वृत्तवेध
-
लंडन, सिसिली, सिंगापूर पर्यटनस्थळांच्या पंगतीत सिंधुदुर्ग
कोंड नेस्ट ट्रॅव्हलरने जाहीर केली जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटनस्थळांची यादी सिंधुदुर्गनगरी दि. २३ ( जि.मा.का) : कोंड नेस्ट ट्रॅव्हलर या मॅगझिनने यंदाच्या वर्षी भेट देण्यासाठी जगातील ३० सर्वात सुंदर पर्यटन स्थळांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये लंडन, सिसिली, सिंगापूर यासह इस्तंबूल, इजिप्त, माल्टा, सर्बिया, केपवर्दे अशा आंतरराष्ट्रीय तसेच सिक्कीम, मेघालय, ओरिसा, राजस्थान, गोवा, कोलकाता,
-
दहावीच्या विद्यार्थ्यांना केवळ इंटरमिजिएटच्या आधारे मिळणार सवलतीचे गुण
मुंबई, दि. 22 :- विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता सन २०२१-२२ या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या श्रेणीच्या आधारे सवलतीचे गुण देण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. सन २०२१-२२ या वर्षी इयत्ता दहावीच्या परीक्षेला बसणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना सन २०२०-२१ या वर्षी
-
महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला पल्स पोलिओ मोहिम- १ कोटी १५ लाख बालकांना डोस देणार!
मुंबई दि. 22 : राज्यातील सर्व जिल्ह्यात येत्या रविवारी, 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी केले. यंदाच्या वर्षीच्या मोहिमेत एक कोटी पंधरा लाख मुलांना पल्स पोलिओचा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी
-
एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा २६ फेब्रुवारीला कणकवली उपकेंद्रावर होणार!
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि.22: महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा – 2021 ही शनिवार दि. 26 फेब्रुवारी 2022 रोजी होत आहे. कणकवली तालुक्यातली विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली, कणकवली कॉलेज, कणकवली आणि एस.एम.हायस्कूल कणकवली, या उपकेंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षेची वेळ सकाळी 11 ते दुपरी
-
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज भरण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी, दि. 22 (जि.मा.का) : सन 2021-22 करिता भारत सरकार शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टलवर नवीन अर्ज नोंदणी व जन्या अर्जांच्या नुतनीकरणासाठी दि. 28 फेब्रुवारी 2022 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही प्रक्रिया शासनाच्या आपले सरकार पोर्टलवरील https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सुरू असल्याचे दीपक घाटे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालये
-
राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून ७०१ खटले निकाली
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत मोफत विधी सेवा सिंधुदुर्गनगरी दि. 22 ( जि.मा.का) : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फकत अनुसूचित जाती किंवा जमातीतील व्यक्ती, स्त्रीया किंवा बालके, अपंग व्यक्ती, किंवा वार्षिक 3 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना मोफत विधी सेवा व सल्ला तसेच प्रकरण दाखल करण्यासाठी विधिज्ञ (वकिल ) नेमले जातात. तसेच राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून
-
उद्या सिंधुदुर्गातील ५ हजार ९४१ सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी होणार
सिंधुदुर्गनगरी दि. 22 ( जि.मा.का) : जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण उपक्रमांतर्गत क्षेत्रीय तपासणी संच ( फिल्ड टेस्ट किट) च्या माध्यमातून उद्या दि. 23 फेब्रुवारी 2022 रोजी एकाची दिवशी अभियान स्वरुपात जिल्ह्यतील एकूण 431 ग्रामपंचायतीमधील 741 महसुली गावातील 5 हजार 941 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करण्यात येणार असल्याचे पाणी व
-
पंतप्रधान मोदीजी आता हिम्मत दाखवा! -शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांचे रोखठोक ट्विट
मुंबई (मोहन सावंत):- “भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी रस्त्याची तुलना त्यांच्याच पक्षाच्या सन्माननिय खासदार हेमा मालिनी यांच्याशी केली. मा नरेंद्रजी मोदी यांनी या मंत्र्यांवर कारवाईची हिम्मत दाखवावी!” असे ट्विट शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. मनिषा कायंदे यांनी काल रात्री केले आहे. भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी रस्त्याची तुलना त्यांच्याच पक्षाच्या सन्माननीय खासदार हेमा मालिनी
-
९२ कामगारांच्या व असंख्य प्रवाशांच्या आहुती नंतर एसटी विलीनीकरणाचा लढा अंतिम टप्प्यात
कणकवली (संतोष नाईक):- २२ फेब्रुवारीला विलिनीकरणाच्या निर्णयाची राज्यातील बारा कोटी जनता वाट पाहत आहे. २२ तारखेला उच्च न्यायालयातील सुनावणीच्या प्रतिक्षेत महाराष्ट्रातील एसटीचे एक लाख कर्मचारी आहेत. विलिनीकरण होणारच हा विश्वास सर्वांनाच आहे, अशी भावना आझाद हिंद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अॕड. सतीशचंद्र रोठेपाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केल्या आहेत. याची माहिती संघटनेचे कोकण प्रदेश अध्यक्ष भाई
-
गिरणी कामगारांच्या घरासंबधीच्या अडचणी सोडवू! – केंद्रीय मंत्री रामदास आठवले
मुंबई (भाई चव्हाण यांजकडून) “केंद्राच्या स्वच्छ भारत या संकल्पनेनुसार झोपडपट्टी मुक्त मुंबई या योजनेतून गिरणी कामगारांना शिवडी-मुंबई येथे सात हजार घरे माफक किमंतीत देण्याची योजना लक्षणीय आहे. ही योजना पुर्णत्वास आणण्यामध्ये येणारे अडचणी दूर करण्यासाठी राज्य आणि केंद्रीय पातळीवर सोडविण्यासाठी प्रयत्न करु!” असे आश्वासन केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी दिले. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील
