच्या घरांत प्रकाश फुलवणारी पंतप्रधानांची सौभाग्य योजना
अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या तीन मूलभूत गरजा. मात्र आजच्या काळात वीज ही देखील एक मूलभूत गरज बनली आहे. विजेशिवाय विकासाची कल्पना करता येत नाही. मात्र देशाच्या अनेक घरांत आजही वीज पोहोचलेली नाही. विजेपासून वंचित असलेल्या नागरिकांसाठी केंद्र सरकारने सौभाग्य योजना सुरू केली आहे. केवळ शहरच नव्हे तर दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील खेडेपाडे आणि
-
मुंबईसह राज्यातील इतर भागातही बाईक अॅम्ब्युलन्स सुरू होणार
मोटार बाईक अॅम्ब्युलन्स सेवेतील नव्या वीस मोटार बाईकचे लोकार्पण मुंबई:- आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या मोटार बाईक अॅम्ब्युलन्स सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. या सेवेत आज आणखी २० मोटार बाईकचा समावेश करण्यात आला असून, त्याचा लोकार्पण सोहळा परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिक्षण मंत्री विनोद तावडे व सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत
