वृत्तवेध
-
अथर्व घाटकर मुंबई महापौर किक-बाॅक्सिंग सुवर्णपदक विजेता!
मुंबई (मोहन सावंत):- दादरमधील शिवनेरी इमारतीतील अनेकांनी आपापल्या क्षेत्रात उतुंग भरारी घेऊन यशस्वी कामगिरीने अनेक आदर्श निर्माण केले. मुंबई महापौर किक-बाॅक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक विजेते पदावर शिवनेरीतील अथर्व घाटकर यांनी आपले नाव कोरले. अशाप्रकारे क्रिडा क्षेत्रात जबरदस्त ठसा उमटवणारा आणखी एक नवीन तारा शिवनेरीमध्ये उदयास आला आहे. बृहन्मुंबई महानगर पालिका व मुंबई किक-बाॅक्सिंग असोसिएशनने १९ मार्च
-
दिवंगत आमदार विठ्ठल (भाई) चव्हाण यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांच्या तत्व विचारांनी प्रेरित झालेला, भारावून गेलेला एक तरुण शिवसेना परळ शाखेच्या कार्यात रुजू झाला आणि अल्पावधीतच एक धडपडणारा, मेहनती कार्यकर्ता म्हणून नावारूपाला आला. आपले सहकारी, कार्यकर्ते यांचा विश्वास जिंकून सर्वांचा लाडका ‘ विठ्ठल `भाई’ झाला. कार्यसम्राट आमदार म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली ते दिवंगत आमदार विठ्ठल (भाई) चव्हाण यांच्या
-
मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि अवैधरित्या गर्भनिदान चाचणी विरोधात शासन कोणती कारवाई करते?
मुलींचे प्रमाण वाढविण्यासाठी आणि अवैधरित्या गर्भनिदान चाचणी विरोधात शासन कोणती कारवाई करते? -आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांचा विधानसभेत प्रश्न मुंबई (मोहन सावंत):- राज्यातील ज्वलंत आणि सामान्यांच्या समस्यांवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करून शासनाने लक्ष वेधून घेणाऱ्या अभ्यासू आमदार डॉ. भारतीताई लव्हेकर यांनी आज एका गंभीर सामाजिक विषयावर प्रश्न विचारला. महाराष्ट्र्रात मुलींचे प्रमाण कमी असून त्याबाबत शासन
-
राज्यपालांच्या हस्ते ९७ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदके प्रदान
मुंबई:- पोलीस दलातील उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील ९७ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २०२० या वर्षात जाहीर झालेली राष्ट्रपती पोलीस पदके तसेच गुणवत्तापूर्ण सेवा पदके राजभवन येथे सोमवारी (दि. २१ मार्च) समारंभपूर्वक प्रदान करण्यात आली. दहा पोलीस अधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेबद्दल पोलीस शौर्य पदके प्रदान करण्यात आली तर
-
बेळगाव प्रश्न हा विषय केवळ चर्चेचा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न! -उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई:- महाराष्ट्र-कर्नाटक सीमा व बेळगाव प्रश्न हा विषय केवळ चर्चेचा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे. याला मोठी दीर्घकालाची परंपरा लाभलेली आहे. या प्रश्नावर सभागृहाच्या भावना लक्षात घेता. हा मुद्दा वेगाने पुढे न्यावा लागणार आहे. तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत न्यायप्रविष्ठ विषयाचा पाठपुरावा सुरु आहे, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न
-
समाजकारण आणि राजकारण एकमेकांस पूरक! -उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. २१ : राजकारण आणि समाजकारण एकमेकांस पूरक विषय आहेत. एकनिष्ठ राहून कठोर परिश्रम घेतल्यास यश आणि केलेल्या कामाचे समाधान मिळते, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनी सांगितले. डॉ.गोऱ्हे यांच्या शासकीय निवासस्थानी राजकीय विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी देशातील विविध भागातील इंडियन स्कूल आँफ डेमोक्राँसी या संस्थेत शिकणारे विद्यार्थी
-
श्रीमाऊली `देवि’चा दास गेला देवीच्या सेवेशी हजर!
आज सकाळी देविदास राजाराम परब यांचे ६२ व्या वर्षी दिवंगत झाले. अतिशय दुःखद बातमी! त्यांच्या बाबतीत बोलणे आणि लिहिणे खरोखरच सहजसोपे नाही. आज सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता; पण अचानक काळाने घाला घातला आणि देविदास परबांचं पार्थिव घरी आणावं लागलं. अशा व्यक्ती जेव्हा अशा अचानक सोडून जातात तेव्हा शब्द निःशब्द होतात आणि नयनातून आपोआप अश्रू
-
ज्येष्ठ साहित्यिक, कलावंतांनी मानधनासाठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. १७ : – मुंबई शहर व उपनगरातील ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी सन २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षांकरिता मानधन मंजूर करण्यासाठी ३१ मार्च २०२२ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. शासनामार्फत राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांसाठी मानधन योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत समितीने मानधन मंजूर झालेल्या अ-श्रेणीतील कलावंतांना
-
महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०२६ अंतर्गत २००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई:- राज्य शासनाने 5 वर्षे मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे 6.24 टक्के महाराष्ट्र सरकारचे विकास कर्ज, 2026 चे रोखे अटी आणि शर्तींच्या अधीन राहून विक्रीस काढले आहे. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल. रोख्यांची विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या तसेच राज्य शासनाच्या सुधारित सर्वसाधारण
-
शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन जलसंपदाची कामे वेळेत पूर्ण करावी! -पालकमंत्री छगन भुजबळ
जलसंपदा विभागातील विविध विषयांवर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न नाशिक:- (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात जलसंपदा विभागांतर्गत दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालवा भूसंपादन तसेच नाशिक पाटबंधारे विभागाकडील नाले दुरुस्ती, पूररेषा नियंत्रण, ओझरखेड कालवा चारी दुरूस्ती, विस्तारीकरण व पुल बांधणी, पालखेड डावा कालव्यावर एस्केप गेट बसविणे इत्यादी कामे शेतकऱ्यांना प्राधान्य देवून वेळेत पूर्ण करावीत. तसेच ज्या कामांसाठी शासकीय

