वृत्तवेध
-
तिमिरातुनी तेजाकडे- महाड व रोहा येथे नि:शुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानमाला
मुंबई:- कोकणातील युवक-युवतींनी विविध शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होऊन प्रशासनाच्या अधिकारी पदांवर रुजू व्हावे; ह्या उद्देशाने सुरु झालेल्या `तिमिरातुनी तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळी अंतर्गत `तिमिरातुनी तेजाकडे’ ह्या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, शिक्षण प्रसारक कोकणचे सुपुत्र श्री. सत्यवान यशवंत रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार) विद्यार्थ्यांना महाड व रोहा येथे १४ व १५ मे रोजी
-
भावी काणेकर हिच्या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- सिंधुदुर्ग जिल्ह्याची कन्या भावी काणेकर हिच्या पहिल्या “Within the walls of my mind” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मुंबई येथे व्यंगचित्रकार विवेक मेहेत्रे, डॉ. वैशाली वावीकर यांच्या हस्ते आणि रसिकांच्या उपस्थितीत झाले. यावेळी या काव्यसंग्रहाचे कौतुक करण्यात आले. भावी काणेकर ही मालवण तालुक्यातील तळगाव येथील असून तिच्या या कविता लेखनासाठी आई वडिलांसह शिक्षकांनीही प्रोत्साहन
-
कणकवली रेल्वे स्टेशनवर समस्या दूर करून प्रवाशांची गैरसोय थांबवा!
रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट पूर्वीच्या जागीच लावा! सरकता जीना त्वरित सुरु करा! रेल्वे स्थानक हद्दीतील खड्डेमय रस्ता पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करा! ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांची रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी कणकवली: – येथील रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रवाश्यांच्या सोईसाठी रेल्वेची स्थिती दाखविणारा फलक व रिझर्वेशन चार्ट फलाट क्रमांक १
-
अमेय चषकच्या रोप नवोदित स्पर्धेत कु. गिरीजा पराग परब हिचा द्वितीय क्रमांक
मुंबई:- यशवंत नगर, विरार आयोजित अमेय चषकच्या रोप नवोदित स्पर्धेत कु. गिरीजा पराग परब हिला द्वितीय क्रमांक तर सांताक्रूझ येथे साने गुरुजी आरोग्य मंदिर आयोजित स्पर्धेमध्ये ४०० स्पर्धाकांमध्ये तृतीय क्रमांक मिळाला असून तिचे सर्व थरातून कौतुक होत आहे. अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. वरळी येथील शारदा कॉम्पुटर इन्स्टिट्यूटचे मालक श्री.
-
सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होतील! – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
मुंबई, दि. २ :- सेंद्रिय शेती जमिनीच्या आरोग्यासाठी चांगली आहे तसेच सेंद्रिय शेतीतील उत्पादने मनुष्याच्या आरोग्यासाठी चांगली आहेत. सेंद्रिय शेतीच्या उत्पादनांमुळे शेतकरी बांधव समृद्ध होतील त्यामुळे सेंद्रिय उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचे काम इस्कॉनच्या ‘हरी बोल’ उपक्रमाच्या माध्यमातून केले जावे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी जुहू येथील
-
संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाच्या नूतनीकरण कामाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी
मुंबई, दि. १- संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नूतनीकरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. त्यानुसार झालेल्या कामांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. आज पाहणी केल्यानंतर या प्रदर्शनाबाबत सर्वसामान्यांना तसेच विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यादृष्टीने येथे लेझर शोच्या माध्यमातून माहिती दिली जावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुंबई शहर जिल्ह्याचे
-
सिंधुदुर्गातील आठ वर्षाच्या वरील रिक्षांवरती परमिट चढविण्याची मागणी!
तळेरे (संजय खानविलकर):- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक मालक संघटना यांच्यावतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सिंधुदुर्ग यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ वर्षाच्या वरील रिक्षांवरती परमिट चढविण्याच्या मागणीबाबत निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले. याप्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.काळे यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत काही सकारात्मक निर्णय घेण्यात आले. फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये (मुंबई वगळून) अन्य
-
सिंधूदुर्ग आकाशवाणी केंद्रावर आज निकेत पावसकर यांची मुलाखत
तळेरे, दि. १:- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांची १ मे ला सायंकाळी ५.३० वा. सिंधुदुर्ग आकाशवाणी केंद्रावर मुलाखत प्रसारित होणार आहे. त्यांनी जोपासलेल्या अनोख्या सन्ग्रहाचा प्रवास यावेळी ते मांडणार आहेत. निकेत पावसकर यांनी गेल्या १६ वर्षांपासून जोपासलेल्या अनोख्या संग्रहाची दखल विविध संस्थानी घेतलेली आहेच. तर त्यांच्या संदेश पत्रांचे प्रदर्शने मुंबई,
-
सिंधुदुर्गातील दोडामार्ग कळणेचा राक्षसरूपी मायनिंग पुन्हा सुरु, जिल्हा प्रशासनाच्या स्थगितीच्या आदेशाला केराची टोपली!
सिंधुदुर्ग (कोकणचा तडाखा न्यूज – आबा खवणेकर):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यातील दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिंगमधील उत्खनन पुन्हा सुरु झालं आहे. ८ महिन्यांपूर्वी २९ जुलै रोजी कळणे मायनिंगमधील साठवणूक केलेल्या पाण्याचा बांध फुटून कळणे गावात मोठे नुकसान झालं होतं. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देत नाही, तोपर्यंत उत्खनन बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. परंतु जिल्हा प्रशासनाच्या स्थगितीच्या आदेशाला केराची
-
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाचा पहिला पुरस्कार मिळाला हे माझे भाग्यच – प्रधानमंत्री नरेंद मोदी
लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सन्मानित मुंबई:- लता दिनानाथ मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार जेव्हा लता दीदी सारख्या मोठ्या बहिणीच्या नावाने मिळत असेल तर हा पुरस्कार माझ्यासाठी आपलेपण आणि स्नेहाचे प्रतीक आहे. लता दीदीच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार मी लता दीदी आपल्या सर्व देशबांधवांची असल्याने त्यांना समर्पित करतो असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
