वृत्तवेध
-
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
प्रशासनाने सतर्क राहून युध्दपातळीवर उपाय योजना करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.) : गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तात्काळ प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आलेल्या आहेत. आगामी काळात पावसाचा अंदाज पाहता प्रशासनाने सतर्क राहून युध्दपातळीवर उपाय योजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिले.
-
दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 77.4 मि.मी. पाऊस
सिंधुदुर्गनगरी:- जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 77.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 36.5 मि.मी. पाऊस झाला असून एकूण सरासरी 1918.0 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत: देवगड- 16.8 (1595.2), मालवण- 18.9 (1880.9), सावंतवाडी- 58.3 (2302.7), वेंगुर्ला- 25.4
-
अंमली पदार्थ विरोधी मोहिमेच्या माध्यमातून जनजागृती करावी – उपजिल्हाधिकारी
सिंधुदुर्गनगरी, दि.25 (जि.मा.का.) : अंमली पदार्थ विरोधी मोहिम जिल्ह्यात अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने संबंधित विभागाने विविध माध्यमातून या मोहिमची जनजागृती करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी श्री. मठपती यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को कोऑडीनेशन सेंटर व जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची एकत्रित बैठक आज झाली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, अन्न औषध
-
आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी मांडल्या जनतेच्या समस्या!
मुंबई (मोहन सावंत):- वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी आज रात्री विधानसभेत वर्सोवा मतदार संघातील नागरिकांच्या मुलभूत समस्यांना वाचा फोडली. अतिशय महत्वाचे प्रश्न उपस्थित करून सदर समस्या त्वरित सोडविल्या जाव्यात म्हणून शासनाकडे विनंती केली. आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी ठाकरे सरकारच्या काळात निधी दिला नाही आणि विकासकामांना स्थगिती दिली होती; ह्याबाबत नाराजी व्यक्त
-
सावंतवाडी- वृत्तपत्रविद्या पदविका प्रवेश प्रक्रिया सुरु
सावंतवाडी:- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्रात वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रमाची २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. एक वर्ष मुदतीचा हा अभ्यासक्रम आहे. पत्रकारिता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तसेच माहिती व जनसंपर्क क्षेत्रासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. नोकरी वा शिक्षण पूर्ण करता करता हा अभ्यासक्रम
-
पिकांचे पंचनामे आणि अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई:- बुलढाणा, यवतमाळ आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील पिकांचे तातडीने पंचनामे करुन शासनाकडे लवकर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तसेच यवतमाळ, नांदेडसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल झालेल्या अतिवृष्टीमुळे या भागातील पिके पाण्याखाली गेले आहेत.
-
‘भाजयुमो’चे ‘एक सही भविष्यासाठी’ अभियान
मुंबई (ॲड. सुमित शिंगाणे यांजकडून):- भारतीय जनता युवा मोर्चातर्फे सोमवारपासून मुंबईतील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि युवकांशी संवाद साधणारे ‘एक सही भविष्यासाठी’ हे अभियान सुरू झाले. मोदी सरकारने विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी जे काम केले आहे, ते त्यांच्यासमोर मांडण्यात येणार आहे. नवीन आयआयएम मुंबईला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, पवईला (नीटी) आयआयएमची
-
मुंबई महापालिकेत पालकमंत्री कार्यालय सुरू
मुंबई (ॲड. सुमित शिंगाणे):- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबई महापालिकेत नव्याने सुरू करण्यात आलेल्या पालकमंत्री दालनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की मुंबईतील पालकमंत्री कार्यालय हे जनतेसाठी कार्यरत राहणार आहे. आम्ही महापालिकेच्या कार्यालयात बसून, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही
-
बाल संरक्षण कक्षासाठी केंद्र सरकार कार्यालय उपलब्ध करून देणार!
मुंबई (ॲड. सुमित शिंगाणे):- “जिथे बाल कल्याण समिती यांना कार्यालय नाहीत तसेच बाल संरक्षण कक्ष नाहीत; अशा ठिकाणी केंद्रीय महिला बाल विकास मंत्रालय या कार्यालयांची निर्मिती करेल आणि निधी देखील उपलब्ध करून देईल!” अशी घोषणा केंद्रीय महिला व बाल कल्याण, अल्पसंख्यांक मंत्री स्मृती जुबिन इराणी यांनी केली. षण्मुखानंद ऑडिटोरियम, सायन पूर्व मुंबई येथे राष्ट्रीय बाल
-
तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा
ठाणे, दि. २२ (जिमाका) : ठाणे जिल्ह्यात असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरण परिसरात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे तानसा धरण भरून वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे धरणाखालील व नदीच्या परिसरातील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मीटर टीएसडी इतकी आहे. आज ही पातळी १२६.६०२ मीटर टीएसडी हुन जास्त










