वृत्तवेध
-
संपादकीय- कोकण सर्वांगिण विकसित करण्यासाठी प्रयास करणारा नेता हरपला!
प्राध्यापक महेंद्र नाटेकर यांच्या निधनाची बातमी मनाला वेदनादायी होती; कारण खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान आणि सर्वांगिण विकसित कोकणचे स्वप्न पाहणारा नेता म्हणून त्यांनी त्यासाठी केलेले प्रयास आम्ही अगदी जवळून पाहिले. त्यांच्यासारखा अभ्यासू नेता जेव्हा जातो तेव्हा अतीव दुःख होते. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजात जन्माला आलेले नाटेकर सर यांनी समाजासह बहुजन समाजाच्या आणि कोकणच्या विकासासाठी जीवनभर राखलेला समर्पित
-
गांधी विचार कृतीत आणणाऱ्या जेष्ठ आदर्शाला सलाम!
ज्येष्ठ गांधीवादी- सर्वोदयी कार्यकर्ते जयवंत मटकर यांचे पुण्यात निधन! गोपुरी आश्रमाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते, महात्मा गांधी प्रस्थापित वर्धा आश्रमाचे माजी अध्यक्ष, सर्वोदयी परिवाराचा आधारवड जयवंत मटकर यांचे मंगळवार दिनांक- १४, मार्च, २०२२ रोजी सायंकाळी ८.४५ वाजता पुणे येथे वयाच्या ८१ व्या वर्षी दुःखद निधन झाले. जयवंत मटकर यांनी ऐन तारुण्यात गांधी विचारांच्या चळवळीत
-
फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र लोके यांचा ३० वर्षाच्या सेवेसाठी टाटा मेमोरियल रुग्णालयातर्फे सन्मान!
मुंबई:- फिनिक्स फाऊंडेशन ह्या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सन्मानिय जितेंद्र लोके यांनी कर्करोगावर उपचार करणाऱ्या जागतिक किर्तीच्या टाटा मेमोरियल रुग्णालयात ३० वर्षे सेवा दिल्याबद्दल त्यांचा टाटा रुग्णालयात ८१ व्या `हॉस्पिटल डे’ कार्यक्रमात स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानिय जितेंद्र लोके यांना मिळालेल्या सन्मानाने त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले
-
महिला दिनानिमित्त नांदोस गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षा सौ. संजना गावडे यांचा सत्कार!
मालवण- महिला दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने मालवण तालुक्यातील नांदोस गाव येथील गावच्या तंटामुक्ती अध्यक्षा सौ. संजना सचिन गावडे यांचा सत्कार करण्यात आला. सौ. संजना सचिन गावडे नांदोस ग्रामसचिवालयलात सचिव म्हणून काम पाहतात; त्याचप्रमाणे त्या पंचक्रोशीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित आहेत. त्याचप्रमाणे महिलांच्या न्याय हक्कासाठी प्रयत्न करीत असतात, तसेच ह्युमन राईट असोसिएशन
-
ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने श्रीमती जयश्री परब सन्मानित
कणकवली- महिला दिनानिमित्ताने ह्युमन राईटस असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने कणकवली – परबवाडी येथील आजीबाईचा बटवा जपण्याचे कार्य निःस्वार्थीपणे अनेक वर्षे करणाऱ्या श्रीमती जयश्री परब यांना सन्मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले. श्रीमती जयश्री परब यांनी परंपरागत औषधांच्या माध्यमातून अनेक रुग्णांवर उपचार करून लोकोपकारी कार्य केले. अनेक बालकांना, महिलांना अचानक उद्भवणाऱ्या आणि गंभीर आजारातून बरे केले. आजीबाईचा बटवा
-
बेनी बुद्रुक येथे पेजे महाविद्यालयामार्फत रस्ता दुरुस्ती आणि वनभोजनाचा कार्यक्रम संपन्न
रत्नागिरी:- लोकनेते शामरावजी पेजे वरिष्ठ महाविद्यालय, शिवार आंबेरे, रत्नागिरीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक येथील माळवाडी ते मळेवाडी रस्ता दुरुस्तीचे काम नुकतेच करण्यात आले. सदर कामाचे उदघाटन सकाळी शिवार आंबेरे येथील श्रमिक किसान सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय नंदकुमारजी मोहिते यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी ग्रामपंचायत बेनी बुद्रुकचे सरपंच संतोष धामणे, जेष्ठ
-
आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या शुभहस्ते गणेश मैदानाचे उदघाटन
मुंबई (मोहन सावंत):- अंधेरी (प.) येथील लोखंडवालामधील अपनाघर को-ऑप. हौसिंग सोसायटी असोसिएशनच्या गणेश मैदानाचे उदघाटन भारतीय जनता पार्टी-शिव संग्राम पक्षाच्या वर्सोवा विधानसभेच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्या शुभहस्ते नुकतेच झाले. त्याप्रसंगी नगरसेवक योगीराज दाभाडकर, नगरसेवक रंजना पाटील, प्रख्यात अभिनेत्री आणि थोर गायिका सलमा आघा, विनोदी अभिनेता सुनील पाल, भाजपचे मंडळ अध्यक्ष पंकज भावे, वार्ड ६०
-
कल्पकतेने नाविन्यपूर्ण कामे करून मुंबई सुंदर बनविणार! – पालकमंत्री आदित्य ठाकरे
कलानगर जंक्शन येथील सुधारणा व सौंदर्यीकरणाच्या कामाचा शुभारंभ मुंबई:- मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत होती. आता एमएमआरडीए, महानगरपालिका यांसह सर्व संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून वाहतूक जंक्शनच्या जागेचा कल्पकतेने उपयोग करून वाहतूक सुरळीत केली जात आहे. याचबरोबर नागरिकांसाठीही सुविधा निर्माण केल्या जात आहेत. कलानगर प्रमाणेच मुंबईत सर्वत्र अशा सुविधा निर्माण करून मुंबई सुंदर बनविली जाईल,
-
देश असो की विदेश प्रत्येक घरात सावित्रीसह एका ज्योतिबाची गरज! – महिला व बाल विकास मंत्री
हाऊस ऑफ कॉमन्सच्या युकेमधील आंतरराष्ट्रीय परिषदेत अॅड. यशोमती ठाकूर यांचा सहभाग मुंबई:- “सावित्री घरोघरी आणि ज्योतिबाचा शोध जारी” ही वस्तुस्थिती एकंदर संपूर्ण जगभरातच दिसून येत आहे, त्यामुळे देश असो की विदेश महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम होण्यासाठी प्रत्येक घरात सावित्रीसह एका ज्योतिबाची तितकीच गरज असल्याचे परखड मत राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर
-
श्रीसाईधाम देवालयात मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री साजरी!
मुंबई (मोहन सावंत):- जोगेश्वरी पश्चिम येथील पाटलीपुत्र नगर मधील कॉस्मोपॉलिटन को-ऑप. सोसायटी असोशिएशनच्या आवारातील श्री साईधाम देवालयात महाशिवरात्र मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने अनेक आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सर्व रहिवाशांनी सहभाग घेऊन साईंच्या दर्शनाचा लाभ घेतला. विशेष म्हणजे महाशिवरात्री निमित्ताने जयश्रीताई चंपानेरकर यांनी श्री शिवपुराणाचे पाच वेळा पठण करून त्याची
