वृत्तवेध
-
धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठी काळानुरुप सुधारणा आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित पवार
धनगर, मेंढपाळ बांधवांची भटकंती थांबवण्यासाठी काळानुरुप सुधारणा आवश्यक – उपमुख्यमंत्री अजित मुंबई:- धनगर, मेंढपाळ बांधवांची फिरस्ती थांबवून त्यांच्या जीवनात काळानुरुप सुधारणा केली पाहिजे. त्याअनुषंगाने मेंढ्यांच्या पालन-पोषणासाठी चराई क्षेत्रालगतची जमीन अर्धबंदिस्त निवाऱ्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन दिल्यास मेंढपाळ, धनगर बांधवांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकेल. यादृष्टीने पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाने आवश्यक कार्यवाही
-
गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई:- गिरणी कामगारांच्या घरांसाठी प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया तीन महिन्यात पूर्ण करावी. मुंबईत घरे देता यावी याकरिता घरांचा साठा वाढवावा, तसेच ठाणे व राजगोळी, कोन-पनवेल येथील घरांची तातडीने दुरुस्ती करून पाच हजार घरांची लॉटरी प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देतानाच गिरणी कामगारांच्या घरांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावत असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
-
दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 13.2 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी, दि.21 (जि.मा.का.) :- जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 13.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 3.0 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2372.2 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत;- देवगड- 1.8 (1932.0), मालवण- 1.3 (2206.4), सावंतवाडी- 5.5
-
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत ‘माझी माती माझा देश’ उपक्रमाची सांगता!
पुणे:- पुणे महापालिकेच्यावतीने आयोजित ‘माझी माती माझा देश’ अभियानाची सांगता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आली. पालकमंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते हुतात्मा बालवीर शिरीषकुमार विद्यालय येथे शिलाफलकाचे अनावरण व स्वातंत्र्यसैनिक आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार,
-
शिधावाटप पत्रिका कार्यालयातील अंदाधुंदी कारभाराविरोधात आमदार प्रताप सरनाईक आक्रमक!
मुंबई:- सर्वसामान्य कष्टकरी गरीब जनतेसाठी शासन शिधावाटप पत्रिकेद्वारे (रेशनकार्ड) अत्यावश्यक असणारे अन्नधान्य पुरविते. मात्र शिधावाटप नव्याने पत्रिका काढणे, त्यातील नाव कमी- जास्त करणे, पत्ता बदलणे, दुय्यम प्रत काढणे; अशा महत्त्वाच्या कामांसाठी जेव्हा शिधावाटप पत्रिका कार्यालयात सर्वसामान्य नागरिक जातात तेव्हा त्यांना येणारे अनुभव अतिशय संतापजनक असतात. `सरकारी काम सहा महिने थांब!’ असा शासकीय कामाबाबत नेहमी कटू
-
प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रकल्पांना गती द्यावी – गृहनिर्माण मंत्री अतुल सावे
मुंबई:- प्रधानमंत्री आवास योजनेची (शहरी) राज्यात प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थींना तातडीने घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रकल्पांना गती द्यावी, असे निर्देश गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिले. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत राज्यात शासकीय / खासगी भूखंडांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प व मध्यम उत्पन्न गटांसाठी संयुक्त भागिदारी तत्वावर गृहनिर्माण प्रकल्प राबविले जात आहेत. याच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता
-
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 21 ते 25 ऑगस्ट रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी:- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 21 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत दररोज देवगड, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या एसटी डेपोत व गोवा, पुणे, मुंबई या मार्गावर चालणाऱ्या खाजगी प्रवासी बसेसच्या चालकांसाठी झाराप येथे आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांनी कळविले आहे. या आरोग्य शिबीरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी
सिंधुदुर्गनगरी:- आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे: १) तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 37.700 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे २) कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.250 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
सिंधुदुर्गनगरी:- तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 354.142 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.16 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघू पाटबंधारे, मृद व जलसंधारण प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत. कंसातील आकडे प्रकल्पातील पाण्याच्या टक्केवारीचे आहेत: मध्यम पाटबंधारे प्रकल्प:– देवघर- 74.6720 (76.18), अरुणा – 77.8844 (84.63), कोर्ले- सातंडी -25.4740 (100) लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा
-
कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 28.4 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 28.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 15.5 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 2348.5 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत: देवगड- 8.4 (1911.7), मालवण- 11.9 (2189.7), सावंतवाडी- 21.7 (2780.9), वेंगुर्ला- 8.7









