वृत्तवेध
-
डोळे येण्याच्या संसर्गावर वारंवार हात धुण्याच्या सवयीने प्रतिबंध करावा – आरोग्य विभागाचे आवाहन
मुंबई:- राज्यातील अनेक भागात ‘डोळे येणे’ या आजाराच्या रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. डोळे येणे मुख्यत्वे ॲडिनो वायरसमुळे होतो. हा सौम्य प्रकारचा संसर्ग आहे. साधारणपणे या रुग्णामध्ये डोळा लाल होणे, वारंवार पाणी गळणे, डोळ्याला सुज येणे अशी लक्षणे आढळतात. डोळे आलेल्या व्यक्तींनी स्वत:ला घरामध्ये विलगीकरण करणे गरजेचे आहे. आजाराचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला
-
जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी गोवर्गिय जनावरांचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यातील गोवर्गिय जनावरांना लम्पी रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पशुसंवर्धन विभाग युध्दपातळीवर लसीकरण करत आहे. जिल्ह्यात 70 टक्के जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे. ज्या जनावरांचे लसीकरण अद्यापही झालेले नाही त्यांनी तातडीने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या जनावरांना लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व जिल्हा पशुसंवर्धन
-
पोलीस यंत्रणेवर कामाचा ताण; अधिकाऱ्यांची ४ हजारपेक्षा अधिक पदे रिक्त
नागपूर;- राज्य पोलीस दलातील रिक्त पदे, निवृत्त होणाऱ्यांची संख्या व गुन्ह्याच्या नोंदीत वाढ इत्यादी कारणांमुळे पोलीस उपनिरीक्षकापासून पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांपर्यंत शारीरिक तसेच मानसिक तणाव वाढत असून त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. राज्यात सध्या सुमारे ४ ते ५ हजार पोलीस अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून सुद्धा पदभरती बंद आहे, शिवाय पोलीस दलात कार्यरत व पदोन्नतीच्या
-
राज्य शासनाचा टाटा पॉवर कंपनीसोबत १२ हजार ५५० कोटी रुपयांचा सामंजस्य करार
२८०० मेगावॅट ऊर्जा निर्मिती, ऊर्जा क्षेत्रात ६ हजार रोजगार निर्मिती मुंबई:- उदंचन जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी राज्य शासन आणि टाटा पॉवर कंपनी लि. यांच्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १२ हजार ५५० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. या माध्यमातून राज्यात २८०० मेगावॅट ऊर्जा निर्मितीसोबतच ऊर्जा क्षेत्रात ६ हजार इतकी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती
-
कोकणातील पायाभूत विकासाला प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई:- राज्यातील जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य असून त्यामध्ये रस्त्यांची जोडणी ही महत्त्वपूर्ण बाब आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकणाच्या गतिमान विकासासाठी त्या ठिकाणी दळणवळण सुविधांमध्ये वाढ करण्यास आणि पायाभूत सुविधा उभारण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे सांगितले. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील एकूण 12 रेल्वे स्थानकांचे रस्ते काँक्रिटीकरण
-
बालगृहांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने कार्यान्वित करावे – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई:- बालगृहांमधील बालकांच्या सुरक्षेसाठी एका महिन्यात बायोमेट्रिक प्रणाली आणि सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करावेत. बालकांना देण्यात येणाऱ्या अन्न, सुरक्षा आणि स्वच्छतेबाबतचा अहवाल दर तीन महिन्यांनी सादर करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. राज्यातील बालगृहे, विशेष गृहे, खुले निवारा गृह, बालकांसाठी सुरक्षित ठिकाण, अनुरक्षणगृहे याबाबत आज मंत्रालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
-
‘माझी माती, माझा देश’ अभियानास आजपासून सुरुवात
मंत्रालयात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अधिकारी – कर्मचारी घेणार पंचप्रण शपथ मुंबई:- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान बुधवार, दिनांक 09 ऑगस्ट, 2023 पासून झाले. त्या अनुषंगाने सकाळी 10 वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे पंचप्रण शपथ तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ
-
कृषी विभागाच्या भूखंडांवर शेतकरी व ग्राहक उपयोगी उपक्रम राबवणार – कृषीमंत्री
मुंबई:- शेतकऱ्यांना लागणारी खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेला महामंडळाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.
-
‘स्मार्ट’ने नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करावे – कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश
मुंबई:- लहान, सीमांत शेतकरी तसेच कृषी नवउद्योजकांना केंद्रस्थानी ठेवून शेतमालाच्या सर्वसमावेशक आणि स्पर्धात्मक मूल्यसाखळ्यांच्या विकासासाठी मदत करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) ने नियोजनबद्ध कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट)ची आढावा बैठक कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी
सिंधुदुर्गनगरी, दि. 8 (जि.मा.का.) : आज सकाळी 8 वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्वाच्या नद्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे: १) तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.700 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर व धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. २) कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 4.500 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी










