वृत्तवेध
-
शिक्षणतज्ञ श्री. सत्यवान रेडकर यांच्यामार्फत अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधुकन्या हिमानी परब यांचा सत्कार
मुंबई:- दादर येथे “तिमिरातुनी तेजाकडे” या शैक्षणिक तसेच सामाजिक चळवळीचे प्रणेते श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्यामार्फत अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधुकन्या कुमारी हिमानी परब यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. साधी राहणी, उच्च विचार व सात शैक्षणिक अर्हता असलेले उच्च विद्या विभूषित सिंधुदुर्गचे भूमिपुत्र, शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडवण्यासाठी राबवित असलेल्या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते व मुंबई सीमा शुल्क,
-
स्वर्गीय सहदेव फाटक यांच्या जयंती निमित्त ८ जानेवारी २०२२ रोजी रक्तदान शिबीर
मुंबई:- माजी अपना परिवार प्रमुख, सहकार महर्षी, स्वर्गीय सहदेव फाटक यांच्या ९८ व्या जयंती निमित्त अपना परिवार व सोशल सर्व्हिस लीग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रक्तदान शिबिर शनिवार ८ जाने. २०२२ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी २.०० या वेळेत सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल, दामोदर हॉल, डॉ. आंबेडकर रोड, परेल,
-
`तिमिरातूनी तेजाकडे’ शैक्षणिक चळवळीला कोकणात उत्स्फूर्त प्रतिसाद!
रत्नागिरी (प्रतिनिधी):- उच्च विद्याविभूषित, शिक्षणतज्ञ, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे श्री. सत्यवान यशवंत रेडकर, निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी १८ डिसेंबर २०२१ पासून निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला घेत आहेत; त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी आणि
-
संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता मोहीम
महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम देवगड:-तळेबाजार महात्मा गांधी विद्यामंदिर तळेबाजार- देवगड व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम विद्युत उपकेंद्र तळेबाजार, वरेरी रोड, तळेबाजार बाजार पेठ ते सिंधुदुर्ग जिल्हा बँक. या ठिकाणी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, संस्थाप्रमुख, ग्रामस्थ, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गाडगे महाराज
-
निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला भेट ही पर्वणी! -अभिनेत्री अक्षता कांबळी
सिंधुदुर्ग:- “निकेत पावसकर यांच्या जगावेगळ्या छंदाची नोंद लिम्का बुक किंवा गिनिज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये व्हावी, अशा आमच्या शुभेच्छा आहेत. देशातीलच नव्हे तर जगातीलही विविध व्यक्तिंचे संदेश त्यांनी एकत्र करुन वेगळाच सांस्कृतिक ठेवा जोपासला आहे. या अक्षर घराला भेट म्हणजे पर्वणी आहे!” असे प्रतिपादन अभिनेत्री अक्षता कांबळी यांनी केले. तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत
-
स्त्रियांना दुय्यम वागणूक देणाऱ्यांशी संघटित होऊन प्रतिकार करायला पाहिजे! -निर्मलाताई सामंत-प्रभावळकर
मुंबई:- “स्त्रियांना दुय्यम वागणूक देणाऱ्यांना संघटित होऊन प्रतिकार करायला पाहिजे; तरच स्त्रियांची समर्थता लक्षात येईल!” असे उदगार महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोजित `आदिशक्ती अभियान’ प्रारंभ कार्यक्रमात संबोधित करीत असताना सह्याद्री हिरकणी पुरस्कार पुरस्कृत, मुंबईच्या माजी महापौर, महाराष्ट्र महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी सदस्या, बालविवाह प्रतिबंधक राज्य समितीच्या माजी सदस्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या
-
नगर वाचनालय कणकवलीच्या अध्यक्षपदी आमदार नितेश राणे यांची फेरनिवड
महम्मद हनीफ पीरखान यांची कार्यवाहपदी निवड कणकवली:- नगर वाचनालय कणकवली या संस्थेच्या कार्यकारणी मंडळाच्या कालावधीची मुदत संपल्यामुळे नवीन कार्यकारीणी मंडळाची निवड करण्यासाठी नुकतेच मासिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत आमदार नितेश राणे यांची अध्यक्षपदी पुन्हा एकदा एकमताने निवड करण्यात आली. तर महम्मद हनीफ आदम पीरखान यांची कार्यवाह पदी आणि सहकार्यवाह म्हणून डी.पी.तानवडे यांची
-
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिरात साजरा
देवगड:- महात्मा गांधी विद्या मंदिर तळेबाजार व ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मानव अधिकार दिवस हायस्कूलमध्ये उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तसेच ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हा उपाध्यक्ष नंदन अंकुश घोगळे यांनी मानव व मानवाचे अधिकार समजावून सांगितले व मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित शिक्षक
-
सामाजिक कार्याच्या शुभारंभासाठी सानिका मोहन सावंत यांना विधिज्ञ निर्मलाताई प्रभावळकर यांच्याकडून शुभेच्छा
मुंबई- मुंबईच्या माजी महापौर, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई विभागीय अर्बन सेलच्या अध्यक्षा, तळागाळातील गरीब कष्टकरी जनतेचे प्रश्न जाणणाऱ्या सामाजिक आणि धडाडीच्या नेत्या विधिज्ञ निर्मला सामंत-प्रभावळकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन डॉ. सानिका मोहन सावंत यांनी सामाजिक कार्यासाठी मार्गदर्शन घेतले. त्यावेळी निर्मलाताई डॉ. सानिका सावंत यांना आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
-
वृत्तवेध- भारतीय न्यायव्यवस्थेचे वास्तव!
शिवसेनेचे लोकसभेचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश (वेतन आणि सेवाशर्ती) संशोधन विधेयक २०२१ ह्या विधेयकावर संसदेत आपली स्पष्टपणे मते नोंदवित असताना भारतीय न्यायव्यवस्थेचे वास्तव मांडले. हे वास्तव लोकशाहीला मारक आहे. ह्याचा विचार देशातील प्रत्येक नागरिकांनी तसेच देशाच्या कायदे मंडळाने केलाच पाहिजे; तरच देशातील गरीब, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेला खऱ्याअर्थाने न्याय
