वृत्तवेध
-
लोककलाकार पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम गंगावणे यांचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्यावतीने सत्कार
कुडाळ (प्रतिनिधी):- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ जवळ पिंगुळी- गुढीपुर या छोट्याशा गावी गेल्या पाच दशकांहून अधिक आदिवासी लोककलांचे जतन आणि संवर्धन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी केले आहे. त्या कार्याच्या योगदानाची दखल घेऊन केंद्र सरकारने यावर्षीच्या सर्वोच्च असा पद्मश्री पुरस्कार देऊन राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय मानव अधिकार या दिनाचे औचित्य साधून पद्मश्री
-
माळगाव जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये एटीएम मशीन बसविण्याबाबत ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे निवेदन
मालवण (प्रतिनिधी):- माळगाव जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये एटीएम मशीन बसविण्याबाबत शाखेचे शाखाधिकारी श्री. मांजरेकर आणि कर्मचारी सौ. साळसकर मॅडम यांना ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे मालवण तालुका उपाध्यक्ष श्री. राजेशकुमार लब्दे आणि मालवण तालुका खजिनदार श्री.राजेंद्र सावंत यांनी निवेदन सादर केले. यावेळी बँक इमारत मालक श्री.मंगेश खोत आणि ग्रामस्थ श्री. रोहित हडकर उपस्थित होते. याबाबत शाखाधिकारी
-
`तिमिरातूनी तेजाकडे’ ह्या सामाजिक संस्थेची शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडविण्यासाठी शैक्षणिक चळवळ!
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी):- उच्च विद्याविभूषित, शिक्षणतज्ञ, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र व मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत असणारे श्री. सत्यवान यशवंत रेडकर, निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचे अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा १८ ते २४ डिसेंबर २०२१ च्या दरम्यान निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला घेणार आहेत. सदर व्याख्यानांसाठी कोणतेही
-
अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा अक्षरोत्सव परिवाराच्यावतीने सत्कार
तळेरे (प्रतिनिधी):- अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा तळेरे येथील अक्षरोत्सव परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. मल्लखांब या क्रिडा प्रकारातील योगदानाबद्दल तिला हा पुरस्कार मिळाला असून तिने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मल्लखांब या क्रीडा प्रकारात गेली १५ वर्षे दिलेल्या योगदानाबद्दल हिमानी परब हिला अर्जुन पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
-
भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रिअल लाईफ खेळाडूंनी आम्हाला ट्रेन केलं! -अभिनेता गौरीश शिपुरकर
सिंधुदुर्ग (निकेत पावसकर):- नाटक आणि सिनेमांमधून उत्तमोत्तम अभिनय करणारा अभिनेता ‘गौरीश शिपुरकर’ आता ‘विजेता’ सिनेमामधून रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. तो सुप्रसिद्ध ‘शोमॅन’ सुभाष घई प्रस्तुत ‘विजेता’ सिनेमामधून रूपेरी पडद्यावर पदार्पण करत आहे, तसेच ‘विजेता’ हा सिनेमा नुकताच सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार, माधव देवचके अशी तगडी स्टारकास्ट असणार
-
असलदे शिवाजीनगरमधील शाळेनजीक आणि भरवस्तीत असणारा मोबाईल टॉवर बंद करण्याची पालकांची मागणी
नांदगाव (प्रतिनिधी)- असलदे (ता. कणकवली, जिल्हा-सिंधुदुर्ग) गावातील शिवाजी नगरात प्राथमिक शाळेनजीक आणि भरवस्तीत स्थानिकांचा विरोध असूनही मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे. हा मोबाईल टॉवर उभारण्यात येत असताना त्याचे काम त्वरित थांबवावे; अशा तक्रारी सदर शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधित यंत्रणेकडे केल्या होत्या. त्याची दखल घेऊन कणकवली शिक्षण विस्तार अधिकारी राऊत यांनी
-
‘जादुटोणा विरोधी कायद्याची’ प्रभावीपणे अंमलबजावणी करावी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक मुंबई, दि. ७:- जादुटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीने कामकाजाला गती देवून राज्यात ‘जादुटोणा विरोधी कायद्याची’ प्रभावी अंमलबजावणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मंत्रालयातील उपमुख्यमंत्री यांच्या समिती कक्षात ‘जादुटोणा विरोधी कायदा’ प्रभावीपणे राबविण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री
-
सिंधुदुर्गात आजअखेर 51 हजार 694 रुग्ण कोरोनामुक्त; सक्रीय रुग्णांची संख्या 48
सिंधुदुर्गनगरी, दि. 7 (जि.मा.का):- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 51 हजार 694 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 1 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 07/12/2021 ( दुपारी 12 वाजेपर्यंत ) 1 आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 1
-
लीलाताई `पंढरीवासी’ झाल्या! श्रीमती लीलाताई तावडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
कणकवली (प्रतिनिधी)- येथील श्रीमती लीलाताई पंढरीनाथ तावडे (वय ८६ वर्षे) रविवारी मुलुंड-मुंबई येथे हृदयविकाराने स्वर्गवासी झाल्या. अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे, कणकवलीत सुप्रसिद्ध डॉ. विजय
-
सिंधुदुर्गात कोरोनाचे ४७ रुग्ण सक्रिय, आज अखेर मृत झालेले रुग्ण १ हजार ४५९
आजअखेर 51 हजार 694 रुग्ण कोरोनामुक्त, सक्रीय रुग्णांची संख्या 47 सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का): जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 51 हजार 694 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 47 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 0 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील

