वृत्तवेध
-
दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सरावासाठी प्रश्नपेढी
विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांचे आवाहन मुंबई, दि. ४:- कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. तथापि, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरू ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ष हे महत्त्वाचे वर्ष असल्याने राज्य मंडळाच्या इ. दहावी व इ. बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रश्न
-
यंत्रमागधारकांच्या समस्यांच्या अभ्यासासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठीत
मुंबई, दि.४:- राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करुन त्यावर उपाययोजना सूचविण्यासाठी वस्त्रोद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती भिवंडी, मालेगाव, धुळे, सोलापूर, इचलकरंजी आदी यंत्रमागबहुल भागांची प्रत्यक्ष पाहणी करून महिनाभरात शासनास अहवाल सादर करेल, अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी दिली. वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली काही दिवसांपूर्वी भिवंडी येथे झालेल्या
-
सर जे. जे. कला महाविद्यालय परिसरात शिल्पकलेचे जतन करावे
मुंबई, दि. ४:- विद्यार्थ्यांनी बनवलेल्या शिल्पाचा योग्य वापर करून त्या शिल्पकलेचे जतन करावे, असे निर्देश देत सर जे. जे. कला महाविद्यालय परिसराची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पाहणी केली. यावेळी सर जे. जे. कला महाविद्यालयाचे संचालक राजीव मिश्रा, अधिष्ठाता संतोष क्षीरसागर, विश्वनाथ साबळे, कला व शिल्प निरीक्षक संदीप डोंगरे, उच्च व तंत्र
-
महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती”
https://www.youtube.com/watch?v=6Zq5plxAaEI नवी दिल्ली:- ‘जैवविविधता व राज्य मानके’ या विषयावरील महाराष्ट्राच्या चित्ररथास “लोकपसंती” या वर्गवारीत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी झाला होता. यावर्षीपासून राजपथावरील पथसंचलनात सामील झालेल्या राज्यांच्या चित्ररथाला आणि लष्करी मार्चिंग तुकडीला ऑनलाईन नोंदणीव्दारे मत देऊन जिंकविता येईल, असे संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. त्याप्रमाणे प्रजासत्ताक
-
नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी केलेल्या विकास कामांचा पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा
ओशिवरा अब्दुल कलाम आझाद उद्यान, बृहन्मुंबई पालिका क्रीडांगण तसेच प्रतिक्षा नगर येथील मुंबई पब्लिक स्कूल (सी.बी.एस.ई.बोर्ड) इत्यादी विकास कामांचा लोकार्पण सोहळा मुंबई (मोहन सावंत):- जोगेश्वरी येथील ओशिवरा अबुल कलाम आझाद उद्यान, बृहन्मुंबई पालिका क्रीडांगण तसेच प्रतिक्षा नगर येथील मुंबई पब्लिक स्कूल (सी.बी.एस.ई.बोर्ड) इत्यादी विकास कामांचा लोकार्पण सोहळा पर्यटनमंत्री, पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्यजी ठाकरे
-
ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवलीच्या अध्यक्षपदी हनिफभाई पिरखान
कणकवली:- ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेची कणकवली तालुका नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी हनिफभाई पिरखान यांची तर सचिव म्हणून मनोजकुमार वारे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन कणकवली तालुका नूतन कार्यकारिणीची निवड राष्ट्रीय अध्यक्ष एम.डी.चौधरी व महाराष्ट्र राज्य निरीक्षक घनश्याम सांडीम यांच्या मार्गदर्शनानुसार सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष नाईक
-
`निसर्ग माझा सखा सोबती’ मुक्त कविता लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर!
मुंबई:- भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई या संशोधन प्रशिक्षण संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय मराठी भाषा `निसर्ग माझा सखा सोबती’ मुक्त कविता लेखन स्पर्धेचे ( जानेवारी २०२२ मध्ये) नुकतेच आयोजन केले होते. ऑननलाइन स्वरुपात झालेल्या या काव्यलेखन स्पर्धेत ७५ पेक्षा जास्त कवींनी सहभाग नोंदवला. महाराष्ट्राबाहेर गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक, गोवा राज्यातील मराठी भाषिक कवींचा सुद्धा या स्पर्धेत
-
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती २०२१-२२ साठी महाडीबीटीवर अर्ज करण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत
मुंबई:- अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकारच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज करणे व जुन्या अर्जाचे नूतनीकरण करणे यासाठी 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदत देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षण फी,
-
महिला व बाल सशक्तीकरण योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कायमस्वरूपी तीन टक्के निधी!
मुंबई:- राज्यातील महिला व बालकांच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बाल सशक्तीकरण या सर्वसमावेशक योजनेकरिता (Umbrella Scheme) जिल्हा नियोजन समितीस नियोजन विभागाकडून मिळणाऱ्या एकूण निधीच्या किमान 3% इतका निधी कायमस्वरुपी महिला व बालविकास विभागाला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड.
-
सामाजिक जाण असलेला नेता समाजाने गमावला!
शिवसेनेचे उपविभागप्रमुख शरद गावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आज अतिशय दुःखद बातमी आली. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज बांधव आणि शिवसेनेचे उपविभागप्रमुख शरद सहदेव गावकर यांचे दुःखद निधन झाले. सामाजिक बांधिलकी स्वीकारून जेव्हा प्रामाणिकपणे कार्य केले जाते तेव्हा समाजात आदर्श उभा राहतो आणि तो आदर्श चिरंतर दिपस्तंभाप्रमाणे अनेकांना प्रेरणा देत राहतो. असे सामाजिक आणि राजकीय कार्य शरद गावकर
