वृत्तवेध
-
अकोला येथे ३७८ पोलीस सदनिकांचे तसेच पारपत्र कार्यालयाचेही उद्घाटन
अकोला,दि.२५:- अकोला येथील निमवाडी येथे बांधण्यात आलेल्या ३७८ सदनिकांचे (४२ अधिकाऱ्यांसाठी व ३३६ कर्मचाऱ्यांसाठी) सदनिकांचे तसेच पारपत्र कार्यालयाचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. चांगले सुखकारक, पुरेशी जागा असणारे घरे उपलब्ध असणे हे पोलिसांची कामगिरी उंचावण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना चांगल्या दर्जाची घरे उपलब्ध करुन देणे हे
-
मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारात योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव
मुंबई, दि. २० :- मराठी भाषेच्या संवर्धनाबरोबरच भाषेचा प्रचार आणि प्रसार करुन भाषा संस्कृती संवर्धनासाठी योगदान देणारे शासकीय सेवेतील मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे मराठी भाषा विभागातर्फे कौतुक करण्यात आले. मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या हस्ते पुस्तक आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले. यावेळी मराठी भाषा विभागाचे सहसचिव मिलींद
-
दादासाहेब फाळके चित्रनगरीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आराखडा तयार करावा
मुंबई, दि. २० :- गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत मराठीबरोबरच विविध भाषांतील सिनेमा, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, माहितीपट यांचे चित्रीकरण सुरु असते. येणाऱ्या काळात चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा आराखडा दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत तयार करण्यात यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले. आज दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे महाराष्ट्र चित्रपट,
-
सागरी जैवविविधता जपणुकीत कांदळवन प्रतिष्ठानचे काम कौतुकास्पद
सागरी जैवविविधतेच्या संरक्षणात स्थानिक मच्छिमारांचा मोठा सहभाग ! जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले, ग्रीन सी कासव यासारख्या २६० संरक्षित प्रजाती पुन्हा समुद्रात मुंबई, दि. २०:- सागरी जैवविविधतेचे रक्षण करताना ऑलिव्ह रिडले कासव, बहिरीमासा, लांजा मासा, ग्रीन कासव अशा एकूण २६० संरक्षित सागरी प्रजाती ज्या मासेमारी करताना मच्छिमारांच्या जाळ्यात अडकल्या होत्या त्यांना मच्छिमारांनी सुखरूपपणे समुद्रात सोडले आहे.
-
धुळे येथील म्हाडाने केलेल्या भूसंपादनासंदर्भात विधी व न्याय विभागाने तत्काळ अधिसूचना काढावी
मुंबई, दि. २०:- धुळे येथे म्हाडाने केलेल्या भूसंपादनासंदर्भात विधी व न्याय विभागाने अधिसूचनेबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले. विधानभवनातील उपसभापती यांच्या दालनात धुळे येथील म्हाडाने केलेल्या भूसंपादनाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपसभापती डॉ.गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी या बैठकीला विधी व न्याय विभागाचे सचिव सतीश वाघोले, गृहनिर्माणचे उपसचिव
-
सिंधुदुर्गात आजअखेर ५२ हजार ५५४ रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या १ हजार ३७०
सिंधुदुर्गनगरी, दि. २० (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५२ हजार ५५४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ३७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २२१ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 20/01/2022 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1
-
रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्याची ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची मागणी
मालवण:- मालवण कसाल रस्ता तसेच कुंभारमाट जरीमरी उतार रस्ता आणि फोवकांडा पिंपळ ते मेढा राजकोटपर्यत रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे; अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, मालवण तालुका कार्याध्यक्ष सुभाष प्रभुखानोलकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे उपअभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. मालवण
-
कोविड महामारीच्या काळातील थकित वीजबिलात सवलत देण्याची मागणी
ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे निवेदन मालवण:- कोव्हीड १९ च्या काळात थकित राहिलेल्या मालवण तालुक्यातील वीज ग्राहकांना वीजबिलात सवलत देण्यात यावी; अशी आग्रही मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन संघटनेचे मालवण तालुकाध्यक्ष सुधीर धुरी, मालवण तालुका कार्याध्यक्ष सुभाष प्रभुखानोलकर, जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर यांनी म. रा. विद्युत वितरण कं. उपविभाग मालवणचे उपअभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे
-
श्रमिक किसान सेवा समितीचे उपाध्यक्ष जनार्दनजी सुर्वे यांना श्रद्धांजली!
रत्नागिरी- तालुक्यातील शिवार आंबेरे येथे श्रमिक किसान सेवा समिती संचालित श्रमिक विद्यालय, सावित्रीमाई फुले इंग्लिश मिडियम स्कूल व लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य व विज्ञान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रमिक किसान सेवा समितीचे उपाध्यक्ष जनार्दनजी सुर्वे साहेब ऊर्फ जनुभाऊ सुर्वे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमात बोलताना विद्यार्थी प्रतिनिधी कु. प्रतीक्षा घाटकर हिने
-
कोकण सुपुत्र प्रणय शेट्येला बॉलिवूडची संधी
‘कोकण कोकण’ या गीताचा गीत-संगीतकार प्रणय शेट्येला हिंदी चित्रपटासाठी संधी मराठी सिनेसृष्टीतील दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव सिंधुदुर्ग (निकेत पावसकर यांजकडून):- अलीकडेच कोकणवासियांसह मुंबईकर चाकरमान्यांच्या ओठांवर रुळलेल्या `कोकण कोकण’ या गाण्याचा गीत-संगीतकार प्रणय शेट्येचे नाव हिंदी सिनेसृष्टीत दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण आगामी एका हिंदी सिनेमाच्या प्रकल्पासाठी त्याला विचारणा झाल्याची खात्रीलायक बातमी मिळते आहे. त्यामुळे कोकणातील आणखी

